दाढ खूपच दुखते आहे.! आता दुसरे इलाज सोडा, वाटीभर हळद जादू करून टाकेल.! ठणक गायबच समजा.!

आरोग्य

दाताच्या समस्या ह्या अत्यंत वेदनादायी असतात. दातांचे दुखणे हे दुखणे काही सोपे नसते म्हणून आपण अनेकदा असे म्हणतो की बाकी कोणतेही दुखणे चालेल पण दाताचे दुखणे नको. का, तर दाताच्या दुखण्यामध्ये जास्त त्रास असतो. दात किडणे, दातातून र’क्त येणे, हिरड्या सुजणे अशा प्रकारचे त्रास आपल्याला कधीतरी होतातच आणि त्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो जसे की डेंटिस्ट कडे जाणे त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेणे, दात साफ करणे पण त्यानंतर जर आपण दातांची काळजी घेतली नाही तर या सर्वांचा प्रभाव खूप वाईट असतो.

म्हणजेच त्यानंतर आपल्या दातांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आणि जर ती काळजी आपण घेतली नाही तर मात्र खूप मोठा आजार निर्माण होऊ शकतो. आपले दात हे खूप महत्त्वाचे असतात. जर दातच चांगले नसतील तर आपले शरीर चांगले कसे राहणार ? कारण जर दात चांगले असतील तर आपण काहीतरी खाऊ शकतो, पिऊ शकतो आणि जोपर्यंत आपण काही खाऊ पिऊ शकत नाही तोपर्यंत आपले शरीर चांगले राहूच शकत नाही त्यामुळे आपल्याला आपल्या दातांची काळजी घेणे गरजेचे आहे.

म्हणूनच दातांसाठी आजचा आपला घरगुती उपाय असणार आहे..चला तर मग जाणून घेऊया घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला कोण कोणती घरगुती सामग्री लागणार आहे. सर्वात पहिला उपाय म्हणजे हळद व नारळाचे तेल यांच्या द्वारे आपल्याला करायचा आहे. जर आपल्या शरीरावर कोणतीही जखम झाली असेल तर आपण त्यावर आपण हळद लावतो कारण की, हळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात.

हे वाचा:   चिकन, मटण आणि मासे कशाने येत असते जास्त ताकद...! काय असते जास्त फायदेशीर...!

हळद मद्ये अँटी घटक असतात. हळद जखमेवर लावल्यावर जखम लगेच बरी होते. आपल्याला आपल्या दातांवर म्हणजेच हिरड्यांवर देखील हळद व नारळाचे तेल लावायचे आहे. हे मिश्रा लावून पाच ते दहा मिनिटे हे असेच आपल्या तोंडामध्ये राहू द्यायचे आहे. या मिश्रणाला गिळायचे नाही, असे केल्यास एका आठवड्यामध्ये जर आपले हिरडे सुजले असतील तर ते बरे होण्यास मदत होते. व ती सूज पूर्णपणे कमी होईल.

दुसरी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे सर्वात औषधी म्हणजेच कोरफडीचा वापर. कोरफड सर्वात औषधी मानली जाते म्हणून आपल्याला ताजी कोरफड तोडायची आहे आणि त्याला स्वच्छ धुऊन मधोमध कापायचे आहे, जेणेकरून त्यावरील जेल आपण वापरू शकतो. मधोमध कापल्यानंतर त्यावर आपल्याला एक मूठभर हळद टाकायची आहे आणि कोरफडीच्या तुकड्याच्या सहाय्याने आपल्या दातांना घासून घ्यायचे आहे, जेणेकरून दातांमध्ये असलेली कीड निघून जाण्यास मदत होईल म्हणजे ती कीड मरून जाईल.

जर हिरड्यांमध्ये सूज आली असेल तर ती देखील कमी होईल त्याचबरोबर कोरफड म्हणजेच एलोवेरा अत्यंत फायदेशीर असल्यामुळे जर आपल्या तोंडातून वास येत असेल तर आपल्या तोंडातून येणारा वास म्हणजेच दुर्गंधी निघून जाण्यास मदत होईल. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा आपल्या दातांमध्ये सूज आली असेल किंवा हिरड्या सुजल्या असतील दातांमध्ये ठणक होत असेल त्यावेळेस अजून एक उपाय आपण आपल्या दातांसाठी करू शकतो तो म्हणजे मिठाचा वापर.

हे वाचा:   चमचाभर हा पदार्थ लिंबाच्या झाडाच्या मुळाशी टाका.! इतके लिंबे येतील की झाड वाकून जाईल.!

कोमट पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून आपल्याला गुळण्या करायच्या आहेत किंवा पाच मिनिटांसाठी तोंडामध्ये मिठाचे पाणी घेऊन बंद करून ठेवायचे आहे. मिठामध्ये असे काही गुणधर्म असतात त्यामुळे आपल्या तोंडामधील जंतू मरून जातात व हळूहळू सूज कमी होते. ठणक कमी होते व हिरड्यांची सूज देखील कमी होते त्यामुळे हे सर्व उपाय आपल्याला दातांचा संदर्भातील सर्व आजारांसाठी करायचे आहे त्यामुळे आपल्या दातांना कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही उलट यामुळे फायदाच होईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.