कितीही दुखत असले गुडघे तरी यापुढे टिकत नाही.! हा साधा सोपा उपाय गुडघे दगडाचे बनवून टाकतो.! उतारवयातील लोकांसाठी शंभर नंबरी उपाय.!

आरोग्य

अनेक लोकांना सांधे दुखणे ही समस्या होत असते अनेक लोक यापासून त्रस्त आहेत अनेक लोकांना यापासून सुटका मिळवायची आहे पण कशी ते सुचत नसते अशा वेळी काही घरगुती उपाय कामाला येतात. सांधेदुखीची म्हणजेच जॉइंट पेनची अनेक कारणे असू शकतात. जसे की जास्त काम, विषाणूंमुळे येणारा ताप, अशक्तपणा, कुपोषीत पणा किंवा विशिष्ट आसनात बसल्याने थकवा येणे, संसर्ग, दुखापत, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, ऍलर्जी, वृद्धत्व आणि झीज होऊन होणारे रोग अशी अनेक कारणे जॉईंट पेन साठी असू शकतात.

पण जर यामध्ये असे काही कारणे किंवा लक्षणे असल्यास दरवेळेस संधिवातच असेल असे नाही पण संधीवाताची ही लक्षणे असू शकतात. त्याचप्रमाणे गुडघेदुखी हे कॅल्शियम चे प्रमाण कमी झाल्याने होऊ शकते. हाडांची झीज होणे ही कारणे कॅल्शियमच्या कमतरतेमुळे निर्माण होत असतात. त्यामुळे यावर प्रत्येक वेळी डॉक्टर यांचा सल्ला घेऊन घेतलेली औषधे कामी येतात असे नाही म्हणूनच आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.

ज्याचा वापर केल्यामुळे ज्याचा उपयोग शरीरासाठी केल्यामुळे आपला संधिवात सांधेदुखी, गुडघेदुखी कायमची बरी होईल. हा उपाय बनविण्यासाठी सर्वप्रथम इथे आपल्याला वापर करायचा आहे तो म्हणजे पानाचा. आता हे पान कोणते हा प्रश्न तुम्हाला उद्भवला असेल तर हे पान म्हणजे खायचे पान. जे कोणत्याही पान टपरीवर अगदी शुल्लक किमतीमध्ये आपल्याला उपलब्ध होते. या पानाचा वापर आपल्याला करायचा आहे.

याला विड्याचे पान या नावाने देखील ओळखले जाते. घशामध्ये कफ साठून आवाज खरखरतो किंवा बसतो, अशा वेळी ज्येष्ठमध पावडर, कंकोळ, मिरी, कात घातलेले विड्याची पाने चावून चघळून खाल्ल्यास त्यामुळे घसा साफ होतो. त्याशिवाय डोके जड होणे, दुखणे, सतत शिंका येऊन सारखे नाक गळणे अशा सर्दीमध्ये विड्याची दोन पाने, चहाची पाती, धणे, आले, मिरी यांचा काढा तयार करून त्याचे सेवन केल्यास हे सर्व आजार दूर होतात.

हे वाचा:   बऱ्याच दिवसापासून दुखणारे सांधे.! दोन मिनिटात होईल गायब.! याच्या अशा वापराने होईल शरीरात असा जबरदस्त बदलाव.!

एवढे हे फायदेशीर पान आपल्या सांधेदुखी, गुडघेदुखी साठी देखील तेवढेच फायदेशीर ठरते त्यामुळे या पानाचा वापर आज इथे आपल्याला करायचा आहे. या पानाचा वापर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दोन पाने कापून घ्यायची आहेत. त्यासोबतच आपल्याला काळे तीळ देखील वापरायचे आहेत. तीळातील कॅल्शियम हाडांसाठी चांगलं तर आहेच, तसेच तिळात झिंक जास्त असते, जे हाडांचा ठिसूळपणा रोखण्यास मदत करते.

थोडक्यातच आपल्याला या तिळाचा खूप फायदा होऊ शकतो. ज्या व्यक्तींना ना कॅल्शियमची कमतरता आहे किंवा मेनोपॉजमुळे हाडांचा ठिसूळपणा वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, त्यांच्यासाठी तीळ फार उपयोगी असते. म्हणूनच एक चमचा तिळाचा वापर या उपायांमध्ये आपल्याला करायचा आहे. यामध्ये अजून एक गोष्ट आपल्याला वापरायची आहे ते म्हणजे मेथी. मेथीचा आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायदा होत असतो.

मेथीमध्ये एंटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे फायदेशीर घटक सांध्यातील दाह कमी करून संधिवात वेदना कमी करण्यास मदत करतात. मेथीमध्ये लोह, कॅल्शियम आणि फॉस्फरस हे तत्व देखील भरपूर प्रमाणत असतात. म्हणून, मेथीच्या औषधी गुणधर्मांमुळे, हाडे आणि सांधे यांना आवश्यक पोषक मिळतात, ज्यामुळे हाडे निरोगी आणि मजबूत राहतात. म्हणून आपल्याला इथे मेथीच्या दाण्यांचा वापर करायचा आहे.

यानंतरची प्रक्रिया करण्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि या कढईमध्ये दोन चमचे मोहरीचे तेल टाकायचे आहे. मोहरीचे तेल देखील आपल्या हाडांसाठी लाभदायक ठरते.आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर असते. या तेलामध्ये कापून घेतलेली पाने आणि एक चमचा मेथी दाणा आणि एक चमचा काळे तीळ टाकून हे मिश्रण मंद आचेवर शिजायला ठेवायचे आहे.

हे वाचा:   बरेच लोक कानात ह्या वस्तू घालून कानाचे नुकसान करतात.! कानात असलेला मळ फक्त तीनच मिनिटात बाहेर काढा.!

या मिश्रणाला तोपर्यंत शिजू द्यायचे आहे जोपर्यंत यामध्ये टाकलेले सर्व घटक हे एकत्रितपणे मिक्स होऊन यांचा अर्क म्हणजे पानातील मेथीतील आणि काळे तीळ यांमधील औषधी गुणधर्म या तेलामध्ये येत नाहीत तोपर्यंत या तेलाला आपल्याला उकळू द्यायचे आहे. पाच ते दहा मिनिटांनी व्यवस्थित रित्या हे तेल उकळवून घेतल्यानंतर थोडेसे थंड करून आपल्याला गाळून घ्यायचे आहे.

एक गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे की जेव्हा आपण हे तेल गाळत आहोत तेव्हा ते जास्त थंड असू नये कारण ज्या अवयवांवर आपण या तेलाचा वापर करणार आहोत त्यावर ते थोडे गरमच लावून घ्यायचे आहे कारण जेवढे तेल गरम असेल तेवढा त्याचा फायदा आपल्या हाडांसाठी जास्त होतो. हे तेल आपल्याला दररोज रात्री झोपण्यापूर्वी हाडांवर म्हणजेच गुडघ्यांवर, कमरेवर जिथे कुठे आपल्याला दुखत असेल तिथे तिथे या तेलाने व्यवस्थित रित्या मालिश करून झोपायचे आहे.

या तेलाचा वापर आपल्याला दररोज करायचा आहे.जर या तेलाचा वापर आपण दररोज केला तर फक्त एका आठवड्यामध्ये आपल्या हाडांमध्ये झालेला फरक आपल्याला दिसून येईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.