गाड्यावर मिळतात तसे कुरकुरीत कोबी मंचुरिअन बनवा तेही फक्त १५ रुपयांमध्ये.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, विकत मिळणाऱ्या दोन प्लेट कोबीच्या मंचुरियनच्या भावामध्ये अगदी सगळ्या कुटुंबासाठी पोटभर घरच्या घरी तुम्ही कोबीचे मंचुरियन भरपूर प्रमाणात तयार करू शकता. ते कसं ते पाहण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. तर आज आपण गाडीवर मिळणारे कोबीचे मंचुरियन घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीत करणार आहोत. तुमच्याकडे जर कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी कॉर्नफ्लोर नसेल तर त्यासाठी सुद्धा पर्याय मी इथे सांगितला आहे. सगळ्यात पहिल्यांदा कोबी स्वच्छ धुऊन घेतलेला आहे.

गाडीवर विकत मिळणाऱ्या कोबीचे मंचुरियन बनवण्यासाठी तुम्ही बघितल असेल कोबी किसून घेतला जातो त्यासाठी काय करायचे माहिती का? घरातली अशी ही मोठी जी किसणी असते त्यावर सिम्पली तुम्हाला कोबी किसून घ्यायची आहे. नसेल किसणी घरामध्ये तर अगदी सुरीने बारीक बारीक तुम्ही चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल. फक्त इतकच करायचंय की अगदी बारीक किसणीवर अजिबात तुम्हाला हे किसून घ्यायचं नाही. त्याने तुमचे मंचुरियन थोडेसे चिवट किंवा चिकट होतात.

तर असा हा संपूर्ण कोबी आपण किसून घेतलाय. त्यानंतर वाटी घ्या किंवा कप घ्या. त्याने असा हा किसलेला कोबी तुम्हाला मोजून घ्यायचा आहे. तर इथे साधारणता पाच कप असा हा कोबी आपण किसून घेतलेला आहे. मोठा कोबी असल्यामुळे बरोबर पाच कप हा कोबी आपल्याला तयार मिळालेला आहे. आता याच कपाने आपण बाकीची पिठ सुद्धा मोजून घेणार आहोत म्हणजे मंचुरियन बनवणं तुम्हाला अगदी सोईस्कर होईल.

सगळ्यात पहिल्यांदा कोबी किसून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. अर्धा चमचा आपण इथे तिखट घेतलेल आहे. साठवणीच तिखट कोणतही तुम्ही वापरू शकता. आवडीनुसार कमी अधिक करू शकता. एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, नसेल तर किसून सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. एक चमचा आपण इथे सोया सॉस घेतलेला आहे. तो विकत मिळणाऱ्या मंचुरियन मध्ये सुद्धा सोया सॉस वापरला जातो. तुमच्याकडे नसेल तर न घालता सुद्धा तुम्हाला हे तयार करता येईल. चवीपुरत मीठ घालायच आहे. तुम्ही जर सोया सॉस घालत असाल तर सोया सॉस मध्ये सुद्धा मीठ असत त्यानुसार तुम्हाला यामध्ये मीठ घालायचं आहे.

हे वाचा:   कुरकुरीत अळूवडी अळूवडी बनवण्याची सर्वात सोपी पद्धत.. रोल करताना सुटू नये म्हणून खास टिप्स.!

सगळे मसाले कोबीमध्ये आपण छान चोळून एकजीव करून घेणार आहोत. कोबीला स्वतःच पाणी असतं असं छान चोळून घेतल्यामुळे ते सगळं रिलीज होतं. या पाण्यामध्येच पीठ घालून आपण मंचुरियनच पीठ तयार करणार आहोत, म्हणजे वेगळं एक्स्ट्रा तुम्हाला पाणी घालाव लागत नाही. असं छान आपण चोळून घेतलय थोडसं ओलसर झालेल आहे.

ज्या कपाने पाच कप कोबी मोजून घेतलेला होता अगदी त्याच कपने इथे आपण एक कप कॉर्नफ्लोर घेतलेल आहे. कोणत्याही कंपनीच कॉर्नफ्लोर वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लोर नसेल तर याऐवजी दीड कप पोहे जे असतात ना, कांदे पोहे ते मिक्सरला बारीक पावडर करून ते वापरायचे आहे. त्याने सुद्धा तुमचे मंचुरियन परफेक्ट तयार होतात.

तुमच्या पैकी बऱ्याच जणांचे प्रश्न असतील पोह्यांची पावडर किंवा कॉर्नफ्लोर का वापरतात तर मंचुरियन बनवताना पाण्याचा अंश कमी करण्यासाठी शोषून घेण्यासाठी शिवाय खूप कुरकुरीत होण्यासाठी कॉर्नफ्लोर वापरला जातो. सारख्याच कपने इथे आपण एक कप मैदा घेतलेला आहे. मैदा तुम्हाला चालत नसेल तर गव्हाच पीठ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. गव्हाच्या पिठापासूनच मैदा सुद्धा तयार केला जातो. दोघांपैकी काही जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल.

मंचुरियन ला जसं गाड्यांवर मिळतं तसा तुम्हाला छान रंग येण्यासाठी इथे आपण अर्धा चमचा फूड कलर घेतलेला आहे. इथे आपण ऑर्गेनिक फूड कलर घेतलेला आहे, तुम्हाला चालत नसेल तर न घालता तयार करू शकता किंवा तुम्ही इथे एक मोठा चमचा किंवा दोन चमचे इथे बिटाचा रस जरी ताजा ताजा काढून घातला तरी सुद्धा चालू शकेल. त्याने सुद्धा मंचुरियनला मस्त लालसर जस विकत मिळतात तसा छान रंग येतो.

मंचुरियनच पीठ करताना अजिबात यामध्ये पाणी घालायचं नाही. जस जस तुम्ही हे मळत जाल तस तस कोबीला स्वतःच पाणी सुटतं आणि असा हा तुमचा भजी सारखा पिठाचा गोळा तयार होतो. जर जास्तच कोरड वाटत असेल तर एखाद दोन चमचा तुम्हाला इथे पाणी सुद्धा वापरता येईल तर अस हे छान आपलं पीठ भिजवून झालेल आहे. नॉर्मली आपण गोल भजी करतो ना त्यापेक्षा थोडसं पीठ आपल्याला घट्ट ठेवायच आहे. मंचुरियन तळण्यासाठी एका कढईमध्ये मस्त कडकडीत धूर येईपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचंय.

हे वाचा:   हा आहे जादुई उपाय जो तुमची ब्लँकेट, चादर, गोधडी फक्त दहा मिनीटात साफ करून टाकेल.!

आता मंचुरियन कसे तेलामध्ये सोडायचे त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घेतलेल आहे. हाताला पीठ चिटकू नये म्हणून हात थोडासा ओला करून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघितल असेल गाड्यांवर मंचुरियन सोडताना असा मोठा गोळा हातावर घेतला जातो आणि मी दाखवते त्याप्रमाणे असे छोटे छोटे बॉल्स किंवा छोटे छोटे भजांप्रमाणे असे हे मंचुरियन तेलामध्ये सोडले जातात.

तुम्हाला असं जमत नसेल तर काय करायचे, हात सिम्पली ओला करून घ्यायचा आणि सिंगल जशी आपण गोल भजी सोडतो ना त्या पद्धतीने तुम्हाला सोडता येईल पण एकत्र असं सोडलं की काम सोईस्कर होत. तुम्हाला जी पद्धत आवडत असेल त्या पद्धतीने अगदी छोट्या छोट्या भजी तुम्हाला यामध्ये सोडायच्या आहे. तर लक्षात असू द्या सुरुवातीलाच कडकडीत तेल गरम असाव.

मंचुरियन घातल्यानंतर सुद्धा आपल्याला मोठ्या आचेवरच मंचुरियन तळून घ्यायच आहे. दोन्ही बाजूने वर खाली करत साधारणत एक पाच सहा मिनिट मोठ्या आचेवर आपल्याला हे मंचुरियन मस्त तळून घ्यायच आहे. थोडशा लालसर रंगावर अजिबात कच्च ठेवायचं नाही. मस्त लालसर रंग येतो आणि यातून छान सुगंध यायला सुरुवात होते. जस जस तुम्ही मंचुरियन तळत जाल तस तस तुमचा तेलाचा ताव थोडासा जास्त गरम असतो.

त्यानुसार तुम्हाला आवश्यकतेनुसार मंचुरियन घालून असे छान तळून घ्यायच आहे. एका कोबी पासून भरपूर परातभर मंचुरियन तयार होतात, तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. तर मित्रांनो सगळ्या कुटुंबासाठी छोट्या कोबी पासून परातभर मंचुरियन नक्की ट्राय करून पहा. तर आजची ही कुरकुरीत खुसखुशीत कमी तेलकट मस्त रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.