डोळ्याला पाणी न येता कांदा कापण्याची ही भन्नाट ट्रिक नक्की बघा, सर्व अडचणी होतील दूर

ट्रेंडिंग

नमस्कार, आज आपण कधीच न पाहिलेल्या महत्त्वाच्या काही किचन टिप्स बघणार आहोत, ज्यामुळे तुमची दररोजची काम तर सोपी होणारच आहेत, त्यासोबतच तुम्हाला पैशांची देखील बचत करता येईल आणि आता खास करून पावसाळ्यात येणाऱ्या अडचणी देखील दूर होतील. फक्त हा लेख शेवटपर्यंत वाचा, आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा. तुमच्या सोबत असं कधी झालय का की एन वेळी काडीपेटी चालत नाही, यामुळे आपल्या बऱ्याच काड्या वाया जातात. त्याच सोबत इमरजन्सी मध्ये आपल्याला यामध्ये बराच वेळ द्यावा लागतो. अगदी चिडचिड झाल्यासारखं होतं का? कारण की कितीही काड्या वेस्ट केल्या तरी त्या चालत नाही आणि आता काडेपेटी ची तर गरज आहेच, पण हा प्रॉब्लेम येतो यामध्ये.

ओलसरपणा आल्यामुळे आणि खास करून तर पावसाळ्यात जास्त करून हे होतं किंवा आपला ओला हात लागल्यामुळे सुद्धा हे होतं. तर त्यासाठी खूपच महत्त्वाची टीप अशी की याचा आपण साईडचे दोन्ही भाग काढून घ्यायचे आहेत. आणि आता माझ्याकडे काचेची ही छोटीशी बरणी होती, कॉफी पावडरची किंवा इतर तुम्ही कोणतीही क्रीमची किंवा एखादी छोटी प्लास्टिकची जरी बरणी वापरली तरी चालेल. त्यामधे आपल्याला या काडी पेटीच्या काड्या टाकायच्या आहेत आणि साईडच्या दोन भागांपैकी एक भाग डबल टेपच्या सहाय्याने या बरणी वर चिटकवायचा आहे. अशाप्रकारे तुम्ही सहज याचा वापर करू शकणार आहात.

आता पुढची टीप आहे काचेच्या बरणी साठी. बर काचेच्या बरण्या घेऊन जायच्या असतील तर फुटतील की काय याची आपल्याला भीती असते, त्यामुळे आपण कापडी पिशवीमध्ये किंवा पॉलिथीन मध्ये अशा प्रकारे बांधून घेऊन जातो पण यामुळे एकमेकाला लागून या वस्तू फुटण्याची देखील भीती असते. आता असं नाही की दोनच बरण्या, एक जरी बरणी घेतली आणि दुसरी एखादी वस्तू जरी असेल तर ते देखील एकमेकाला लागून फुटू शकते. तर त्यामुळे वेगळ असं काही तुम्हाला खरेदी करण्यापेक्षा किंवा ऑर्गनायझर घेण्यापेक्षा कॅरी बॅगला अशा प्रकारे वापरा की तुम्हाला वेगळ असं काही घ्यायची गरजच पडणार नाही. त्यासाठी एक बरणी ठेवल्यानंतर या पॉलिथीनला मधून अशापकारे पीळ द्या आणि हा पीळ देऊन आपल्याला दुसरा भाग समोर करायचा आहे. त्यानंतर आतमध्ये गाठ झाल्यासारखं तयार होतं आणि थोडा स्पेस तयार होतो जेणेकरून जरी एकमेकाला बरण्या लागल्या तरी एकमेकाला टच होत नाही. त्यासोबतच एवढ्या छान यामध्ये फिट बसतात की अजिबात लीक होत नाहीत.

हे वाचा:   फक्त ही एक गोळी आणि घरातील पालीपासून कायमची सुटका; घरगुती रामबाण उपाय.!

यानंतरची टिप आहे आता बघा उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर वाळवणीचे पदार्थ करतो. शेवया म्हणा किंवा कुरवडी पापडी, पण बऱ्याच वेळा काय होतं एवढ्या मेहनतीने बनवलेल्या या गोष्टी खराब होतात. कारण की खास करून तर पावसाळ्यामध्ये ऊन पडत नाही, घरामध्ये थोडसं ओलसर वातावरण होतं त्यामुळे या गोष्टी खराब व्हायला लागतात आणि एवढ्या मेहनतीने तयार केलेल्या, पैसे खर्च करून केलेल्या वस्तू अजिबात खराब होऊ नये वर्षभर टिकून राहाव्या यासाठी आपल्याला इथे वापरायचा आहे पेपर. तुमच्याकडे न्यूजपेपर असेल कोणताही स्वच्छ पेपर तुम्ही इथे वापरू शकता आणि ज्या मोठ मोठ्या बरण्या असतात किंवा मोठ मोठे डब्बे असतात त्या डब्ब्याच झाकण लावण्या अगोदर आपल्याला पेपर लावायचा आहे. यामुळे आपला जो नॉर्मल डब्बा असतो तो एअर टाईट डब्बा होतो. यामध्ये हवा अजिबात जात नाही जेणेकरून या सर्व गोष्टी अगदी भरपूर दिवस टिकून राहतात.

यानंतरची आपली टिप आहे कांदा कट करण्यासाठी. बघा दररोजच्या रेसिपीज मध्ये आपल्याला कांदा लागतो आणि आपण जेव्हा जेव्हा कांदा कट करतो तेव्हा डोळ्याला पाणी येतं. पण आजपासून तुमचा कांदा कट करण्यासाठी अजिबात जास्त वेळ जाणार नाही त्यासोबतच डोळ्याला पाणी देखील येणार नाही अशा दोन ट्रिक्स मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे. त्यासाठी मी कांद्याचा पाचोळा काढून घेतलेला आहे. आता बऱ्याच अशा भाज्या असतात, बिर्याणी असते ज्यामध्ये खूप बारीक कांदा लागतो पण आपल्याला काही प्रॅक्टिस नसते त्यामुळे एवढा बारीक कांदा कट करायचं म्हणलं तर एकतर वेळ जातो किंवा तेवढा बारीक कांदा होत नाही. त्यानंतर बघा आता कांदा कट करण्यासाठी आपण चाकू न वापरता इथे वापरणार आहोत पिलर, जी की आपण बटाट्यावरची साल काढण्यासाठी वापरतो. आता इथे बघा हे पिलर जे आहे ते आपल्याला अर्धा कांदा कट करून वापरायचा आहे.

हे वाचा:   जुने झालेले मोजे आता फेकून देऊ नका त्यांचा तुम्ही वापर करू शकता अशा प्रकारे.! जुने मोजे वापरून तुम्ही बनवू शकता या वस्तू.!

हाताने कितीही म्हणलं तरी एवढा पातळ कांदा बारीक कांदा कट करणं शक्य होत नाही. पण चाकू न वापरता पिलरच्या मदतीने आपल्याला हे काम सहज शक्य होतं. आपण पाण्यामध्ये कांदा ठेवलेला आहे त्यामुळे डोळ्याला देखील पाणी येत नाही. तर बघू शकता पिलरमुळे ह्या कामाला किती जास्त जो वेळ लागणार होता तो वाचलेला आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि तुमच्याकडे जर पिलर नसेल तर तुम्ही याऐवजी ज्या बटाट्याच्या खिसणी असतात, ज्यामध्ये तीन चार वेगवेगळ्या आकाराच्या ब्लेड असतात तर त्यामधील जी बटाट्याची ब्लेड असते, बटाट्याचे चिप्स बनवण्याची जी ब्लेड असते त्या ब्लेडवरती कांदा आडवा ठेवून देखील ही प्रोसेस करू शकता. त्यामुळे देखील कांदा खूप छान अशा प्रकारे बारीक होतो पण ती हाताला लागण्याची भीती असते, त्यामुळे मी नेहमी पिलर वापरते, जी की अगदी 10-15 रुपयालाही मार्केटमध्ये तुम्हाला सहज मिळेल. यामध्ये कांद्याचे अजिबात तुकडे होत नाहीत, कांदा वाया जात नाही आणि डोळ्याला पाणी येत नाही. या पद्धतीमुळे कांदा अगदी एक समान एकसारखा कट होतो. तर मित्रांनो तुम्हाला सर्वात जास्त कोणती टीप आवडली ते आम्हाला कमेंट मधे नक्की सांगा. लेख आवडला असेल तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा.