पावसाळ्यात घरात माश्या, चिलटं, कुबटवास येऊ नये यासाठी करा हे घरगुती उपाय.!

ट्रेंडिंग

नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी पावसाळा म्हटल की बाहेर जरी प्रसन्न वातावरण असलं तरी घरामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त लक्ष ठेवाव लागत. सगळं लक्ष घर आणि किचन आपलं स्वच्छ ठेवण्याकडे असतं कारण पावसाळ्याच्या या सीजनमध्ये कितीही स्वच्छता ठेवा तरी घरामध्ये माशा, मच्छर, चिलट वगैरे होण, झुरळ वगैरे होण यांच प्रमाण नेहमी जास्तच दिसत आणि म्हणूनच या मध्ये फक्त रोजची स्वच्छताच नाही तर काही खास उपाय सुद्धा आपल्याला घरामध्ये करायला हवेत, ज्यामुळे आपल्या घरामध्ये पावसाळ्यात येणारे चिल्ट, माशा, मच्छर किंवा कुबट वास सुद्धा येणार नाही. या सगळ्यांवरती एकमेव सोलुशन म्हणजे अगदी इफेक्टिव्ह असा होममेड स्प्रे आपल्याला स्पेशली या पावसाळ्यासाठी घरामध्ये बनवून ठेवायचा आहे.

पहा या स्प्रेसाठी आपण इथे एक रिकामी बॉटल घेतलेली आहे. सगळ्यात आधी या रिकाम्या बॉटलमध्ये आपल्याला घ्यायच आहे 750 ml पाणी. आता हे साधच टॅप वॉटर आहे. 750 ml पाणी घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप सफेद विनेगर म्हणजे चायनीज रेसिपीज मध्ये जे व्हिनेगर आपण वापरतो तेच अर्धा कप व्हिनेगर यामध्ये मिक्स करायच आहे. यासोबतच यामध्ये आपल्याला मिक्स करायच आहे.

कुठलही डिसइन्फेक्ट लिक्विड म्हणजे डेटॉल जे सगळ्यांच्याच घरी असत. हे अर्धा चमचा डेटॉल आपल्याला यामध्ये मिक्स करायचा आहे. सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये काही ड्रॉप्स मिक्स करायचे आहेत नीलगिरीच्या तेलाचे. अगदी सहज कुठल्याही केमिस्ट शॉप मध्ये तुम्हाला हे तेल मिळेल, निलगिरीच तेल नाही मिळालं तर लवंगाच तेल सुद्धा काही ड्रॉप तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता.

त्यापेक्षाही अगदी सरळ साधा सहज घरामध्ये करण्यासारखा उपाय म्हणजे जर तुम्हाला तेल किंवा लवंगाच तेल जर कुठे मिळालं नाही तर सरळ सगळ्यांच्या घरामध्ये तुळशीच रोप हे असत. तुळशीचे काही पान आपल्याला घ्यायची किंवा घरामध्ये लवंग असतात तर थोड्याशा लवंगा घ्यायच्या आहेत आणि थोड्या पाण्यामध्ये लवंग, तुळशीची पान आपल्याला पाच मिनिटात चांगली उकळून घ्यायची आहे आणि हेच उकळलेल पाणी या स्प्रेसाठी इथे तुम्ही वापरू शकता. तर पहा असा हा स्प्रे आपला तयार झालाय. व्यवस्थित हा चांगला मिक्स करायचा आहे आणि हा स्प्रे पावसाळ्यामध्ये घरामध्ये वापरायचा कसा आणि कुठे ते आता आपण पाहूया.

हे वाचा:   गॅस वर टाका इनो, या इनोची कमाल पाहून विश्वास बसणार नाही.. पैशांची होईल बचत.!

तर आपला रोजचा दुपारचा किंवा संध्याकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर किचन आपलं स्वच्छ पुसून आपल्याला घ्यायचं आहे आणि यानंतर जर किचन ओट्यावरती किंवा कुठे काही वस्तू ठेवलेल्या असतील तर त्यावरती एखादा स्वच्छ असा नॅपकिन आपल्याला पसरून ठेवायचा आहे आणि यानंतर हा जो स्प्रे आपण तयार केलेला आहे हा स्प्रे आपल्या किचन ओट्यावरती म्हणजे जिथे गॅस आहे गॅसची मागची भिंत, गॅसच्या आसपास जेवढा काही एरिया आहे हा एरिया स्वच्छ कोरडा केल्यानंतर हा स्प्रे, दोन ते तीन स्प्रे याचे आपल्याला किचनमध्ये स्प्रे करायचे आहेत. फक्त किचन काउंटर वरतीच नाही तर भांडे घासून झाल्यानंतर आपल्या किचनच जे सिंक आहे त्या सिंक मध्ये सुद्धा हा स्प्रे करायचा आहे.

किचनच्या सिंकचा खालचा जो एरिया असतो जिथे ड्रेन पाईप वगैरे असतो तिथे सुद्धा काही स्प्रे आपल्याला याचे करायचे आहेत. तुमच जर गार्डन असेल, गॅलरीमध्ये वगैरे झाड लावलेली असतील तर झाडांच्या आसपास सुद्धा आपल्याला हा स्प्रे करायचा आहे. अगदी खूप ओलसर करायचं नाही अगदी हलका असा स्प्रे आपल्याला करायचा आहे. यात जे काही पदार्थ आपण वापरलेले आहे त्याच्या तीव्र वासामुळे तुम्ही पहाल आपल्या घरामध्ये माशा, मच्छर, चिलट वगैरे होत नाहीत.

पहा यासोबतच आपल्या बाथरूम मध्ये, किचन सिंकमध्ये जी ड्रेन पाईप असते, जाळी वगैरे असते त्यामधून सुद्धा बऱ्याच वेळ झुरळ, माशा, चिलट वगैरे येत असतात दुर्गंधी येत असते, त्यामुळे घरातली काम झाली की रात्री झोपताना किंवा दुपारच्या वेळीस आपल्याला थोडसं फिनेल घ्यायचं जे आपण रोजच्या फरशी पुसण्यासाठी वापरतो ते फिनेल थोडस घ्यायचं आहे आणि जिथे जिथे अशा जाळ्या आहेत म्हणजे ड्रेनचे पाईप आहेत तिथे कमीत कमी दिवसातून एकदा अस हे लिक्विड त्या जाळ्यांच्या भोवती आपल्याला असं ओतायचं आहे.

फिनाईलचा या जाळ्यांवरती असा वापर केल्यामुळे बऱ्याच वेळ पावसाळ्यांमध्ये बारीक बारीक किडे या पाईप मधून आपल्या घरात एंटर करत असतात तर फिनाइलचा वापर केल्यामुळे असे किडेही येत नाही. त्याचबरोबर बाथरूम मध्ये टॉयलेट मध्ये किंवा किचन सिंकच्या आसपास एक प्रकारची दुर्गंधी येत असते ती दुर्गंधी सुद्धा घरामध्ये येत नाही. यासोबतच असलेली विजेची उपकरण जसं की फ्रिज आता फ्रिज मध्ये सुद्धा एखादा पदार्थ राहिला तर त्याची दुर्गंधी फ्रिज मध्येच नाही तर पूर्ण घरामध्ये पसरते. त्यामुळे फ्रिज सुद्धा अधून मधून आपल्याला असा चेक करायचा आहे.

हे वाचा:   घराच्या घरी बनवा तोंडात विरघळणारी व महिनाभर टिकणारी नारळाची वडी.!

जर फ्रिजमध्ये कुठली दुर्गंधी जर येत असेल तर त्यासाठी सुद्धा एक उपाय तुम्ही करू शकता. पहा त्यासाठी एका बाऊल मध्ये थोडसं पाणी घ्यायच आहे त्यामध्ये थोडासा बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि एक न्यूजपेपरचा तुकडा किंवा बोळा असा यामध्ये भिजवून हा बोळा आपल्याला फ्रिजमध्ये ठेवायचा आहे. त्यामुळे काय होतं की फ्रिजमध्ये जर कुठली दुर्गंधी असेल तर ही दुर्गंधी या न्यूजपेपर आणि बेकिंग सोड्याच्या पाण्यामुळे दूर होण्यास मदत होते.

कपडे धुण्यासाठी रोजच्या रोज वापरण्यात येणार आपलं वॉशिंग मशीन. कपडे धुऊन झाल्यानंतर बरेच जण हे वॉशिंग मशीन लगेच बंद करून ठेवून देतात. परंतु तसं न करता प्रत्येक वापरानंतर हे वॉशिंग मशीन स्वच्छ कपड्याने कोरड करून ठेवा. याच जे झाकण आहे ते कधीही बंद करून ठेवू नका. कमीत कमी तासभर हे असच उघड ठेवा म्हणजे यामधून जी दुर्गंधी आहे ती दूर होईल किंवा ते लवकर कोरड होण्यास सुद्धा मदत होते.

कारण वॉशिंग मशीनचे हे जे रबर आहे त्यामधून सुद्धा बराच वेळ कुबट असा वास येत असतो. सगळ्यात शेवटचा आणि तितकाच महत्त्वाचा पॉईंट ज्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करता कामा नये, तो म्हणजे आपल्या कचऱ्याचा डब्बा. पहा, कचरा टाकून झाल्यानंतर प्रत्येक वेळेस कचऱ्याचा डब्बा स्वच्छ आपल्याला धुऊन कोरडा करून ठेवायचा आहे. त्याला जी कचऱ्याची बॅग असते ती लावण्यापूर्वी थोड्याशा पेपर मध्ये बेकिंग सोडा घ्यायचा आहे.

हा बेकिंग सोडा आपल्याला कचऱ्याच्या डब्याच्या तळाशी ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्ही कचऱ्याची जी बॅग आहे ती लावू शकता. असं केल्यामुळे जर ओलसर कचऱ्यामुळे डस्टबिनचा एक प्रकारचा वास येत असेल, त्यामधून जर कुठली दुर्गंधी येत असेल तर ही दुर्गंधी सुद्धा या उपायामुळे दूर होण्यास नक्कीच मदत होते.

तर मित्रांनो, आजच्या या लेखामध्ये सांगितलेल्या या सगळ्या टिप्स स्पेशली या पावसाळ्यामध्ये एकदा नक्की करून बघा. आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आणि हा लेख तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.