पावसाळ्यात कपडे वाळवण झालं सोपं, बघा कढईची कमाल.. महिलांनी हे काम नक्की करावं.!

ट्रेंडिंग

नमस्कार, कसे आहात आपण? आजच्या लेखात आपण खूपच महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे आपल्याला भरपूर कामामध्ये मदत होणार आहे आणि पैशांची बचत देखील होईल. तर इथे आपली पहिली टीप आहे वर्कच्या साड्यासाठी कारण की नॉर्मल साड्या तर आपण स्वच्छ पाण्याने धुऊन काढतो, व्यवस्थित त्याला पिळूनही घेतो पण या ज्या साड्या असतात यांना जे वर्क असत ते खूप नाजूक असत.

तर याला जर घासून किंवा असं थोडस आपटून स्वच्छ केलं तर नक्कीच हे वर्क खराब होऊ शकत आणि ब्रशने जर घासलं तर नक्कीच पूर्ण वर्क निघून जाईल किंवा जे नाजूक कपडे असतात ज्याचे दोरे निघतात त्यांच्यासाठी हा ब्रश आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने वापरता येतो जेणेकरून आपले काम सोपे होते. त्यासोबतच कपडे खराब होत नाहीत. तर इथे आपल्याला जुना सॉक्स घ्यायचा आहे, तुम्ही इथे एखादा कपडा देखील वापरू शकता पण सॉक्स कसं या ब्रशवर व्यवस्थित बसतो. जेणेकरून हँडल करायला सोपं जातं.

त्याच सोबत आपल्याला सॉक्समुळे सॉफ्ट कपड्यावरती देखील याला वापरता येत. आता बघा इथे तुम्ही जर सॉक्सला वॉश पावडरने ओल करून घ्यायच असेल तर घेऊ शकता, एखादा लिक्विड लावायच असेल तर लावू शकता. आता ह्या ज्या साड्या आहेत यावरील वर्क तुम्ही बघा मोत्या सारखं वर्क आहे, जरी वर्क आहे. बऱ्याच वेळा सिल्कच्या आपल्या साड्या असतात जे की बाहेर ड्राय क्लीनिंगला द्याव्या लागतात नाहीतर घरी जर तुम्ही याला रेगुलर सारखं धुतलं तर त्या खराब होतात.

ड्राय क्लिनिंग साठी दिलं म्हणजे खर्च वाढतो. एक तर सोय नसते किंवा वेळ लागतो तर अशा वेळेस तुम्हाला जर या वर्कच्या साड्या स्वच्छ करायच्या असतील, एखादा डाग पडला असेल किंवा याला थोडसं एखादा घंटाच घातलेल आहे आणि स्वच्छ करायच आहे तर अशापकारे तुम्ही सॉक्स थोडासा वॉशिंग पावडर मध्ये भिजवून घ्या आणि त्यानंतर या साडीवरती अशाप्रकारे फिरवा जेणेकरून आपलं वर्क देखील खराब होणार नाही आणि साडी देखील स्वच्छ होईल. खूपच कमालीची ट्रिक आहे एकदा नक्की ट्राय करून बघा.

यानंतरची आपली टिप आहे गॅसच्या शेगडीसाठी. आता बघा आपल्याला दिवसभरामध्ये काही ना काही काम असतात, स्वयपाक असतो, तर अशा वेळेस गॅसच्या शेगडीवरती अशापकारे तेलकट डाग होतात, आता याला जर आपण कपड्याने पुसलं तर हे थोडं फार स्वच्छ होईल पण आपला जो कपडा आहे तो तेलकट होतो आणि त्याला स्वच्छ करायचं म्हणलं की अजूनच आपला वेळ जातो, काम वाढतं, आणि हे जे तेलकट डाग आहे त्याला जर तुम्ही पाणी लावून घासायला गेलात तर तोही वेळ जातो आणि गॅसची शेगडी सतत पाण्याने स्वच्छ केल्यामुळे देखील खराब होते. तर अशा वेळेस तेलाचे डाग काढण्यासाठी आपल्याला इथे वापरायच आहे केळीच साल जे की आपण कचऱ्यामध्ये फेकून देतो.

हे वाचा:   फक्त एकदा वांग बटाट्याची अशी भाजी करून तर बघा, बोटे चाटत खाल.!

केळीच साल अस वापरण्याचा अजून एक फायदा आहे, तेलाचे डाग तर निघूनच जातात त्यासोबत तुमची शेगडी खूप जास्त अशी डल झाली असते, शायनिंग निघून गेलेली असेल तर ती देखील शायनिंग परत आणण्याच काम केळीच साल करत. तर बघू शकता जे पण तेलाचे डाग होते तेल होतं ते पूर्ण केळीच्या सालीने असं शोषून घेतलेल आहे. आता याला फक्त तुम्ही नॉर्मल अस कपड्याने पुसून घ्या. तुमचा कपडाही खराब होणार नाही, यामध्ये जास्त वेळही जात नाही आणि जी गोष्ट आपण कचऱ्यात फेकून देणार होतो त्याने आपण आपलं काम सोप केलेल आहे.

यानंतरची आपली टीप आहे कांद्यासाठी. आता बघा कांदा कधी कधी काय होत, थोडाफार शिल्लक राहतो आणि शिल्लक राहिलेला कांदा खूप जास्त त्यामधून उग्रवास यायला लागतो आणि चवीला देखील वेगळाच लागतो. हा कांदा आजकाल महाग पण झालेला आहे, फेकून द्यायचं म्हणलं तर ते पण नको वाटतं तर घरामध्ये कांदा जर तुम्ही कट करून ठेवला तर एक दोन तासानंतर पूर्ण घरामध्ये कांद्याचा घान वास पसरतो तर असं होऊ नये यासाठी आपल्याला इथे वापरायचा आहे लिंबू जेणेकरून लिंबामुळे आपला जो कांदा आहे त्यामधून उग्र वास येत नाही.

एक थोडाफार राहिलेला कांदा म्हणा किंवा जर कांद्याच्या फोडी राहिल्या असतील छोटा कांदा कट केलेला आहे तर त्यावर तुम्ही लिंबू थोडसं रस पिळू शकता किंवा जर फोडीच असतील अशा किंवा अर्धा कांदा आहे तर त्यावरती लिंबाचा रस लावा. तुम्ही याला अगदी दिवसभरी जरी ठेवलं तरी यामधून वास येणार नाही आणि परत तुम्ही याचा रियूज करू शकता.

यानंतरची आपली टिप आहे आता पावसाळ्यामध्ये प्रत्येक गोष्ट लवकर खराब होते जसे की धान्य मना किंवा रवा, त्याचसोबत जर डाळी असतील किंवा गहू, तांदूळ तर त्यासाठी एक छोटीशी टीप आहे. खास करून रव्यामधे खूप लवकर आळ्या व्हायला लागतात. मैदा देखील खूप लवकर खराब होतो, उन येत नाही, त्याचसोबत दमट असं कुबट वातावरण तयार होतं तर त्यासाठी इथे आपल्याला वापरायचा आहे तेजपत्ता.

हे वाचा:   गॅरंटी देतो हे करून बघा, आता तुमचं मन कोणीही दुःखवू शकणार नाही.!

जो की आपण मसाल्यामध्ये वापरतो आणि प्रत्येक घरामध्ये असतो. तेजपत्ता घेऊन याला तोडून यामधे टाकायच आहे जेणेकरून यामधून असा याचा वास येतो, सुगंध येतो त्यामुळे यामध्ये आळीजाळी पडत नाही आणि हे लवकर खराब होत नाही. ओला तेजपत्ता वापरायचा नाही, पूर्णपणे वाळलेला तेजपत्ता वापरा, 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल.

पुढची टीप म्हणजे कपडे वाळवणं. पावसाळ्यात कपडे थोडेफार वाळतात पण ओले कपडे राहिले की त्यामधून असा वास यायला लागतो की अगदी ते घालावेसे वाटत नाहीत. परत धुतले तर परत ते कपडे वाळण्याचा प्रश्न पडतो. नक्कीच तुम्हालाही अशा समस्या पावसाळ्यामध्ये येत असतील तर आता बघा यावरती आपण खूपच सोपा उपाय असा काढलेला आहे, जेणेकरून कपडे छान वाळतील, आंबट ओले असतील तर अजूनच लवकर आपलं हे काम होईल. तर इथे आपल्याला लागणार आहे कढई. तुम्ही अशा प्रकारचं पातेलं मोठं भांडं काही घेऊ शकता. फक्त इथे जाळीदार असेल तर जाळीदार घ्या किंवा अशाप्रकारे थोडं उंच मोठं घ्या. आता बघा इथे गॅस ऑन करून मी हे अस ठेवलेल आहे, अगदी लो गॅस ठेवायचा आहे फुल करायचा नाही.

इथे गॅसवरती आपण अशाप्रकारे जी कढई आहे ती टाकलेली आहे आणि जो ओला, आंबट ओला कपडा आहे तो आपल्याला असा टाकायचा आहे. आता प्रत्येक कपडा आपण असा वाळवणार नाही. पण बऱ्याच वेळा इमर्जन्सीला अचानक सकाळी सकाळी घाई असते लहान मुलांच्या शाळा म्हणा ऑफिस म्हणा काही असतं आणि त्यावेळेस एखादा कपडा जो आपल्याला पाहिजे असतो तोच नेमका ओला राहतो तर अशा वेळेस तुम्हाला कपडे वाळवण्यासाठी ही ट्रिक खूप कामी येणार आहे. सकाळी सकाळी घाई गडबडीत अंडर गार्मेंट्स वाळलेले नसतात, बरेच जण तर त्याला गॅस वरती असं धरून वाळवायचा प्रयत्न करतात त्यामुळे एक तर कपडा जळू शकतो आणि हातालाही चटके बसू शकतात.

पण त्या कमी वेळामध्ये आणि अगदी व्यवस्थित आपला कपडा वाळतो. हे खूपच लवकर होत. एकदा नक्की ट्राय करून बघा. पावसाळ्यामध्ये आंबट ओले कपडे अशा प्रकारे तुम्हाला सहज कुठे इमर्जन्सीच्या वेळी जाताना वाळवता येतील. तर मित्रांनो जर हा लेख आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला विसरू नका.