फक्त 1 मिनिटांत पुजेची तांबे पितळाची भांडी करा स्वच्छ.. घरच्या घरी बनवा ही पावडर.!

ट्रेंडिंग

मित्रांनो तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणखी एका नवीन लेखात. पितांबरी न वापरता आज आपण खूप मस्त अशी घरीच पितांबरीची पावडर तयार करणार आहोत आणि तेही घरगुती साहित्यामध्ये. चला मग आजच्या लेखाला सुरुवात करूया. तर इकडे तुम्ही माझ्याकड़े जे आहे ते तांब्याच एक ताट आहे आणि एक तांब्या आहे. तर तुमच्याकडे तांब असेल, पितळ असेल, स्टील, अल्युमिनियम असेल, तर जी आपण पावडर बनवणार आहोत जी अगदी पितांबरी सारखी वर्क करणार आहे. घरगुती साहित्य वापरून ती पावडर आपण बनवणार आहोत.

ही जी पावडर आहे ती तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता. यानंतर तुम्ही कधीच पितांबरी पावडर किंवा कोणती वेगळी पावडर कधीच आणणार नाही. ही पावडर घरगुती साहित्यामध्ये जर तुम्ही एकदा बनवून ठेवली की खराब सुद्धा होत नाही. चला तर मग आता ही पावडर अगदी इझी आहे बनवण्यासाठी तर त्यासाठी आपण थोड्याशा मोठ्या प्रमाणातच ही पावडर बनवणार आहोत.

आता इथे मी घेतलेल आहे सगळ्यात पहिला इंग्रेडिएंट ते म्हणजे गव्हाचं पीठ. तर आपल्याला इकडे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. चला आता आपण घालणार आहोत यामध्ये दुसरा इंग्रेडिएंट तो म्हणजे मीठ, तर इकडे आपल्याला तीन चमचे गव्हाच्या पिठासाठी दोन चमचे मीठ घालायच आहे. मीठ जे आहे यामध्ये आवर्जुन घालायचे आहे. मीठ खूप छान काम यामध्ये करते. स्क्रबिंग च काम करते आणि खूप मस्त आपले भांडे निघतात. त्यामुळे मीठ यामध्ये आवर्जुन घालायचे आहे.

हे वाचा:   अशाप्रकारचे पायाचे बोटे असेल तर, आशा महिला असतात खूपच रागीट

तिसर आपला इंग्रेडिएंट आहे तो म्हणजे बेकिंग सोडा. बेकिंग सोडा सुद्धा आपण इकडे दोन चमचे घालायचे आहेत. तुमच्याकडे बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही बेकिंग पावडर घेऊ शकता. बेकिंग सोडा म्हणजेच खायचा सोडा. आता इकडे आपल्याला घालायचा आहे सगळ्यात शेवटचा इंग्रेडिएंट आणि तो खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आपल्याला इकडे घालायच आहे लिंबूसत्व.

आता बघा हे लिंबूसत्व जे आहे ते माझ्याकडे पावडर फॉर्म मधलं आहे जे की इंग्लिश मध्ये त्याला सिट्रिक ऍसिड म्हटलं जातं. पावडर फॉर्म मध्ये असल्या कारणाने मी हे यामध्ये घातलेल आहे. आता हे सगळे इंग्रेडिएंट आपल्याला घालायचे आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये.

मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर याला छानपैकी फिरवायच आहे आणि छानपैकी फिरवल्यानंतर आपलं जे काही लिंबूसत्व अस्त ते ऑलरेडी बारीक होऊन जाईल आणि सगळी पावडर एकसारखी मस्त अशी फिरली जाईल आणि मस्त पितांबरी सारखच ते दिसून येईल. जर तुमच्याकडे सिट्रिक ऍसिड पावडर फॉर्म मध्ये जरी असली तरी पण तुम्ही जर एकदा हे व्यवस्थित रित्या मिक्सरमध्ये फिरवलं तर फार उत्तम होईल. आता सगळं व्यवस्थितरित्या मिक्स करायचे आहे, लिंबू सत्वामध्ये थोडसं ज्या काही थोड्या थोड्या छोट्या गाठी असतात तर त्या मोडत व्यवस्थितरित्या हे मिक्स केल गेलं पाहिजे आणि हे आपलं मस्त असं पितांबरीच पावडर तयार होतं.

हे वाचा:   इस्त्री करणाऱ्या लोकांनी एकदा नक्की वाचा, खूप फायदा होईल.! इस्त्री करताना जर वापरल्या ह्या टिप्स तर होईल फायदाच फायदा.!

पण यामध्ये आपल्याला अजून एक इंग्रेडिएंट घालायचा आहे तो म्हणजे आपला कलर. आता कलर घालायची खरं तर काही आवश्यकता नाहीये. पण पितांबरीचा कलर जसा फेंट पिंकिश असतो तसा तुम्ही तो करू शकता. कलर घाल्यानंतर छानपैकी मिक्स करूयात. तुमच्याकडे जर लिक्विड कलर असेल तो घालू शकता किंवा मग तुम्ही असा कोरडा पावड कलर घातला तरीही चालेल पण हे घालायची अशी गरज नाही. आपला अजून एक इंग्रेडिएंट बाकी आहे, सगळ्यात मेन इंग्रेडिएंट बाकी आहे, तो सुद्धा आपण जे आहे ते घालणार आहोत. पण सगळ्यात प्रथम आपल्याला हे व्यवस्थितरित्यी मिक्स करणं खूप गरजेच आहे.

आता बघा हे व्यवस्थित इत्या मिक्स झाले आणि याला छान मस्त असं पितंबरी सारखं टेक्सचर आलेल आहे. आता ही पावडर वापरून तुम्ही तांब्या, पितळाची भांडी व्यवस्थित साफ करू शकता. तर मित्रांनो आजचा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. आजचा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा.