नळ स्वच्छ करायची नवीन घरगुती पद्धत.. फक्त 2 मिनिटात करा नळ स्वच्छ.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखात अगदी साध्या सोप्या पद्धतीने नळ स्वच्छ करण्याच्या काही टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत. बाथरूम मधले जे नळ असतात ते आपण वेळोवेळी साफ नाही केल तर हे भरपूर असे खराब होतात. कितीही जुने खराब झालेले नळ तुम्ही अशा पद्धतीने घरातील काही गोष्टींचा वापर करून स्वच्छ करू शकता. भरपूर दिवस याला तुम्ही साफ केलं नसेल तरी सुद्धा हे नळ तुमचे अगदी नव्यासारखे स्वच्छ होतील. तर नळावर सतत पाणी पडलं जातं आणि ते आपण वेळोवेळी स्वच्छ नाही केलं तर मग हे नळ खूप खराब होतात.

तर हे साफ करण्यासाठी घरातच आपण काही गोष्टींचा युज करतो किचनमध्ये, त्याच गोष्टी युज करायच्या आहेत आणि आपण हे जे बनवलेल सोलुशन आहे ते असं सगळ्या नळाला व्यवस्थित सगळीकडे एकसारख अस लावून घ्यायच आणि ज्या ठिकाणी जास्त खराब झालेल आहे तिथे डबल परत एकदा लावून घ्यायचं आहे. त्यानंतर नळावरती हे जे डाग पडलेले आहेत निघून जातात.

हे जे बनवलेल सोलुशन आहे ते लावून दहा मिनिटासाठी ठेवून द्यायचं आणि दहा मिनिटानंतर परत तुम्हाला घासणी घ्यायची, स्टीलची घासणी घेतली तरी सुद्धा चालते. त्याने तुम्ही हे घासू शकता आणि ज्या ठिकाणी जास्त खराब झाले त्या ठिकाणी आपल्याला थोडसं जास्त जरा घासून घ्यायचं आहे आणि बाकींच म्हणजे सगळीकडे आपल्याला हे व्यवस्थित घासून घ्यायच आहे.

अशा पद्धतीने व्यवस्थित नळाचा प्रत्येक कोपरान कोपरा आपल्याला साफ करून घ्यायचा आहे. आता भरपूर दिवस तुम्ही नळ स्वच्छ केले नसतील तर मग हे नळ अशा पद्धतीने खराब होतात. वेळोवेळी याला स्वच्छ ठेवलं तर मग एवढं ते खराब होत नाही पण आपण याकडे दुर्लक्ष केलं की त्यावरती खूप डाग साठत जातात. तर प्रत्येक ठिकाणी असं व्यवस्थित घासून घ्यायच आहे.

हे वाचा:   तुमच्याकडे फ्रिज असेल तर नक्की वाचा.! फ्रिज संबंधीच्या या समस्या कोणालाही येत असतात.! प्रत्येकाने माहिती असू द्यावे.!

आणि असं घासल्यानंतर तुम्ही नक्कीच एकदा या पद्धतीने तुमचे पण नळ स्वच्छ रून बघा. छान स्वच्छ होतात. तर घासताना फक्त सगळीकडे व्यवस्थित घासून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपल्याला पाण्याचा युज अजिबात करायचा नाही. थोडीशी पितांबरी ज्या ठिकाणी वाटलं तुम्हाला अजून इथं थोडेफीर डाग आहेत तर ही कोरडी पितांबरी सुद्धा तुम्ही आहे अशी युज करू शकता आणि तिथं घासून घेतलं तर जे काही थोडेफार राहिलेले डाग आहेत ते सुद्धा पटकन निघून जातात.

तर सगळींकडे बघा हे व्यवस्थित असं मी साफ करून घेतलेलं आहे. पूर्ण साफ झाल्यानंतरच आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तोपर्यंत इथं अजिबात पाणी युज करायचं नाही. म्हणजे काय होतं की आपण जे सोल्युशन बनवलेल आहे त्याचा चांगला रिझल्ट येतो आणि बघा नळ आता धुतल्यानंतर तुम्हाला फरक दिसून येतो. अगोदर आणि नंतर किती खराब झालेले हे नळ होते. पण अगदी कमी वेळात आणि कमी मेहनतींत तुम्ही ह्या पद्धतीने स्वच्छ करू शकता. घरातीलच काही गोष्टींचा आपल्याला इथं युज करायचा आहे. तर यावरती बऱ्याच वेळा काय हौत की आपण नळावरती जे पाणी असं साटलेलं राहत धुतल्यानंतर ते पुसून नाही घेतलं की तेच डाग साठत जातात आणि हळूहळू ते नळ पूर्णपणे खराब दिसतात.

तर आता ह्यासाठी लागणार सोलुशन म्हणजे बेकिंग सोडा घ्यायचा, हा तर नेहमीच आपल्या किचन मध्ये सोडा असतो, खाण्यासाठी जो आपण युज करतो तो अर्धा चमचा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर एक चमचा एवढं मीठ पण यामध्ये टाकायच आहे. तर मिठाने सुद्धा घरातल्या बऱ्याच गोष्टी आपण क्लीन करू शकतो आणि कोणतीही वॉशिंग पावडर, निरमा पावडर जी तुम्ही कपडे धुण्यासाठी युज करता ती घेऊ शकता. एक चमचा एवढी पावडर घ्या आणि मेन म्हणजे आपल्याला इथं पितांबरीचा युज करायचा आहे.

हे वाचा:   फक्त ही एक गोळी आणि घरातील पालीपासून कायमची सुटका; घरगुती रामबाण उपाय.!

पितांबरीने जशी पितळीची वगैरे भांडी स्वच्छ होतात तसेच स्टीलच्या गोष्टी सुद्धा ह्याने स्वच्छ होतात. तुमच्या घरातले सगळेच नळ तुम्ही ह्या पद्धतीने स्वच्छ करू शकता. पितांबरीचा फार छान रिझल्ट येतो आणि त्याचबरोबर यामध्ये आपण घरातील काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत त्यामुळे अजूनच आपण जे सोलुशन बनवणार आहे ते स्ट्राँग बनते. आणि कमी वेळात तुम्ही तुमचे नळ असतील ते स्वच्छ करू शकता आणि या तयार केलेल्या मिश्रणात आपल्याला फक्त लिंबाचा रस यामध्ये टाकायचा आहे. पाणी आपल्याला अजिबात टाकायचं नाही.

अजून थोडस लिंबू यामध्ये लागणार आहे तेवढं टाकून घ्यायचं. विनेगर असेल तर तुम्ही विनेगरचा सुद्धा युज करू शकता. पाणी न टाकता थोडस विनेगर टाकायचं किंवा पूर्ण लिंबाचा रस टाकला तरी सुद्धा चालू शकतं. यामुळे काय होत की लिंबू सुद्धा क्लिनिंग साठी आपल्याला खूप हेल्प करत आणि आपले नळ यामुळे पटकन स्वच्छ व्हायला मदत होते. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अगदी घरच्याच काही गोष्टींचा वापर करून नळ स्वच्छ करू शकता. तर आजचा हा लेख आणि यामधील ट्रिक कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा आणि जर ही ट्रिक आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा.