नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांच खूप खूप स्वागत आहे. आता बाजारामध्ये भरपूर मेथी यायला लागली आहे पण मेथी खावीशी कोणाला नाही वाटत, सगळ्यांनी वाटते पण ती निवडायला फार वेळ लागतो आणि कंटाळवाण पण वाटतं. तर मेथी आता मिनिटांमध्ये नाही तर सेकंदामध्ये कशी निवडायची ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. चला सगळ्यात पहिल्या टिपला सुरुवात करूयात. लाईटर तर हे रोज आपल्याला लागतच कारण गॅसवरती रोजच जेवण, नाश्ता, सगळ बनत असतं पण या लाईटर् मध्ये काय होत की घान साचत चालते, चिकटपणा साचत चालतो.
मग काय करायचं तर घरामध्ये अशा पद्धतीची बघा इअर बड्स असतात तर त्याचा वापर तुम्ही हे क्लीन करण्यासाठी नक्कीच करू शकता. कारण इअर बड्स ला अशी कापूस असतात. तर जी काही घाण आहे ती या कापसाला चिटकते आणि जिथे जिथे डिझाईन आहे ते व्यवस्थित निघत नसेल तर टूथपिकचा वापर करून हे लाईटर तुम्ही नेहमी क्लीन केलं तर ते कधीही स्वच्छ राहत आणि चिकट सुद्धा जास्त होत नाही. ही ट्रिक फॉलो करून नक्की बघा. नंतरची ट्रिक आहे या डबल टेप रिलेटेड. ही जी डबल टेप असते ती दोन्हीही बाजूंनी जी आहे ती चिकट असते त्यामुळे याचा खूप साऱ्या गोष्टींसाठी वापर आपण करू शकतो. तर तोच काहीसा वापर आज एका खूप युजफूल गोष्टीसाठी तुम्हाला सांगणार आहे. ही डबल टेप घ्यायची आहे आणि किचन वरची जी भिंत असते प्लॅटफॉर्मच्या वरती तिथे अशा पद्धतीने लावायची.
व्यवस्थित हे लावल्यानंतर त्याचं वरील कव्हर काढून घ्यायच. आता याचा वापर तुम्ही सगळ्या काही वेगवेगळ्या गोष्टीसाठी करू शकता. त्यातली एक गोष्ट म्हणजे घरामध्ये चाकू अशा पद्धतीने तुम्ही यावर चिटकून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला काढायलाही सोपं जातं. त्याचबरोबर घरामध्ये कैची वगैरे असेल तर ते सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने ठेवू शकता. खूप इंटरेस्टिंग आणि युजफूल असा हॅक आहे. त्याचबरोबर सेम पद्धतीने तुम्ही बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चिटकवू शकता. ही ट्रिक फॉलो करून बघा तुम्हाला खूप आवडेल.
त्यानंतरची ट्रिक आहे फुग्या रिलेटेड. तर घरात एखाद दोन फुगे असतील आणि जर ते फुटलेले असतील तर काय करायचं त्याचा वापर तुम्ही घरामध्ये करू शकता. तर त्याच पद्धतीने याचे छोटे छोटे काप तुम्हाला करून घ्यायचे आहेत. घरामध्ये बऱ्याचदा असं होतं की आपल्याकडे युज अँड थ्रोचे रबर बैंड नसतात मग आपण फुग्याचा वापर करून युज अँड थ्रोचे रब्र बँड घरीच तयार करू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही कापले की हे युज अँड थ्रोचे रबर बैंड तयार झाले आहेत.
कोणतीही गोष्ट जी तुम्हाला लावून घ्यायची असेल तर ह्या रबर बँडचा वापर तुम्ही करू शकता. अगदी जसे आपण मॉर्केट मधून रबर बँड विकत आणतो अगदी तशाच पद्धतीचे रबर बँड घरच्या घरी तयार होतात. तर कोणतीही गोष्ट ही सील करण्यासाठी किंवा पॅक करण्यासाठी अशा पद्धतीने तुम्ही या रबर बँडचा वापर नक्कीच करू शकता. खूप युजफूल अशी ही फुग्याची ट्रिक आहे.
नंतरची ट्रिक आहे गाजर रिलेटेड. गाजराचा हलवा कोणाला नाही आवडत. तर आज मी तुम्हाला हे गाजर जे आहे ते ग्रेटरचा वापर न करता एकदम सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने तुम्ही ग्रेट करून घेऊ शकता ते सांगणार आहे. तर मार्केटमध्ये पिलर भेटत की ज्यामध्ये तीन ब्लेड असतात, तर तीन वेगवेळे ब्लेड असतात त्यामधलीच एक ब्लेड ती म्हणजे तिला असं zigzag असतं तर त्या ब्लेडचाच आपल्याला वापर करायचा आहे. त्यानंतर घ्यायचा आहे गाजर.
गाजर घेतल्यानंतर हे ब्लेड जे आहे जिथून आपल्याला गाजर किस करायचा, आणि zigzag अशा पद्धतीने तुम्हाला जेवढं छोटा आणि मोठा गाजरचा किस हवा त्या पद्धतीने तुम्हाला ओढत राहायचा आहे. एक गाजर हे अगदी पाच ते सहा सेकंदामध्ये जे आहे किसून तयार होतं. नक्की या पद्धतीने तुम्ही करून बघा. तुम्हाला किसणीची सुद्धा आवश्यकता वाटणार नाही.
नंतरची ट्रिक आहे मेथी रिलेटेड. आता बाजारामध्ये मेथी भरपूर आणि फ्रेश येत आहे, त्यामुळे मेथी आपण नेहमीच खात असतो. तर अशा वेळेस मेथीची जुडी आणली की ती निवडण्यासाठी भरपूर वेळ लागतो. खायला तर सगळ्यांनाच आवडतं त्यामुळे आपण थोडा कंटाळ करतो पण आज तुम्ही चाळणीचा वापर करून ही मेथीची भाजी कशी निवडावी त्याची ट्रिक तुमच्या सोबत शेअर करणार आहे. तर अशा पद्धतीची बघा चाळणी आपल्या घरी अवेलेबल असते. अशी चाळणी तुम्हाला घ्यायची आहे की जिचे होल ना जास्त मोठे असतात ना जास्त लहान असतात. ह्या चाळणीचा वापर आपल्याला करायचा आहे.
चहाची चाळणी वगैरे आपल्याला इकडे लागणार नाही. त्यानंतर घ्यायची आहे मेथी. मेथी बघा अशा पद्धतीने एक एक घ्यायची आहे आणि तिचा जो खालचा पार्ट आहे मुळाचा तो कट करायचा आणि नंतर अशा पद्धतीने या छिद्रामध्ये घालायचे. त्यानंतर त्याचे पान अलगत वरती राहतात आणि खाली जे आहे अशा पद्धतीने त्याचे देठ निघतात. खूप व्यवस्थितरित्या तुम्ही मेथी अशाच पद्धतीने क्लीन करू शकता. सगळी मेथी अगदी फास्ट फास्ट क्लीन होते. तर मित्रांनो तुम्हाला या ट्रिक कश्या वाटल्या ते आम्हाला नक्कीच सांगा. या सगळ्या ट्रिक मधली तुमची सगळ्यात फेवरेट ट्रिक कोणती तेही आम्हाला सांगा. आणि हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा.