लसूण सोलण्याची जादुई पद्धत; रवी ची कमाल… महिलांनी एकदा नक्की बघा.!

ट्रेंडिंग

नमस्कार, आजच्या या लेखात आपण खूपच महत्त्वाच्या काही टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत ज्यामुळे आपली अवघड किचकट कामे सोपी होतील, त्यासोबत भरपूर पेशांची बचत होईल. चला तर मग लेखाला सुरुवात करुयात. हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा. बऱ्याच वेळा साधी काटेपीन वापरली की ती साडीमध्ये अडकते आणि यामुळे साडीला छिद्र पडतात त्यासोबत साडी देखील फाटण्याची शक्यता असते. आता यासाठी बॉलपिना येतात पण आपल्याकडे त्या नसतील तर काय करायचं? अशा वेळेस आपल्या महागड्या साड्या यामुळे खराब होऊ शकतात पण याच वेळी तुम्हाला आपल्या साध्या पिनलाच बॉल पिन सारखं बनवता येईल, तेही घरातील कोणत्याही गोष्टीचा उपयोग करून.

तर इथे मी घेतलेला आहे प्लास्टिकचा एक छोटासा तुकडा, थोडा जाड तुकडा घ्या किंवा तुम्ही सिल्व फॉईल घेऊ शकता. एखादा मनी असेल तर तो वापरला तरी चालेल किंवा रबर असेल तर रबरचा छोटा तुकडा जरी वापरला तरी चालेल. अशा भरपूर वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही वापरू शकता आणि आपल्याला हा भाग खाली जो सर्कल असतो त्यामध्ये टाकायचा आहे ज्याने अजिबात आपल्या साडीचा दोरा यामधे अडकत नाही आणि यामुळे आपली ही छोटीशी साधी पिन अगदी सहज बॉलपिन सारखं काम करते.

यानंतरची आपली टिप आहे आता पावसाळ्यामध्ये अगदी मसाल डब्ब्यामधील गोष्टी ओलसर व्हायला लागतात आणि जास्त करून तर जिरे खूप जास्त लवकर ओले होतात. तर असं होऊ नये यासाठी काय करायचं? एक तर जिरे आणि मोहरी एकत्र ठेवायच्या जेणेकरून अजिबात जिऱ्यामध्ये ओलसरपणा येत नाही किंवा जर तुमचे मसाले देखील ओलसर होत असतील तर एक आपण पॉलिथीन कॅरी बॅग कट करायची आहे आणि जे झाकण आहे मसाला डब्ब्याचं त्यावरती लावायची आहे जेणेकरून अजिबात यामध्ये हवा जात नाही आणि यामधील गोष्टी खराब होत नाहीत, ओलसर होत नाहीत. यासाठी इथे पातळ कॅरी बॅग वापरा जेणेकरून कसं व्यवस्थित हे झाकण घट्ट बसत. जाड जर लावलं तर ते झाकण व्यवस्थित बसणार नाही.

हे वाचा:   कांगव्याच्या साह्याने बनवा अशी डिझाईन ची मेहंदी, एकदा काढली तर लोक बघतच राहतील.!

यानंतरची आपली टिप आहे किचन टॉवेलसाठी. किचनच्या कपड्याचा सारखा आपण वापर करत असतो, ओलसरपणामुळे यामध्ये वास येतो आणि याला सारखं सारखं धुवावं लागतं. एक तर आपलं काम वाढतं आणि पावसाळ्यात हे कपडे वाळत नाहीत तर यासाठी एक खास महत्त्वाची टीप आहे यामुळे तुम्हाला याला सतत धुवत बसायची गरज नाही आणि तुमचे कपडे देखील तुम्हाला वाळलेले मिळतील. तर यासाठी आपल्याला एक जुना कपडा घ्यायचा आहे. कोणतेही जुने कपडे जे असेच आपण फेकून देतो, काही ना काही पुसण्यासाठी वापरतो. पण खास किचनमध्ये काय करायचं तर एखादा जुना कपड़ा स्वच्छ करून घ्यायचा. त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे.

तुम्ही जेवढे छोटे मोठे पाहिजेत त्यानुसार त्याला कट करू शकता आणि एखाद्या डब्यामध्ये ठेवायचं किंवा पॉलिथीनमध्ये किंवा इकडे तिकडे असं ठेवून द्यायचं आणि तुम्हाला पाहिजे तेव्हा एक छोटासा याचा भाग काढायचा आणि जिथे ओलसरपणा आहे, काही तुम्हाला पुसायच आहे तिथे याने पुसायचं. म्हणजे काय होतं आपले जे किचनचे कपडे आहेत ते जास्त घान होत नाहीत आणि त्याला आपल्याला सारखं सारखं धुवंत बसायची गरज पडत नाही. आता हे जे छोटे छोटे तुकडे आपण जुन्या कपड्याचे केले होते ते आपण कस पुसून फेकून देऊ शकतो. अगदी रियूज करायची गरज नाही. कारण की जुनेच कपडे असतात त्यामुळे आपण याला फेकून देऊ शकतो आणि यामुळे काय होतं सारखं सारखं हे कपडे धुवायला वेळ जात नाही. त्याच सोबत आपले किचन टॉवेल्स मेन म्हणजे खराब होत नाहीत.

हे वाचा:   हा आहे जादुई उपाय जो तुमची ब्लँकेट, चादर, गोधडी फक्त दहा मिनीटात साफ करून टाकेल.!

यानंतरची आपली टिप आहे बटाट्यासाठी. आता बघा बऱ्याच वेळा काय होतं की बटाटा उकडला की हाताने असा बारीक करायचा म्हणलं किंवा हाताने याची साल काढायची म्हणल की खूप जास्त आपल्या हाताला भाजल्या जात, वेळ लागतो. तर असं होऊ नये यासाठी काय आपण गडबडीत ते काम करतो पण पराठ्यासाठी जर बटाटे लागणार असतील किंवा बटाट्याचा शिरा करायचा असेल तर बारीक बटाटा हवा असतो, गाठी नसल्या पाहिजेत असं आपल्याला पाहिजे असतं.

तर यासाठी काय करायचं अशापकारे पुरणाची ही गाळणी घ्यायची किंवा तुम्ही खिसणी घेऊ शकता इतर कोणतीही गोष्ट अशी घेतली जाळीदार की त्यावरती बटाटा असा घासून घ्यायचा जेणेकरून याचा वरचा भाग खूप छान असा वेगळा होतो आणि बटाटा असा एकजीव बारीक होतो. आपले पराठे फुटत नाहीत किंवा अगदी हाताने याला मॅश करायची बारीक करायची गरज पडत नाही. घरातीलच असलेल्या गोष्टींचा वापर करून ही कामं सोपी होतात. तर मित्रांनो आजचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. लेख आवडला असेल तर तो तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.