आपल्यावर जळणाऱ्या लोकांना कसं हॅण्डल करणार.. न बोलता असा शिकवा धडा.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण अशा सहा गोष्टी बघणार आहोत ज्या करून तुम्ही तुमच्या शत्रू किंवा तुमचं न पटणाऱ्या लोकांना भांडण न करता हरवू शकता, त्यांना नेस्तनाबूत करू शकता. असं म्हणतात की माणूस जेवढ्या लवकर यशस्वी होतो किंवा त्याला यश मिळत जातं तेवढ्या लवकर त्याच्या शत्रूमध्ये वाढ होत जाते. त्याच्यावर जळणाऱ्या लोकांमध्ये वाढ होत जाते. याचा कोणाला दोष देणं चुकीच ठरेल कारण हा मनुष्य स्वभाव आहे शेवटी. हे कलियुग आहे आणि इथं आपल्या यशावर खुश होणाऱ्या लोकांपेक्षा जळणारे लोक जास्त मिळतील आणि या ईर्षा करण्याने समोरचा नकळत आपला शत्रू होऊन बसतो आणि कुठल्याही परिस्थितीत तो आपल्याला खाली पाडायला किंवा खाली खेचायला बघत असतो.

मित्रांनो आपली बाजू किंवा आपला मार्ग खरा असेल, सत्याचा असेल तर तो कधीच सोडायचा नाही. समोरचा आपल्याला कितीही काहीही बोलला तरी त्याच्या पात‌ळीवर वागायला जायचं नाही. महाभारतात दिलेली शिकवण लक्षात ठेवायची. नेहमी धर्माचा, सत्याचा विजय होतो आणि अधर्म असत्याचा नाश होतो. जसं पाच पांडवांचा विजय झाला 100 कौरवांसमोर, अगदी तसं. म्हणून नेहमी लक्षात ठेवा समोरच्याला खाली पाडण्यासाठी आपल्याला कटकारस्थान करण्याची गरज नाही. आपलं यश किंवा आपली सत्याची बाजू त्याला खाली खेचण्यासाठी पुरेस आहे.

नंबर दोनः प्रत्येक, व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीमध्ये दोष बघण्याची सवय असते. माणूस स्वतः मध्ये काय दोष आहेत ते कधीच बघत नाही. समोरचा किती अपराधी आहे हेच बघतो. आपण स्वतः काय अपराध केले आहेत हे कधीच पाहत नाही. काही लोकांना सवय असते. एखाद्याने कितीही चांगलं काम केलं तरी त्याला नाव ठेवायचे. त्यातले दोष काढायचे. म्हणून अशा दोष काढणाऱ्या लोकांच्या नादी लागायचं नाही. त्यांच्याशी वाद घालण्यात आपला वेळ वाया घालवायचा नाही.

हे वाचा:   श्रावण महिन्यात का मांसाहार का करत नाही माहिती आहे का.? श्रावण महिना या कारणांमुळे आहे खूप शुद्ध महिना.!

नंबर तीनः शत्रूला कधीही कमी समजायचं नाही. आपण यश मिळवल आहे म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या शर्यतीत आपल्याला टक्कर देण्यासाठी कोणी नाही असा समज करून घेऊ नका. आणि सगळे एकत्र येऊन तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतील तर अशा वेळेस घाबरून जाऊ नका. स्वतःवर विश्वास कायम असू द्या. कोणी कितीही अडचणी निर्माण केल्या तरी दृढ विश्वास ठेवा. कधीच कोणासमोर हार मानू नका, आपल्या शत्रूची सगळी माहिती असू द्या, यातच आपण आपली 80% लढाई जिंकलेली असते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, स्वतःहून पहिला वार करायला जाऊ नका.

नंबर चारः आपल्या रागावर नियंत्रण ठेवा, स्वतःवर संयम ठेवा. माणूस रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलतो किंवा अशा काही गोष्टी करतो ज्या करायला नकोत. ज्या गोष्टींमुळे तो स्वतः अडचणीत सापडतो, ते फक्त त्याच्या रागामुळे, समोरचा आपल्यावर जळतो आहे, आपली ईर्षा करतो आहे, म्हणून रागात येऊन त्याच्याशी भांडायला जाऊ नका. रागात येऊन भांडण करायला जाल तर स्वतःच्या कमजोर बाजू समोरच्याला दिसणार आणि तुमचं नुकसान होणार, तेव्हा स्वतःच्या रागाला कंट्रोलमध्ये ठेवा. रागात माणूस आपली विचारशक्ती गमावतो आणि चुकीचं काहीतरी करतो. म्हणून ज्याने आपल्या रागावर कंट्रोल मिळवला त्याने अर्धी लढाई जिंकली.

हे वाचा:   फक्त ५ मिनिटांत जुन्या प्लास्टिक पिशवी पासून बनवा झेंडूची अशी फुलं, एकही रुपया खर्च न करता.!

नंबर पाचः बुद्धिहीन व्यक्तींपासून कायम दूर राहायचं. बुद्धिहीन व्यक्ती या पिशाच्च समान असतात. बुद्धिमान व्यक्ती अशा लोकांपासून कायम दूर राहते कारण त्याला माहित असते बुद्धिहीन व्यक्ती दुष्ट लोकांना हाताशी धरून आपल्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. दुष्ट लोकांसोबत कधीही संगत ठेऊ नये. ज्यांची नियत साफ नसते अशा लोकांपासून कायम दूर राहावे.

नंबर सहा: स्वभावात कठोरपणा असू द्या. कधी कधी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या खराब लोकांना सभ्यतेची भाषा कळत नाही. जशास तसे उत्तर कळून येते. म्हणून समोरच्याला आपण कमजोर आहोत असं कधीही दिसून येता कामा नये. आपण सगळ्या गोष्टींना समर्थपणे तोंड देऊ शकतो तेवढा आत्मविश्वास समोरच्याला आपल्या वागण्या दिसायला हवा, जेणेकरून तो आपल्या वाटेला जाणार नाही. आपल्या स्वभावात कडवटपणा असू द्या आणि शत्रूला तो वेळोवेळी दिसायला हवा. कठोर वागताना किंवा जशास तसे उत्तर देताना आपला सत्याचा मार्ग सुटता कामा नये. कितीही अडचणी आल्या तरी आपली लढाई ही चांगल्या हेतूने आणि चांगल्या कामांसाठीच असायला हवी. आजचा हा लेख जर तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा, तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत हा लेख नक्की शेअर करा.