आळस पूर्णपणे घालवण्यासाठी ५ सोपे मार्ग… प्रत्येक दिवस जाईल उत्साहात.!

ट्रेंडिंग

मित्रांनो मित्रांनो, आजच्या लेखात आपण पाच असे मार्ग बघणार आहोत, ते जर तुम्ही तुमच्या आयुष्यात उतरवले तर खात्री देऊन सांगतो, तुम्हाला आयुष्यात कधीच आळस येणार नाही. फक्त तुम्हाला आमची विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत वाचा. पहिले आहे, आयुष्यात मोठे ध्येय ठेवा, मोठे लक्ष ठेवा. माणसे ध्येयहिन का बनतात? कारण ते त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठे करण्यासाठी आलेले नसतात.

ध्येयहिन मनुष्याची हालत त्या कुत्र्यासारखी असते, जो कुत्रा कोणतीही गाडी आली की त्याच्या मागे पळत सुटतो. तो कुत्रा त्या गाडी बरोबर दम लागेपर्यंत पळतो आणि मग शांत बसतो. परत काही वेळाने दुसरी गाडी आली की त्याच्या मागे पळतो. तो कुत्रा का पळतो, कशामुळे पळतो हे त्याला सुद्धा माहित नसते. ज्या माणसाच्या आयुष्यात धेय नसतात त्याच्याबरोबर सुद्धा असेच चाललेले असते. त्याला जर तुम्ही प्रश्न विचारला ना तू का जगतो तर तो उत्तर देईल की सगळे जगतात म्हणून मी मी जगतो. त्याला विचारा, तुला आयुष्यात काय करायचे आहे? तो उत्तर देईल, जे सगळे करतील तेच मी करेल. म्हणून मित्रांनो, लक्षात ठेवा, माणूस सुस्त आणि आळशी तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या आयुष्यात काही मोठे ध्येय नसतात, मोठे लक्ष असतात.

याउलट ज्या माणसाच्या आयुष्यात ध्येय असतात ना, तो माणूस तुम्हाला कधी सुस्तावलेला दिसणार नाही. तो अक्षरश त्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी झपाटलेला असतो. त्याला दिवसातले 24 तास सुद्धा कमी पडतात कारण त्याला आयुष्यात काहीतरी मोठे मिळवायचे असते. म्हणून तुम्हाला आळस पूर्णपणे घालवायचा असेल तर पुढच्या एक वर्षाचे, पाच वर्षाचे, दहा वर्षाचे ध्येय आजच लिहून ठेवा आणि ते पूर्ण करण्यासाठी कामाला लागा.

हे वाचा:   वॉशिंग मशिन मध्ये कपडे टाकल्यानंतर ते जर एकमेकांना चिकटून बसत असतील तर अशा वेळी करायचे हे एक काम.!

दुसरे आहे पौष्टिक अन्न खाणे. मित्रांनो, तुम्ही जर तळलेले मसालेदार पदार्थ खात असाल किंवा जंक फूड जसे की नूडल्स, बर्गर, पिझा असे अन्न खात असाल तर तुमची इच्छा नसताना सुद्धा तुम्हाला आळस येईल. कधीतरी मजा म्हणून हे खाणे ठीक आहे पण अशा पदार्थांचे सेवन सातत्याने होत असेल तर मग तुम्ही स्वस्त व्हाल म्हणून आळस घालवण्यासाठी तुम्ही खाता काय हे खूप महत्त्वाचे आहे. जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या, फळे, ड्रायफ्रूट्स ह्या गोष्टींवर तुम्ही भर दिला तर तुम्ही नेहमी उत्साही आणि ऊर्जेने भरलेले असाल.

तिसरे आहे प्रत्येक दिवशी तुम्हाला काय करायचे आहे याची यादी बनवा. मित्रांनो, तुम्हाला आळस घालवायचा असेल तर रोज सकाळी तुम्हाला दिवसभरात काय काय करायचे आहे याची यादी बनवा. याने एक प्रकारची तुम्हाला दिवसभरात काय करायचे आहे याची स्पष्टता येईल. यादीमध्ये भरम साठ गोष्टी टाकत बसू नका. पण ज्या महत्त्वाच्या आहे आणि त्या केल्याच पाहिजे अशा पाच ते सहा गोष्टी लिहा आणि मग एक एक करून ते काम पूर्ण करा. लक्षात ठेवा, बनवलेल्या यादी मधली 90% पेक्षा जास्त कामे तुम्ही झोपायच्या आधी पूर्ण केली पाहिजे. असे केल्याने तुमचा मेंदू सतत ऍक्टिव्ह राहील.

चौथे आहे, चांगल्या लोकांच्या संगतीत रहा. मित्रांनो, तुम्ही हुशार आणि ध्येयशाली लोकांच्या संगतीत आळशी राहू शकत नाही. लहान मुल असतात, ती सकाळी उठायचा कंटाळा करतात. पण त्याच मुलांना तुम्ही हॉस्टेलमध्ये टाकले तर ते बरोबर सकाळी लवकर उठतात कारण त्यांना हॉस्टेलमध्ये मिळालेली संगत. असे म्हणतात की जशी तुमची संगत तशी आपल्या जीवनाला रंगत. तुम्ही नोकरी करत असाल तर ऑफिसमध्ये पण अशा लोकांच्या संगतीत रहा जे सिन्सियर आहेत. ज्यांना आयुष्यात मोठे काहीतरी मिळवायचे आहे त्यांच्या बरोबर राहून तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखे बनायचा प्रयत्न कराल म्हणून आळस तुम्हाला घालवायचा असेल तर चांगल्या लोकांच्या संगतीत रहा.

हे वाचा:   धान्याचा 1 दाना देखील खराब होणार नाही; बघा हा नैसर्गिक पावरफुल उपाय, ना केमीकल ना औषध.!

पाचवे आहे कोणताही नवीन बदल हळूहळू करा. मित्रांनो, काही लोक असे जोशीले असतात. जसे की त्यांनी एखादा मोटिवेशनल व्हिडिओ पाहिला, एखादे प्रेरणादायी व्याख्यान ऐकले की त्यांना खूप जोश येतो, ते रोज सकाळी आठ वाजता उठतील असे ठरवतात, आणि दुसऱ्या दिवशीपासून ते डायरेक्ट पाच वाजता उठतील, दुसऱ्या दिवशी उठतात खरं पाच वाजता पण परत तिसऱ्या दिवशी जैसे थे म्हणजे पहिले पाढे 55. म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणताही नवीन बदल करायचा असेल तर तो हळूहळू करा. म्हणजे आठ वाजता उठत असाल तर मग एक आठवडा पावणे आठ वाजता उठा नंतर पुढचा आठवडा साडे सात नंतर पुढचा आठवडा सात वाजता आणि असे करत करत पुढे तुम्ही 5 वाजता सहज उठू शकाल.

तर मित्रांनो असा होता हा आजचा माहितीपूर्ण लेख. तुम्हाला आजचा हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा.