गव्हाचा एक दाणा सुध्दा खराब होणार नाही.. नैसर्गिक पावरफुल उपाय.. एकदा नक्की करून बघा.!

ट्रेंडिंग

नमस्कार मंडळी, आज आम्ही तुम्हाला या लेखात गहू स्टोर करण्यासाठी काही टिप्स देणार आहे आणि काही जैविक साधने वापरून आपण वर्ष दोन वर्षे गहू किंवा कोणतही धान्य कशा पद्धतीने साठवू शकतो ते सांगणार आहोत. एप्रिल महिन्यापर्यंत नवीन गहू अगदी बाजारात येतात आणि मार्केटमध्ये नवीन गहू आल्यानंतर मध्यमवर्गीय कुटुंब वर्षेभर पुरेल इतका गहू विकत घेतात.

परंतु अनेकदा योग्य रित्या साठवण अभावी गहू धान्याला कीड लागते आणि ज्यामुळे गव्हाचे मोठे नुकसान होते. शिवाय धान्याची नासाडी सुद्धा होते ते वेगळच, नाही का? मग साठवणुकीच्या वेळेस योग्य रित्या गहू स्टोअर केले तर ते लवकर खराब होत नाही म्हणजे आरामात वर्षभर टिकतात.

जर आपण वर्षभरासाठी घरात गहू साठवून ठेवत असाल तर गहू साठवताना या गोष्टींची काळजी घ्या व या काही टिप्सची मदत घ्या, यामुळे तुमच्या गव्हाला कीड लागणार नाही. तर सर्वात पहिले आपण बघूयात की जर साठवणुकीची पद्धत चुकली की गव्हालाच नाही तर इतर कोणत्याही धान्याला कीड लागते आणि प्रामुख्याने गव्हामधे आद्रतेचे प्रमाण जास्त असते त्यामुळे गहू लवकर खराब होतात.

गहू हे जास्त दिवस टिकण्यासाठी जेव्हा तुम्ही बाजारातून गहू आणता तेव्हा गहू चार ते पाच दिवस कडकडीत असा उन्हात वाळवायचा. जेव्हा तुम्ही कडकडीत उन्हात तो वाळवता आणि जेव्हा साठवण्यासाठी कोणत्याही साधनाचा वापर करता तर त्यामध्ये शक्यतो तुम्हाला कोठीचा वापर करायचा आहे किंवा लोखंडी ड्रम चा वापर करायचा आहे.

त्यानंतर जेव्हाही तुम्ही त्या ड्रम मध्ये किंवा लोखंडी कोठीमध्ये किंवा स्टीलची कोठी जी म्हणतो आपण तिचा वापर करता तेव्हा ती कोठी आधी व्यवस्थितरित्या स्वच्छ धुऊन ती सुद्धा उन्हामध्ये चार ते पाच दिवस ठेवायची म्हणजे जेणेकरून ती व्यवस्थितरित्या स्टरीलाईज होते. आता जेव्हा तुम्ही गहू चार ते पाच दिवस उन्हामध्ये वाळवता तेव्हा ते एकदम गरम असतात त्यामुळे एकदम गरम गहू तुम्हाला कोठी मध्ये टाकायचे नाही. ते रूम टेम्परेचर मध्ये येऊ द्यायचे आणि मगच तुम्हाला ते कोठीमध्ये साठवायचे आहे. त्यानंतरची टीप अशी की गहू पोत्यामध्ये न साठवता तुम्हाला लोखंडी ड्रम मध्ये किंवा स्टीलच्या कोठीचा वापर करून त्यामध्ये साठवायचे आहे. यामुळे आपले जे गहू आहे ते वर्षानुवर्ष टिकतात.

हे वाचा:   गॅस वर टाका इनो, या इनोची कमाल पाहून विश्वास बसणार नाही.. पैशांची होईल बचत.!

त्याचबरोबर गहूची कोठी किंवा ड्रम तुम्ही त्या ठिकाणी ठेवायचा आहे जिथे हवा खेळती राहील, त्यावरती व्यवस्थितरित्या प्रकाश येईल आणि ती जागा कोरड़ी असेल अशाच ठिकाणी तुम्हाला गव्हाची कोठी ठेवायची आहे. गव्हाच्या कोठ्या जेव्हा तुम्ही ज्या जागी ठेवणार आहात त्याखाली तुम्हाला पाट वगैरे जो आहे तो वापरायचा आहे किंवा त्या कोठ्यांसोबत स्टँड मिळत त्याचा वापर करायचा आहे किंवा काळ्या धाग्याचे पोते वापरायचे आहेत.

म्हणजे काय होईल ऋतू बदलतात त्यामुळे फरशी सुद्धा आपली थंडी राहते तर अशा वेळेस त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट कोठी सोबत येणार नाही. म्हणून तुम्ही शक्यतो स्टँड, पाट किंवा मग काळ्या धान्याच्या पोत्यांचा वापर करू शकता. त्यामुळे कसं होईल की कोठीच टेंपरेचर जे आहे तेच राहील.

त्याचबरोबर गहू स्टोर करण्यासाठी विषारी औषधांचा वापर शक्यतो तुम्हाला टाळायचा आहे. त्याचबरोबर गहू स्टोअर करण्याच्या आधी गहू चाळून आणि निवडून घ्यावे म्हणजे आपल्या गृहिणींचा भरपूर असा वेळ वाचतो आणि जेव्हाही आपल्याला दळणाला गहू द्यायचे असतात तेव्हा अगदीच आपण ते कोठीतून काढून दळणाला देऊ शकतो. तर ह्या काही टिप्स महत्वाच्या आहेत.

आता आपण जाणून घेऊयात की कोणकोणती अशी जैविक साधनं आहेत ज्याने आपले गहू वर्ष वर्ष टिकतील. तर पहिलं म्हणजे कडू लिंबाचा पाला. तुम्हाला लिंबाचा पाला घ्यायचा आहे, दोन ते तीन दिवस तो सावलीमध्येच तुम्हाला सुकवायचा आहे, उन्हामध्ये ठेवायचा नाही. फक्त त्यांच मॉइश्चर उडालं पाहिजे. त्यानंतर तो कडूलिंबाचा पाला जेव्हाही तुम्ही गव्हामध्ये टाकणार आहात तर तो पाला जो आहे तो गव्हात नको पडावा म्हणून काय करायचं की झिप लॉकच्या बॅग घ्यायच्या आणि त्यांना होल पाडून घ्यायचे आहेत आणि त्या बॅग तुम्हाला गव्हामध्ये टाकून ठेवायच्या आहेत. यामुळे गव्हाला कीड आळी लागत नाही.

हे वाचा:   उशिरा लग्न करण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहे का? म्हणून काही लोक उशिराच लग्न करत असतात.!

दोन नंबरच साधन आहे ते म्हणजे कडू लिंबाच्या काड्या, शक्यतो थोड्या जाड जाड काड्या घ्यायच्या आणि मोठ्या घ्यायच्या जेणेकरून तुम्हाला त्या प्रत्यक्ष डोळ्याने दिसल्या पाहिजे. म्हणजे कसं की जेव्हा तुम्हाला दळणासाठी द्यायच असेल तर तुम्ही इझली त्या काड्या आहे त्या बाजूला काढून ठेवू शकाल. तिसरं म्हणजे न्यूजपेपर, न्यूजपेपर तुम्हाला कोठीमध्ये ठेवायचा आहे, याने काय होतं की त्यावरती जे काही मॉइसचर क्रिएट होतं तर ते न्यूजपेपर शोषून घेतो आणि अशा वेळेस गव्हाला कीड लागण्याचे जे काही चान्सेस आहेत ते फार कमी होतात.

त्यानंतरच जैविक साधन आहे ते म्हणजे माचीस. माचीस मध्ये पोटॅशियम फ्लोरेट आणि रेड फॉस्फोरस असत त्यामुळे ते गव्हाला कीड लागू देत नाही. त्यामुळे माचीसच्या काड्या तुम्ही डायूरेक्ट त्याच्यामध्ये टाकू शकता किंवा माचीस ची तुम्ही डायरेक्टली रिकामी पेटी जशी ऐंज इट इज आहे तशी टाकून द्यायची आहे म्हणजे त्याला बिलकुल कीड लागत नाही.

त्यानंतरच जैविक साधन आहे ते म्हणजे कॅस्टर ऑइल, ज्याला आपण एरंडेल तेल असं म्हणतो. तर हे तेल तुम्हाला तुमच्या हाताला लावून घ्यायच आहे आणि व्यवस्थितरित्या पूर्ण गव्हाला लावायच आहे. याने काय होतं की गव्हावरती एक लेयर तयार होते आणि हे बिलकुल किडे वगैरे लागू देत नाही. त्याचबरोबर हे गहू जेव्हा तुम्ही दळणाला देता याने पोळ्या सुद्धा नरम येतात.

याच्यापासून सुद्धा तुमच्या शरीराला काहीच असा धोका नाहीये त्यामुळे कॅस्टर ऑईल नक्की तुमच्या गव्हाला लावून ठेवा म्हणजे गव्हाला कीड आळ्या लागणार नाही. तर मित्रांनो आजच्या या लेखात आम्ही ज्या काही टिप्स तुम्हाला सांगितल्या आहेत त्या टिप्स नक्की फॉलो करा, आणि हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.