कुकर लावण्या आगोदर हे काम करा, हे करा कुकर कधीच खराब होणार नाही.!

ट्रेंडिंग

नमस्कार, मित्रांनो, आजच्या या लेखात आपण खूपच महत्त्वाच्या नवनवीन टिप्स आणि ट्रिक्स बघणार आहोत, ज्यामुळे आपल्याला भरपूर पैशांची बचत करता येईल आणि अवघड किचकट कामे सोपी होतील. फक्त हा लेख शेवटपर्यंत वाचा, खूपच इंटरेस्टिंग असा हा लेख आहे. तर इथे आपली पहिली टीप आहे अशा प्रकारच्या कधीतरी वापरात असणाऱ्या बॅगसाठी. आता बघा या ट्रॅवलिंग बॅग आपण कधीतरीच वापरतो. ठेवून ठेवून यावरती धूळ बसते. याला धुवायचं म्हणलं तर काम वाढत आणि बॅग लवकर खराब होतात.

घरामध्ये अशाच बॅग ठेवल्या की ते ऑर्गनाईज असं घर वाटत नाही. तर त्यासाठी आपण वेगळं असं काही खरेदी करायची गरज नाही. आपल्याकडे असणारा जुना पेटीकोट किंवा जुना गाऊन आपण इथे वापरू शकतो. तर आता बघा इथे जुना गाऊन मी घेतलेला आहे. त्याच्या वरच्या ज्या स्लीव्स असतात त्या दोन्ही अशा पकडायच्या आणि त्यामध्ये एक गाठ मारायची. तुम्ही इथे रबर देखील लावू शकता, पण गाठ मारली की आपलं काम होतं. जर गाऊनची उंची जास्त असेल तर गाठ थोडीशी जास्त वरती कपडा घेऊन मारा आणि त्यानंतर आपल्याला गाऊन सरळ करायचा आहे. गाऊन उलट करून आपण गाठ मारली होती, गाऊन असा सरळ करायचा आणि आपण सहज या बॅगला अशा प्रकारे कव्हर म्हणून वापरू शकतो. जे की अगदी परफेक्ट मापाच अस तयार होतं.

यानंतरची आपली टीप आहे साडीसाठी. बऱ्याच वेळा आपल्याला हा प्रॉब्लेम येतो. जाड काठाच्या ज्या साड्या असतात त्यावरती काटेपीन व्यवस्थित बसत नाही त्यासाठी मोठी अशी काटेपीन घ्यावी लागते. या देखील काटेपीन कधी कधी वाकड्या होतात. अशा साड्यांपुढे तुम्हालाही असा प्रॉब्लेम आलाच असेल पण त्याच वेळी काय करायचं तर अंगाची साबण घ्यायची आणि छोटी जरी सेफटी पिन असेल तरी तुम्ही अगदी कितीही जाड साडीला किंवा जाड कपड्याला वापरू शकता. काटेपिन आपल्याला अशापकारे अंगाच्या साबणेवरती टोचून घ्यायची आहे त्यावरती साबण लागली पाहिजे. त्यामुळे गुळगुळीतपणा येतो आणि त्यामुळे कितीही जाड अशी साडी असेल तरी सहज साबणामुळे आपली जी काटेपीन आहे ती आपल्या जाड कपड्यावरती बसते. साबणामुळे आपल हे काम खूप सोपं होतं.

हे वाचा:   श्रावण महिन्यात का मांसाहार का करत नाही माहिती आहे का.? श्रावण महिना या कारणांमुळे आहे खूप शुद्ध महिना.!

यानंतरची आपली टिप आहे कापूरची. बघा आता मी थोडासा कापूर घेतलेला आहे. सध्या वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे. खूप दमट कुबट असं वातावरण आहे. ऊन पडत नाही त्यामुळे घरामध्ये खूप घान वास येतो. वेगवेगळे रूम फ्रेशनर घ्यायला गेलं तर काही अगदी आपल्याला न परवडणारे असतात. पण अगदी कापूरची छोटीशी वडी वापरून आपण घरातील सर्व समस्या दूर करू शकतो.

तर आपल्याला इथे कापूरची एक वडी घ्यायची आहे. थोडासा कापूस घ्यायचा, त्यात दोन वड्या टाकल्या होत्या, एक दोन वड्या तुम्ही टाकू शकता, एक वडी मी ठेवलेली आहे आणि अशाप्रकारे कापसाचा गोळा तयार करायचा. तुमच्याकडे जर टिशू पेपर असेल तर टिशू पेपर देखील तुम्ही अशापकारे वापरू शकता कापसाऐवजी आणि याचा गोळा करून तुम्ही टॉयलेट बाथरूम मध्ये ठेवा किंवा घरामध्ये कुठेही ठेवा. अगदी घर तुमचं सुगंधित होईल, पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला फील होईल, त्यासोबत घरातील पूर्ण घाण वास निघून जातो आणि वेगळे असे पैसे खर्च करावे लागत नाहीत. पैशांची बचत होते आणि घरातील समस्या देखील सटतात.

यानंतरची आपली टिप आहे कुकरसाठी. कुकर हे आपल्याला दररोज लागणारी वस्तू आहे आणि ती जर खराब झाली काही गडबड झाली तर आपल्याला खूप त्रास होतो. एक तर जास्त प्रॉब्लेम असा होतो की शिट्टी होत नाही किंवा शिट्टी जरी झाली तरी यामधून पाणी बाहेर येत, जे की आपल्या गॅसची शेगडी खराब करत, काम वाढवत आणि यामध्ये पाणी कमी पडून त्यामधील गोष्टी करपतात. असा प्रॉब्लेम तुमच्या सोबत जर होत असेल तर हा छोटासा उपाय करा तुमचं कुकर अगदी नवीन सारखं चालायला लागेल. तर फक्त आपल्याला सुईमध्ये दोरा ओवून घ्यायचा आहे आणि इथे बघा झाकणावरती असा हा भाग असतो ज्यामध्ये छिद्र असतात.

हे वाचा:   लसूण सोलण्याची ही जादुई पद्धत तुम्हाला कोणी नाही सांगणार.! एका मिनिटात लसणाच्या सगळ्या पाकळ्या होणार एकदम मोकळ्या.!

हा जो भाग आहे तो आपल्याला सुई दोऱ्याच्या मदतीने अशा प्रकारे ओपन करायचा आहे कारण की यामध्ये कसं अन्नाचे कण डाळभात यामध्ये अडकतात आणि ते वाळल्यानंतर कडक होतात आणि ते छिद्र जाम होतात. त्यामुळे कुकरची शिट्टी होत नाही किंवा कुकरच्या शिट्टीतून पाणी बाहेर येतं. तर जो शिट्टीचा भाग आहे तो देखील आपल्याला अशापकारे आतमध्ये दोरा टाकून पूर्णपणे हलवून घ्यायचा आहे, व्यवस्थित साफ करायचा आहे. अधून मधून तुम्ही जर कुकरच्या झाकनाची अशाप्रकारे स्वच्छता केली तर तुमच्या कुकर मधून कधीच पाणी बाहेर येणार नाही किंवा शिट्टी देणार नाही असं होणारच नाही.

एकदा ट्राय करून बघा आणि बरेच जण कुकर वापरताना एक खूप मोठी चूक करतात ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे देखील तुमचं कुकर भरपूर दिवस चालेल आणि अजिबात काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. अशाप्रकारे शिट्टीची स्वच्छता करणं खूप गरजेच आहे कारण की हे जर जाम झालं तर शिट्टी आपली उडून आपल्या घरामध्ये दुर्घटना देखील होऊ शकते.

त्यामुळे आजच हा उपाय करा. ही आहे कुकरमध्ये दोऱ्याची कमाल आणि बरेच जण जो चमचा आहे तो कुकरच्या या भागावरती अशापकारे काहीतरी हलवून मिक्स करून आदळतात तर ते अजिबात करायचं नाही. यामुळे हा भाग दबला जातो. यामध्ये स्पेस निर्माण होतो आणि आपल्या कुकर मधून हवा जाते त्यामुळे आजच हे उपाय करा आणि भरपूर पैसे वाचवा. तर मित्रांनो तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.