मित्रांनो आज आपण जुन्या वापरलेल्या प्लास्टिक बॅग पासून सुंदर अशी भरपूर फुलं बनवणार आहोत ते पण फक्त पाच मिनिटामध्ये आणि हे जे लटकण आहे ते पण आपण घरातील जुन्या बांगडीचा किंवा इतर काही वस्तूंचा वापर करून बनवलेल आहे. त्याच सोबत यामध्ये आपला एकही रुपया खर्च होणार नाही याला बनवणं खूपच सोप आहे. आता भरपूर असे सण उत्सव येणार आहेत.
गौरी गणपती इतर काही किंवा दररोज देखील तुम्ही दरवाजाच्या बाहेर लावण्यासाठी हे बनवू शकता. खूप सुंदर असं तोरण, या माळा आपण तयार करू शकतो. आणि यामध्ये आपले पैसे खर्च होणार नाही, जास्त वेळही लागणार नाही आणि बाजारामध्ये या वस्तू मिळतात पण हाताने या गोष्टी बनवण्याची मजाच वेगळी असते एकदा नक्की करून बघा. यामध्ये आपल्याला काहीच असं मोजमाप घ्यायची गरज नाही खूप छान ढोबळमानानेच आपण याला बनवू शकतो.
आपल्याकडे भाजीपाला घालून किंवा इतर वस्तू घालून अशा प्रकारच्या कॅरी बॅग येत असतात. एकाच कलरच्या नाही वेगवेगळ्या रंगाच्या येतात. तर मी इथे एक भाजीपाल्याची सिंपल आपल्याकडे असणारी एक बॅग घेतली आहे, कॅरी बॅग. तर त्याचा खालचा भाग आपल्याला कट करायचा आहे आणि त्यानंतर याचे जे हँडल आहेत ते पण आपण अशापकारे, जो एक्स्ट्रा भाग असतो तो कट करून घेणार आहोत.
आणि त्यानंतर दोन्ही साईड कट झाल्या की हे छान असं ओपन होत. अजिबात खालचा किंवा वरचा भाग जास्त कट करायचा नाही. त्यानंतर याला असं फोल्ड करायच आहे. मी तीन वेळा फोल्ड करत आहे. तुम्हाला किती छोटं किंवा मोठं फुल हवं आहे त्यानुसार तुम्ही याला तीन ते चार वेळा फोल्ड करू शकता. त्यानंतर बघा असं देखील मी याला तीन ते चार वेळा फोल्ड करून घेतलेल आहे आणि त्यानंतर आता मधोमध आपल्याला याला स्टेपलर मारायचा आहे.
जर व्यवस्थित खालच्या साईडने पिन लागली नसेल तर दोन पिन देखील तुम्ही इथे मारू शकता. आता बघा ही जी कॅरी बॅग आहे ना त्याला आपण बाजूला ठेवूयात आणि इथे आपल्याला लागणार आहे अजून एक कॅरी बॅग तर माझ्याकडे याच रंगाची अजून एक कॅरी बॅग होती तर मी ही वापरत आहे. तुमच्याकडे जर एकाच रंगाची एकच कॅरी बॅग नसेल तर अगदी तुम्ही दोन तीन वेगवेगळ्या रंगाच्या कॅरी बॅग देखील वापरू शकता खूप सुंदर असं रेनबो फूल तयार होतं. तर याचा भाग देखील आता मी खाली कट केलेला आहे. वरचा भाग देखील आपल्याला कट करायचा आणि याला छान असं उघडून घ्यायचं.
आता तीन वेळा फोल्ड करायचं. याच्या देखील मधोमध आपल्याला पिन मारायची आहे. स्टेपलर करून घ्यायच आहे. त्यानंतर आता दोन कॅरी बॅगचे आपण हे दोन भाग तयार केलेले आहेत. इथे आपल्याला एखाद्या बरणीच झाकण घ्यायच आहे. छोटं मोठं झाकण घ्या. तुम्हाला फुल किती मोठं हव आहे त्यानुसार आणि अगदी जी पिन मारलेली आहे ना त्यानुसार हे झाकण मधोमध ठेवून त्याच्या बाजूने आपल्याला हे असा सर्कल गोलाकार आखून घ्यायच आहे पेनाच्या मदतीने.
आता आपण हे जे आखून घेतलेला भाग आहे ना तो कातरीने असा कट करायचा. आता बघा हे भाग आपण कट केलेले आहेत नंतर काय करायचं तर याला अशापकारे लाईन मध्ये आपल्याला कट करायच आहे. याला तुम्ही छोटं मोठं कट करू शकता. तर इथे मी थोडसच याला असं अगदी थोडा भाग मध्ये ठेवून पट्टीमध्ये याला कट करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला दोन्ही भाग एकत्र करून एक पिन मारायची आहे.
आता तुम्ही इथे दोन तीन भाग घेऊ शकता किंवा दोन जरी घेतले तरी त्यानंतर फक्त आपल्याला हाताने याला असं चोळून घ्यायच आहे. यामध्ये आपण ज्या पट्ट्या कट केल्या होत्या ना त्या अशा चिटकलेल्या असतात तर त्याला असं उघडून घ्यायचं बघू शकता किती छान दाट दाट फूल तयार झालेल आहे आणि मी पिवळ्या आणि लाल रंगाच्या मुद्दाम थोड्याशा कॅरी बॅग विकत घेतल्या होत्या कारण की एकाच रंगाच्या एवढ्या आपल्या घरी येत नाहीत तर मुद्दाम मी याचे असे पिवळे आणि लाल फुल तयार केलेले आहेत.
आता तुमच्याकडे जर रिंग नसेल तर दोऱ्यालाच गोलाकार गाठ मारून गोल भाग तयार करायचा जेणेकरून याला तुम्ही कुठेही अडकवू शकता किंवा अशा रिंग आपल्या इकडे तिकडे असतात तर छोट्या मोठ्या त्या देखील तुम्ही वापरू शकता. यानंतर बघा आपल्याला स्ट्रॉ घ्यायचा आहे. माझ्याकडे हिरव्या रंगाचा स्ट्रॉ होता तर त्याला मी असं कट केलेला आहे. तुमच्याकडे वेगळ्या कोणत्या रंगाचा असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता किंवा पेनाची कांडी संपलेली असेल तर ती देखील वापरली तरी चालेल किंवा जे ईअर बडस असतात ना त्याचा मधला जो पाईप असतो तो देखील तुम्ही इथे वापरू शकता. असं काहीही तुम्हाला वापरता येईल विकतच काही घ्यायची गरज नाही. घरामध्ये भरपूर अशा गोष्टी असतात तुम्ही ज्या जर वापरल्या तर त्याचा छान रियूज होतो आणि खूप छान आपल्याला असं घरच्या घरी या वस्तू तयार करता येतात.
आता बघा एक एक फूल घालून मी अशी छान माळ तयार केलेली आहे. याच जे आता खालचं एक लटकण होतं ते कसं तयार करायचं ते बघूयात. एक जुनी बांगडी घ्यायची, लेस घ्यायची. इथे तुम्ही एखादा कलरफुल कपडा देखील वापरू शकता. त्यानंतर लेस अशी आपल्याला यावरती गुंडाळून घ्यायची आहे. याला देखील काही टेप वगैरे असं काही वापरायची गरज नाही. थोडीशी सुरुवातीला लेस एका साईडने घेऊन त्यावरतीचा गुंडाळून घ्यायचं म्हणजे तो सुरुवातीचा जो भाग आहे तो यामध्ये अटॅच होतो आणि शेवटचा भाग देखील बघू शकता व्यवस्थित लावता येतो.
त्यानंतर एक छोटी लेस मी घेतलेली आहे. तुमच्याकडे जर उलन असेल किंवा रंगीत दोरा असेल तर तो देखील तुम्ही या प्रकारे असा लावू शकता किंवा जरी नाही लावला तरी चालेल. तुमच्यानुसार तुम्ही या डिझाईनमध्ये बदल करू शकता किंवा नाही. तुम्हाला हे लटकण लावायचे नसेल तरी चालेल पण सुंदर दिसतात खाली असे लटकण. बाजारामध्ये खूप महाग असतात पण बघा आपण घरीच तयार केलेले आहेत. उलनचे मी गोंडे तयार केले. ते गोंडे जे आहेत ते अशाप्रकारे आपण यामध्ये घालून याला सुंदर असं एक लटकन तयार केलेल आहे.
आता छान आपण याला अटॅच केलेला आहे दोऱ्याच्या मदतीने. बघा प्लास्टिक बॅगचा वापर करून आपण सुंदर अशा फुलांच्या दोन माळा तयार केलेल्या आहेत, तोरण तयार झालेल आहे तुम्ही पण नक्की बनवा. आणि हो हा लेख थोडासा जरी आवडला असेल तर आम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा. हा लेख जास्तीत जास्त मित्र परिवारासोबत शेअर करा.