5 मिनिटांत सर्व उंदीर पळून जातील; चहाची कमाल.! उंदीर घालवण्यासाठी घरगुती उपाय, फक्त एकदा वापरा.!

ट्रेंडिंग

नमस्कार मंडळी, घरातून उंदीर आणि घूस कायमचे घालवण्यासाठी आज मी तुमच्या सोबत पावरफुल देसी असा एक घरगुती उपाय शेअर करणार आहे. ज्यामुळे 100% घरातून उंदीर जातीलच आणि परत घरामध्ये उंदीर होऊ नयेत यासाठी काय करायला हवं ते देखील आज आपण बघणार आहोत. घरामध्ये उंदीर झाले की खूप जास्त नुकसान होतं त्याचसोबत रोगराई पसरते.

ते महागड्या वस्तू खराब करतात आणि खूप जास्त घान वास देखील येतो. घरामध्ये जर आपण यांना मारण्याच औषध ठेवलं तर कोपऱ्यामध्ये इकडे तिकडे जाऊन ते मरतात आणि कुठे मेले कळत नाही. घाणवास सुटल्यानंतर लक्षात येत की इथे उंदीर मेले आहे. परत साफसफाईला टाईम जातो. पण आज आपण असा उपाय बघणार आहोत की ज्यामध्ये उंदीर आपल्या घरातून स्वतःच पळून जातील. फक्त हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करा. 100% रिझल्ट मिळेल.

तर इथे आपल्याला लागणार आहे चहा पत्ती. तर बघा चहा पावडर मी थोडीशी घेतलेली आहे. तुम्ही वापरलेली चहा पावडर देखील इथे वापरू शकता. अगदी थोडसं आपल्याला हे मिश्रण तयार करायच आहे. घरातीलच आपण वस्तू वापरणार आहोत. एकही रुपया खर्च होणार नाही. पण घरातील अशा गोष्टींचा उपयोग करून आपण एक केमिकल रिएक्शन तयार करणार आहोत ज्यामुळे उंदीर घरातून कायमचे निघून जातात. तर यानंतर आपल्याला खायचा सोडा थोडासा घ्यायचा आहे आणि तो यामध्ये टाकून आपण याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. बेकिंग पावडर वापरायच नाही. खायचा सोडा आपल्याला इथे वापरायचा आहे.

आता या दोन्ही गोष्टी अशा एकत्र झाल्या की यानंतर आपल्याला लागणार आहे मसाल्यामधील तेजपत्त्याची पाने. जी की फ्रेश पाने आपल्याला वापरायची आहेत. घरामध्ये घूस असेल तर या पानांचा जर तुम्ही वापर केला तर खूप लवकर रिझल्ट मिळतो. याच्या वासाने अजिबात घूस किंवा उंदीर आपल्या घरात येत नाहीत. तर यासाठी दोन तेजपत्त्याची फ्रेश पान घ्यायची. बारीक याला कट करून आपण यामध्ये टाकणार आहोत.

हे वाचा:   आळस पूर्णपणे घालवण्यासाठी ५ सोपे मार्ग... प्रत्येक दिवस जाईल उत्साहात.!

उंदीर होण्याची दोन तीन मुख्य कारण आहे जसे की तुमच्या घरामध्ये जर भरपूर धान्य ठेवलेल आहे किंवा स्वच्छता नाही किंवा दरवाजे खिडक्या अशा ओपन राहतात तर त्यामुळे देखील भरपूर उंदीर घरामध्ये होतात आणि एकदा जर उंदीर आपल्या घरामध्ये झाले की दिवसें दिवस त्यांची संख्या वाढते आणि खूप लवकर वाढते आणि घरामध्ये असा वेगळाच घानवास देखील येतो.

यानंतर बघा आता तेजपत्त्याची पान आपण बारीक करून टाकली. आता आपल्याला इथे वापरायची आहे साबण. इथे तुम्ही अंगाची कपड्याची किंवा भांड्याची अशी कोणतीही साबण घेऊ शकता. किसून किंवा अशापकारे बारीक त्याचे तुकडे करून आपल्याला ही साबण यामध्ये थोडीशी टाकायची आहे. सर्व गोष्टी जस अर्धा एक चमचा याप्रमाणात तुम्ही घेऊ शकता. तुमचं घर किती मोठ आहे, छोट आहे त्यानुसार तुम्हाला या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत.

तर ह्या सर्व गोष्टी आपण अशा एकत्र करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला घ्यायची आहे गव्हाची कणिक. तुम्ही इथे ज्वारीच, बाजरीच पीठ देखील घेऊ शकता आणि इथे खूप दिवसाचं फ्रिजमध्ये ठेवलेलं पीठ असेल तर ते देखील वापरलं तरी चालेल. तर याचे छोटे छोटे आपल्याला असे गोळे करायचे आहेत. त्यानंतर बघा आता आपल्याला ना ही गव्हाची कणिक जी आहे ती अशापकारे हातानेच थोडस याला पसरवून घ्यायचं आणि जसं पुरणपोळी करतो मोदक करतो तस आपण यामध्ये जो मसाला केलेला आहे तो यामध्ये असा आपल्याला भरून घ्यायचा आहे. वरती अजिबात कुठे मसाला लागला नाही पाहिजे. आतमध्ये व्यवस्थित याला टाका आणि व्यवस्थित याला अस दाबून घ्या.

एक आवरण आपण तयार करणार आहोत गव्हाच्या कणकेच यावरती. तुम्ही हे छोटे मोठे असे गोळे तयार करू शकता. जागेनुसार तुम्ही कमी जास्त असे गोळे तयार करा म्हणजे पूर्ण घर कव्हर झालं पाहिजे. याला आपल्याला ना रोजरोज बनवायची अजिबात गरज नाही फक्त एकदा करा तुम्हाला कमालीचा रिझल्ट जाणवेल. संध्याकाळच्या वेळी खास करून घरामध्ये उंदीर येतात तर जाळीचे खिडकी दरवाजा बंद ठेवा. बऱ्याच वेळा तर असं होतं की दरवाजा देखील ते कुरतडून घरामध्ये येतात तर अशा वेळेस काय करायचं हा उपाय आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. अगदी दरवाजासमोर हे गोळे एक एक करत ठेवा म्हणजे अजिबात ते आपल्या घरामध्ये शिरकाव करणार नाहीत आणि तेजपत्त्याची पान देखील तुम्ही दरवाज्याच्या बाहेर ठेवू शकता जेणेकरून ते आपल्या घरामध्ये येणार नाहीत.

हे वाचा:   तुमच्या टॉयलेट मध्ये किंवा बाथरूम मध्ये चमचाभर ही एक गोष्ट टाका.! हात सुद्धा लावायची गरज नाही एक बादली पाण्यात एकदम चकाचक होऊन जाईल.!

घरामध्ये खास करून किचनमध्ये आपण हे एक दोन तरी ठेवायचेच म्हणजे कसं तिथे काहीतरी खाण्या पिण्याला त्यांना मिळतं आपण रात्री झोपलो की ते तिथे नक्की येतात. त्यामुळे शक्यतो किचनमध्ये खास करून याला ठेवा. गॅसच्या शेगडीच्या खाली ठेवा किंवा भिंतीच्या कडेकडेने याला ठेवायच आहे कारण की ते आतमधून असं चालत नाहीत भिंतीच्या कडेकडेने त्यांचा रस्ता असतो तर त्यांच्या रस्त्यामध्ये हे ठेवा. गव्हाची कणिक आहे त्यामुळे हे नक्की त्याला 100% खातील आणि यामधील जो आतमधला मसाला आहे जेव्हा त्यांच्या पोटामध्ये जाईल तर त्यांना अस्वस्थ वाटायला लागेल श्वास घ्यायला त्रास होतो त्यासोबतच खूप असं तडफडल्यासारखं होतं.

त्यांना आपल्या घरामध्ये धोका जाणवतो आणि ते आपल्या घरातून पळून जातात. तुम्ही हे स्टेप बाय स्टेप जर फॉलो केलं तर अजिबात परत घरामध्ये उंदीर येत नाहीत आणि विशेष म्हणजे हे घरामध्ये मरत नाही जेणेकरून आपलं काही काम वाढत नाही. फक्त हा उपाय जो आहे तो आपल्याला रात्रीच्या वेळी झोपण्या अगोदर करायचा आहे, म्हणजे सकाळी कसं दरवाजे खिडक्या उघड्या असतील तर ते अगदी आपल्या घरातून पळून जातात कायमचे. आणि हो आजचा आमचा हा लेख थोडासा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत देखील शेअर करा.