फक्त १ रुपयाचा शाम्पू करेल तुमचे काम अगदी सोप्पे; महिलांनो नक्की बघा.!

ट्रेंडिंग

नमस्कार, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे भन्नाट आगळ्या वेगळ्या आणि खूपच महत्त्वाच्या अशा टिप्स आणि ट्रिक्स ज्यामुळे तुम्हाला घर ऑर्गनाईज करता येईल, कमी मेहनतीमध्ये दररोजची काम सोपी होतील आणि भरपूर पैशांची बचत होणार आहे. हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा, आवडल्यास मित्र परिवारासोबत शेअर करा. तर इथे आपली पहिली टीप आहे, तुम्हीही मच्छर घालवण्यासाठी अशा प्रकारचे लिक्विड वापरतात का? पण आजपासून अजिबात वापरू नका, एक तर हे केमिकल युक्त असतं त्यामुळे आपल्यासाठी ते घातक आहे. त्यासोबत खूप महाग देखील आहे. पण आज आपण बनवणार आहोत मच्छर मारण्यासाठी असं लिक्विड जे की 100% नॅचरल आहे आणि झिरो बजेट मध्ये बनतं.

तर यासाठी बघा आपल्याला काही कडूलिंबाची वाळलेली पान घ्यायची आहेत. तुम्ही फ्रेश पान देखील इथे वापरू शकता. एका भांड्यामध्ये ही पान टाका त्यानंतर यामध्ये तेल टाका. कोणतही तेल वापरलं तरी चालेल. खोबरेल तेल जरी टाकलं तरी चालेल. मार्केटमध्ये कडूलिंबाच तेल मिळतं पण खरेदी करण्यापेक्षा आपण घरीच याला बनवू शकतो. यानंतर बघा याला आपण गॅसवरती गरम करायचं.

थोडे थोडे पान हे असं जळायला लागले किंवा यामधून धूर यायला की गॅस बंद करायचा. आता आपण यामधील पान बाजूला काढलेली आहेत. तुम्ही याला गाळून देखील काढू शकता. त्यानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाच म्हणजे कापूर टाकायचा आहे. कापूर टाकून मिक्स करायचं आहे आणि ही संपलेली रिफिल घ्यायची. त्याचा वरचा भाग सहज निघतो, तो काढायचा आणि हात स्वच्छ धुवायचे. यानंतर बघा याला आपण लिक्विड जे तयार केलेल आहे ते यामध्ये भरून घेतलेल आहे. आता आपण ते याला लावणार आहोत. खूप छान घरामध्ये वास येतो कोणतही केमिकल न वापरता आपण मच्छर घालवू शकतो आणि भरपूर पैसे देखील वाचतात.

पुढची आपली टिप आहे गॅसच्या शेगडीसाठी. दररोज आपण यावरती भरपूर काम करतो काही ना काही आपलं चालूच असतं. यामध्ये गॅसची शेगडी खराब होते ती तर आपण दररोज पुसूनच घेतो. पण काही दूध उतू गेलं भाजी उतू गेली किंवा इतर काही पदार्थ की ते खाली पूर्ण असं सांडतं चहा वगैरे आणि ते खालून पूर्ण धुऊन घ्यावं लागतं. वरचा देखील भाग खूप जास्त घान होतो. पण यासाठी अशी एक ट्रिक आहे जेणेकरून तुम्हाला याला जास्त घासायची गरज पडणार नाही. तर आपल्याकडे अशा जुन्या खराब प्लेट नक्कीच असतात तर त्या एखाद्या प्लेटचा आपण इथे वापर करायचा.

हे वाचा:   गॅस वर टाका इनो, या इनोची कमाल पाहून विश्वास बसणार नाही.. पैशांची होईल बचत.!

दोन्ही गॅसच्या शेगडीखाली ह्या प्लेट अशा दोन्ही ठेवायच्या म्हणजे कसं काही उतू गेलं आता बघा पाणी टाकून मी तुम्हाला दाखवते जस चहा उतू गेला किंवा दूध तर आपण हे खाली जे जातं ना ते प्लेटमध्ये असं पडतं जेणेकरून खालचा भाग खराब होत नाही आणि नक्कीच तुम्हाला यामुळे भरपूर अशी मदत होईल. फक्त या ठिकाणी प्लास्टिकची प्लेट वापरू नका जुनीच अशी स्टीलची एखादी किंवा इतर कोणती प्लेट तुम्ही ठेवू शकता.

आता इथे आपण कांदा कट करण्याच्या सर्वात दोन सोप्या पद्धती बघणार आहोत ज्या की दोन वेगवेगळ्या डिझाईनने आपण कांदा कट करू शकतो. बऱ्याच वेळा काही रेसिपी असेल, आपल्या घरी पाहुणे आले असतील तर त्यावेळेस आपल्याला कांद्याच्या अशा चकत्या हव्या असतात तोंडी लावण्यासाठी म्हणा किंवा इतर काही कारणासाठी तर त्यावेळेस या चकत्या व्यवस्थित बनत नाहीत कारण की आपण अगोदर पाचोळा काढतो आणि नंतर कट करतो ते हातातून सटकल्यासारखं होतं पण पाचोळ्यासहित कांदा असा कट करा खूप छान याच्या गोल गोल अशा चकत्या निघतात किंवा इतर काही रेसिपीसाठी गोल रिंग हव्या असतील तर ह्या देखील तुम्ही अशाप्रकारे कट करू शकता.

यानंतर बघा सर्वात बारीक कांदा कट करण्याची सर्वात सोपी पद्धत. तर इथे आपल्याला पिलर वापरायचा आहे. बिर्यानीसाठी किंवा इतर काही ग्रेव्ही वाल्या रेसिपीसाठी असा बारीक कांदा हवा असतो तर त्यासाठी पिलरच्या मदतीने अगदी कोणत्याही अनुभवाशिवाय प्रॅक्टिस शिवाय तुम्ही एकसारखा खूप छान बारीक कांदा कमी वेळेत कट करू शकता.

यानंतरची टिप आहे घरामध्ये कुठे तेल सांडलं की ते पुसण्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत लागते. हे तेलाचे डाग जर कपड्याने पुसायला गेलं तर कपडा एवढा तेलकट होतो की त्याला साफ करायला आपल्याला अजून तेवढाच वेळ जातो. तर असं न करता आपण जर इथे पिठाचा वापर केला म्हणजे तेलाचे डाग काढण्यासाठी जर पिठाचा वापर केला तर आपल्याला कमी मेहनतीत हे डाग स्वच्छ करून मिळतील आणि जर खराब एखादं पीठ असेल थोडसं डब्ब्यामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा कंटेनर मध्ये ठेवत जा जेणेकरून अशा प्रकारे तुम्ही वापरू शकता. जेणेकरून आपल्याला कपडा घान करायची गरज पडत नाही आणि आपलं काम देखील सोपं होत. अगदी कपड्यावरती जरी तेलाचे डाक पडले असतील ते देखील तुम्ही कमी मेहनतीमध्ये पिठाच्या मदतीने काढू शकता. खूप छान डाग स्वच्छ होतात. नक्कीच तुम्हाला खूप मदत होईल.

हे वाचा:   तुमची मशीन आता वर्षानुवर्ष चालणार.! ही एक ट्रिक तुमची मशीन पूर्ण पने बदलून टाकणार.! महिलांनी नक्की वाचा.!

यानंतरची आपली टिप आहे वॉश बेसिंग साठी. आता बघा वॉश बेसिंग स्वच्छ नसेल तर आपल्याला जे किचन आहे ते फ्रेश वाटत नाही, काम करावस वाटत नाही. कारण की यामधून दुर्गंधी येत असते. कितीही वरून स्वच्छ जरी दिसल आणि दुर्गंधी आली तर अजिबात चांगलं वाटत नाही, प्रशस्त वाटत नाही. त्यासोबत प्लंबरला बोलून स्वच्छता करायची म्हणलं तर भरपूर पैसे खर्च होतात पण घरी तुम्ही याची स्वच्छता करू शकता जेणेकरून तुमचं सिंक अगदी चमकायला लागेल.

त्याचसोबत यामधून दुर्गंधी जी आहे ती अगदी छुमंतर होईल. यासाठी आपल्याला इथे वापरायचा आहे शॅम्पू. खराब किंवा एखादा एक्सपायर झालेला शॅम्पू देखील तुम्ही इथे वापरू शकता कोणताही शॅम्पू वापरा. इथे आपल्याला याचा अजून एक फायदा असा होतो की जे पाण्याचे डाग असतात ना सिंकवरती, बेसिंग वरती ते पूर्णपणे निघून जातात.

यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे लिंबू. एक खराब माझ्याकडे लिंबू होत तेच मी इथे वापरत आहे. आता बघा आपल्याला याला अशापकारे लिंबाच्या सालीच्या मदतीने व्यवस्थित घासून घ्यायच आहे. तुम्ही वाटल तर लिंबाचा रस यावरती टाका आणि स्क्रबरने तुम्ही याला क्लीन करू शकता. तर बघा आपण याला आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. सिंक देखील या पद्धतीने स्वच्छ करा. खूप छान रिझल्ट मिळेल आणि बघा पूर्ण स्वच्छता केल्यानंतर कसं हे शाईन करत आहे. कमी मेहनतीत हा छान रिझल्ट मिळालेला आहे. पाण्याचे पूर्ण डाग निघून गेलेले आहेत. तुम्हाला सर्वात जास्त कोणती टिप आवडली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा लेख आवडला असेल तर लाईक करा, आणि शेअर सुद्धा करा.