या खताच्या वापराने ब्रम्हकमल फुलांनी भरून जाईल.. फक्त २ थेंब १० दिवसांत ब्रम्हकमळ कळ्या, फुलांनी बहरेल.!

ट्रेंडिंग

नमस्कार स्वागत आहे तुमचे. आज आपण या लेखात कुंडीमध्ये लावलेल्या या ब्रह्म कमळाच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत. झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी कोण कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयाची माहिती देखील पाहणार आहोत. तर ब्रह्मकमळ च्या या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुले येण्यासाठी जास्ती खते देण्याची आवश्यकता नसते. महिन्यातून एकदा कोणते एखादे खत दिले तरी ते या झाडाला पुरेसे होते.

मात्र या झाडाला सूर्यप्रकाश आणि पाणी या गोष्टी मात्र योग्य प्रमाणामध्ये मिळणेही आवश्यक असते, तरच हे झाड चांगले वाढते. ब्रह्म कमळाच्या झाडाला जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. अगदी सकाळचे किंवा संध्याकाळचे हलकेसे उन मिळाले तरी देखील चालते. ब्रह्मकमळ लावलेली झाडाची कुंडी जी आहे ती अशा ठिकाणी ठेवायची जिथे या झाडाला सकाळचे किंवा संध्याकाळचे हलकेसे ऊन मिळेल. ब्रह्मकमळ च्या झाडाला जास्ती पाणी देण्याची देखील आवश्यकता नसते. त्यामुळे जेव्हा आपण या झाडाला पाणी द्याल तेव्हा झाडाच्या कुंडीतील माती ही चेक करून त्या झाडाला पाणी द्यावे, कारण जास्त पाण्यामुळे देखील हे झाड खराब होण्याची शक्यता असते.

आता आपण या ब्रह्मकमळ च्या झाडाला भरपूर कळ्या फुले येण्यासाठी दोन चार वस्तूंचा वापर करणार आहोत. त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही राख आहे. लाकूड जळल्यानंतर अशा प्रकारची ही राख तयार होते. राख ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहे. राख खत म्हणून जसे काम करते तसेच बुरशीनाशक, कीटकनाशक म्हणून देखील याचा झाडांना खूप चांगला फायदा होतो. मात्र या राखेचा वापर करताना अगदी प्रमाणशीर असा करायचा आहे. झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी या घटकांची, पोषक तत्वांची म्हणजे फॉस्फरस यासारखे घटक आहेत ते राखेमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर खत म्हणून तुम्ही फुलांच्या झाडांसाठी केला तर झाडे, कळ्या फुलांनी अगदी भरगच्च होऊन जातात.

हे वाचा:   बॅचलर बनवतील इतकी सोप्पी गुबगुबीत पुरणपोळी, चव इतकी भारी कि लोकं बोटं चाटत राहतील.!

ब्रह्मकमळ चे झाड लावलेल्या कुंडीतील जी माती आहे ती देखील अधून मधून हलवून थोडी मोकळी करावी, त्यामुळे मातीही भुसभुशीत होते, ऑक्सिजन खेळत राहिल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते, त्याने आपले झाड देखील हे चांगले वाटते.

झाडावरती भरपूर कळ्या फुले येण्यासाठी जी दुसरी वस्तू वापरणार आहोत ती आहे लिंबू. कारण लिंबाच्या रसाने आपल्या झाडांची मूळ खराब होणार नाहीत. झाडांना फुले येण्यासाठी हा रस अतिशय आम्लधर्मी आहे. झाडाला भरपूर फुले येण्यासाठी आम्लयुक्त मातीची गरज असते. त्यामुळे याचा वापर जर आपण झाडाला केला तर झाडाला भरपूर फुले येतात. मात्र या रसाचा वापर अगदी कमी प्रमाणामध्ये करायचा आहे. म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये फक्त 2 ते 3 चमचे लिंबाचा रस घालायचा आहे. हे तयार झालेले जे पाणी आहे ते आपण झाडाला वापरणार आहोत. याच्या वापरामुळे कुंडीतील जी माती आहे ती आम्लयुक्त होते आणि त्यामुळे झाडाला भरपूर फुले लागतात.

हे वाचा:   रेशनच्या तांदळाच्या पिठाचा 10 मिनिटात बनवा कुरकुरीत पेपर डोसा व चटणी.!

आता आपण ही जी राख घेतली आहे ती एका झाडासाठी म्हणजे दहा ते बारा इंची कुंडीमध्ये जर झाड लावले असेल तर फक्त अर्धा चमचा एवढाच या राखेचा वापर करायचा आहे. राख मातीमध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जे आपण पाणी तयार केलेले आहे ते देखील झाडाला द्यायचे आहे. या दोन्ही वस्तु जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी या झाडा साठी वापरल्या तरी झाडे कळ्या फुलांनी अगदी भरगच्च झालेले तुम्हाला दिसून येईल. तर कसा वाटला आजचा हा लेख ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत हा लेख शेअर करायला अजिबात विसरू नका.