लोक अपमान करतात आणि तुम्हाला काहीच बोलता येत नाही? या 3 गोष्टी लक्षात ठेवा…

ट्रेंडिंग

जी लोक चांगले असतात, त्यांच्यात काही वाईट नसतं, सगळ्यांचा विचार करतात, चांगुलपणाने वागत असतात अशाच लोकांचा कायम अपमान होतो. अशा लोकांना विचार पडतो की आपण कधीही कोणाचे काही वाईट करत नाही, कोणाला काही वाईट बोलत नाही, नेहमीच सगळ्यांचा चांगला विचार करतो, मग लोक आपलाच अपमान का करतात? आपल्याशी वाईट का वागतात? आपल्याला टोमणे का मारतात? टीका करतात आणि जेव्हा लोक आपल्याशी असं वागतात तेव्हा आपण नेमकी काय प्रतिक्रिया द्यायची? त्यांना उलट उत्तर द्यायचं की शांतपणे अपमान सहन करायचा?

एकदा अपमान सहन करतो तो चांगला माणूस आहे, जो दोनदा अपमान सहन करतो तो महात्मा असेल पण जो तिसऱ्यांदा अपमान सहन करतो तो मूर्ख असतो. तुम्ही प्रत्येक वेळेस नेहमी अपमान सहन करत जातात त्या वेळेस तुमचा आत्मविश्वास कमी होत जातो. तुमच्या बाबतीत असे होते की कोणीही यावे अपमान करून जावा. जर तुम्हाला वाटत असेल कोणी तुमचा अपमान करू नये तर तुमच्या स्वाभिमानाची रक्षा तुम्हाला करावी लागेल. सहनशीलता आणि मूर्खपणा यात खूप अंतर आहे. जो माणूस चूक करतो, अन्याय करतो, अत्याचार करतो तो माणूस तर पापाचा भागीदार होतोच, पण जो अन्याय सहन करतो तो सुद्धा पापाचा भागीदार होतो.

अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला वेळीच थांबवले नाही तर तो पुढच्या वेळेस अजून त्रास देईल, त्याची हिंमत अजून वाढते, म्हणून तुमचा हा अधिकार आहे की तुम्ही तुमच्या सन्मानाची रक्षा स्वतः करावी. या जगात सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे आपला आत्मसन्मान. आपल्याला आत्मसन्मान हा सहज मिळत नाही तो कमवावा लागतो आणि जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या आत्मसन्मानाला कोणीही धक्का पोहोचवू नये, कोणीही तुमचा पण करू नये तर या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

हे वाचा:   फक्त एकदा वांग बटाट्याची अशी भाजी करून तर बघा, बोटे चाटत खाल.!

नंबर एक तुम्ही नेहमी स्वतःची प्रगती करत रहा. तुमचं ज्ञान वाढवत रहा. रोज नवीन काहीतरी शिकत राहा. रोज स्वतःला विचारा की आज मी काय नवीन शिकलो, आज नवीन काय ज्ञान घेतलं? ज्ञान म्हणजे केवळ पुस्तके वाचणे नव्हे. पुस्तके सुद्धा वाचायला हवी, त्यातून स्वतःला समृद्ध करायला हवं, पण तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात जे काही अनुभव येतात त्यातून शिकायला हवं. स्वतःवर मेहनत घ्या. जेवढे तुम्ही स्वतःला विकसित करणार, स्वतःवर मेहनत घेणार तेवढा तुमचा आत्मविश्वास वाढत जाणार. जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने जगता त्यावेळेस तुम्ही कोणाचाही अपमान सहन करू शकत नाही आणि जेव्हा तुमच्यात आत्मविश्वास असेल लोकांमध्ये वावरताना तुम्ही आत्मविश्वासाने वावरत असाल, त्यावेळेस कोणाचीही तुमचा अपमान करण्याची हिंमत होत नाही.

नंबर दोन अनेक लोकांचं म्हणणं असतं की कोणी आम्हाला काही बोललं तर आम्ही गप सहन करतो. आम्ही काय करू शकतो, कसे उत्तर देऊ. तुमचीही गप्प बसण्याची सवय बदला. काही लोक इतके सहन करतात की अगदी सहनशक्तीचा शेवट होतो. ज्यामुळे त्यांचे नाते संबंध तुटतात आणि नंतर त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप होतो. त्यांचं म्हणणं असतं की आम्ही उलट उत्तर दिले की आमची भांडणे होतात. समोरच्याला उत्तरे दिली की आमच्यामध्ये वाद होतात. त्याची सगळ्यात मोठी कारणे म्हणजे तुम्हाला समोरच्या व्यक्तीशी बोलण्याची कला माहीत नाही.

समोरच्याला उत्तर देणे म्हणजे याचा अर्थ हा नाही की समोरच्या व्यक्ती सोबत भांडण करणे किंवा त्याचा राग राग करणे. जेव्हा समोरचा तुम्हाला एखादी गोष्ट बोलतो तेव्हा तुम्हाला सहजपणे उत्तर देता यायला हवं. कुणाच्या चुकीच्या बोलण्याला उत्तर देणे म्हणजे भांडण करणे होत नाही आणि हीच बोलण्याची कला तुम्हाला शिकायची आहे की भांडण न करता न रागवता लोकांना उत्तर द्यायचं आहे. म्हणूनच या गोष्टीला कला म्हणतात.

हे वाचा:   पटपट जेवण बनवायचे असेल तर करायचे हे एक काम.! अर्ध्या तासातच बनत जाईल दहा माणसाचे जेवण.!

बरेच लोक म्हणतात की आम्ही बोलत नाही कारण आम्ही बोलल्यानंतर भांडणे वाद होतात, आम्ही एक उत्तर दिलं की समोरचा आणखी उत्तर देतो आणि आम्हाला बोलता येत नाही. पण तुम्ही कधी बोललीच नाही केवळ लोकांचे ऐकून घेत राहिले तर तुम्हाला कधीही ही कला अवगत होणार नाही. तुम्ही कधीही बोलू शकणार नाही. कोणीही तुमचा अपमान करून निघून जाईल आणि हे तुमच्या सोबत कायम होत राहील. म्हणून योग्य ठिकाणी योग्य ते बोलण्याची कला आपल्याकडे असायला हवी आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी बोलत नाही स्वतःसाठी उभे राहत नाही तोपर्यंत कोणीही तुमच्यासाठी तुमच्या मदतीला येणार नाही.

नंबर तीन तुम्ही वाईट संगती पासून आणि मूर्ख लोकांपासून स्वतःला कायम लांब ठेवा. असे लोक कायम आपल्याला खाली खेचण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही. समोरच्याची चेष्टा करणे टोमणे मारणे समोरच्याला खाली खेचणे अशा वृत्तीचे लोक कायम आपल्याला खाली खेचण्याच्या प्रयत्नात असतात. त्यांना आपलं चांगलं झालेलं बघवत नाही. समोरच्याची चेष्टा करणे टोमणे मारणे समोरच्याला खाली खेचणे अशा प्रकारच्या लोकांपासून कायम लांब राहा. आजचा आमचा हा लेख आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू या एका नवीन लेखामध्ये.