तोंडाची चव वाढवणारी लसणाची गोळी.. महिनाभर टिकणारी लसणाची गोळी.!

ट्रेंडिंग

मित्रांनो या आधी तुम्ही लसणाची सुकी चटणी नक्कीच खाल्ली असेल, पण आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीत एकदम यूनिक लसणाची गोळी चटणी कशी बनवायची त्याची रेसिपी बघणार आहोत. लसणाच्या चटणीचा हा एकदम नवीन प्रकार आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की वाचा. थालीपीठ झालं, पराठे झाले, वेगवेगळ्या प्रकारचे डोसे झाले, आप्पे झाले, इडली झाली किंवा तुम्हाला चपाती किंवा भाकरी बरोबर अगदी आयत्यावेळेस खाता येईल. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. नवीन प्रकारची गोळी लसुणी चटणी अगदी 15 ते 20 मिनिटात तुम्ही तयार करू शकता.

त्यासाठी गॅसवर पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि तेलाच्या किटलीतली अर्धी पळी किंवा दोन चमचे आपण तेल घेतलेल आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घेणार आहोत. मोहरी छान फुलायला लागली की अगदी पाव चमचा मेथी दाणे घेणार आहोत. मेथी दाणे सुद्धा आपल्याला छान फुलवून छान फुलवून घ्यायचे आहे. एक चमचाभर आपण इथे धने घेतलेले आहे आणि अर्धा चमचा आपण इथे जिर घेतलेल आहे. एक 10-15 कढीपत्त्याची पान घेतलेली आहे. आता ही फोडणीमध्ये घातली की ती वेगळी काढली जातात म्हणून अशा चटण्यांबरोबर किंवा पराठ्यांबरोबर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता अगदी मंद आचेवर छान क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत, यातल सगळं पाणी नष्ट होईपर्यंत आपण छान परतून घेतलेला आहे.

अगदी छान आपला कढीपत्ता मस्त तळून झालेला आहे. आता या स्टेजला इथे आपण एक पाच सहा बेडगी मिरच्या तुकड्यांमध्ये घेतलेल्या आहेत. अजिबात तिखट नसते, मात्र चटणीला रंग छान येतो आणि चवीला ही चटणी अगदी छान लागते. बेडगी मिरच्या तुमच्याकडे नसतील कोणत्याही लाल सुक्या मिरच्या तुम्ही इथे वापरू शकता. एक मिनिटभर छान परतून घेतलेला आहे आणि यामध्ये एक तीन चमचा आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहे. तीळ सुद्धा अगदी मंद आचेवर एक दोन मिनिट आपण छान लालसर रंगावर परतून घेणार आहोत. गॅस ही सगळी जिनस भाजत असताना अजिबात मोठा करायचा नाही, अगदी मंद आचेवर अगदी तळापासून ढवळत अगदी खरपूस छान सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेतलेल आहे.

हे वाचा:   तुमचे नाव नीरज असेल तर तुम्हाला मिळेल फ्री मध्ये पेट्रोल, नीरज चोप्रा ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकल्यामुळे पेट्रोलपंप चालकाचा निर्णय.!

असं छान भाजून झालं की एका सेपरेट ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि पंख्याखाली आपण एका बाजूला थंड करायला ठेवणार आहोत. आता हे थंड होतय तोवर बाकीची जिन्नस आपण भाजून घेणार आहोत. यासाठी सेम पॅन पुन्हा गरम करत ठेवलेला आहे. आता यामध्ये अजिबात तेलाचा वापर करायचा नाही. अर्धी वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणता 50 g प्रमाणात कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. काही जणांना शेंगदाणा चालत नाही किंवा खाल्ल्यावर त्रास होतो, पोट वगैरे दुखत, तर अशा वेळी शेंगदाण्या ऐवजी तुम्ही फुटाण्याची डाळ किंवा फुटाणे साल काढून घातले तरी सुद्धा चालू शकेल. शेंगदाणे या चटणीमध्ये वापरल्यामुळे छान त्याला एक तेलकटपणा आणि छान चवीची चटणी तुमची तयार होते.

सुरुवातीला दोन मिनिट मोठ्या आचेवर आणि पाच सहा मिनिट अगदी मंद आचेवर अगदी आतपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणा भाजून घेतलेला आहे. आता याच वाटीने अर्धी वाटी आणि 50 ग्राम प्रमाणात किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. डेसिकेटेड कोकोनट पावडर घेतली तरी सुद्धा चालू शकेल. आता खोबरं शेंगदाणा भाजायला अजिबात आपण इथे तेलाचा वापर केलेला नाही कारण याला स्वतःच तेल सुटतं. खोबरं भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही. दोन मिनिट मध्यम आचेवर त्यातला सगळा कच्चेपणा काढून आपल्याला मस्त भाजून घ्यायच आहे. रंग खूप जास्त बदलायचा नाही. हलकासा बदामी झाला की गॅस आपण बंद केलेला आहे.

आता सगळ्यात शेवटी हे सगळी जिन्नस आपल्याला संपूर्ण थंड करून घेणं गरजेच आहे. थंड झाल्यानंतर आपण याची चटणी करायला घेणार आहोत कारण गरम गरम केली की चटणी पटकन खराब होते. ज्याही मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला ही चटणी करून घ्यायची आहे ते स्वच्छ कोरड असावं, पाण्याचा अंश नसावा जेणेकरून चटणी तुमची छान टिकायला मदत होईल. तर इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला भाजून घेतलेली ताटातली जिन्नस काढून घेतलेली आहे. मगाशी आपण पाच सहा बेडगी मिरच्या घेतलेल्या होत्या, त्याने चव तुमच्या चटणीला छान येते आणि इथे आपण साधारणतः दोन चमचे भरून काश्मिरी मिरची पावडर घातलेली आहे.

अजिबात तिखट नसते मात्र चटणीला रंग अगदी छान येतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे बेडगी मिरच्या नसतील तर साधारणत दोन अडीच चमचे तुम्हाला इथे काश्मिरी मिरची पावडर वापरायची आहे. आणि सोबतच इथे आपण अगदी पाव चमचा हळद पावडर घातलेली आहे. अर्धा चमचा किंवा तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ घालायच आहे.

हे वाचा:   लोकं तुम्हाला चिल्लर समजतात कारण... तुम्ही स्वतःला तसंच दाखवता.!

अजिबात पाण्याचा उपयोग न करता ही चटणी आपण सुरुवातीला थोडी मोठी मोठी फिरवून घेतलेली आहे. याच मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा याच मसाल्यांबरोबर भाजलेले शेंगदाणे आणि थंड झालेलं खोबरं आपण घातलेल आहे. सगळी जिन्नस आपल्याला थंड करून घेणं गरजेच आहे. सोबतच साधारणत एक 30 ते 35 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. पण लसणाच्या चटणीसाठी लसूण पाकळ्या जेव्हाही घेता ना तर आदल्या दिवशी किंवा एक पाच सहा तास आधी पंख्याखाली आपल्याला पसरून लसूण ठेवायचा आहे, म्हणजे यातल सगळं पाणी नष्ट होतं आणि चटणी टिकायला मदत होते.

तर इथे साधारणतः मोठ्या 30 ते 35 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. तुमच्याकडे लहान असेल तर 45 ते 50 घेऊ शकता आणि पुन्हा मिक्सरला आपण ही चटणी छान फिरवून घेतलेली आहे. चटणी फिरवत असताना चालू बंद चालू बंद करत करायची आहे तर बघू शकता हे छान गोळीप्रमाणे दिसतय, म्हणून ही गोळी लसुणी चटणी आपली तयार झाली. शेंगदाणा असेल, खोबर असेल त्याला स्वतःच तेल सुटतं आणि सुरुवातीला फोडणीसाठी आपण थोडस तेल वापरलेल होत ना त्यामुळे चटणीला असा हा छान घाटी मसाल्याप्रमाणे किंवा कांदा लसूण मसाल्याप्रमाणे छान टेक्सचर आलेला आहे.

अशी ही तुमची लसुणी गोळी चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. चटणी तयार झाली की संपूर्ण थंड करून घ्यायची. हवी असेल तर अशीच तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा अस हे गोळी गोळी करून छोटे गोळी करून तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता. एखाद्या दिवशी घरामध्ये चटणी किंवा भाज्या वगैरे केल्या नसतील तर ही चटणी तुम्ही चपाती, भाकरी, डोसा, उत्तपम अगदी सगळ्यांबरोबर खाऊ शकता.

तर मित्रांनो ही चटणी नक्की करून बघा आणि कशी झाली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर आजचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.