निगेटिव्ह आणि फालतू विचार 100% बंद होतील.. फक्त या चार गोष्टी करा..

ट्रेंडिंग

मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का एका रिपोर्टनुसार आपण दिवसाला 60 ते 65 हजार विचार करतो आणि सामान्य माणसाचे त्यातले 90% विचार हे नकारात्मक असतात आणि महत्त्वाचं म्हणजे माणसाला आपण नेगेटिव विचार करत आहोत हेच माहिती नसते. बऱ्याच वेळा असे होते की शारीरिक क्रिया पेक्षा आपला मानसिक थकवा जास्त असतो. त्यामुळे आजच्या लेखात आपण बघणार आहोत की ही नकारात्मक विचारांची साखळी आपल्याला अशी थांबवता येईल? हे विचार कसे कमी करता येतील? हे फालतू विचार आपल्या मनातून कमी तर झालेच पाहिजे.

पहिले तर बघुयात की विचार आणि फालतू विचार करणे यात काय फरक आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट, विशिष्ट ध्येय आपल्याला गाठायचे असते आणि मग आपण त्याच्यावर विचार करतो. या प्रकारचे विचार आपल्यासाठी चांगले असतात आणि ते आपल्याला प्रगतीपथावर घेऊन जातात. पण एखाद्या गोष्टीबद्दल आपण काही साध्य करू शकत तर आपण निश्चित त्याबद्दल चुकीचा विचार करतो त्याला नकारात्मक किंवा अनावश्यक विचार म्हणतात. हे असले विचार आपल्या मनामध्ये टेन्शन नैराश्य मानसिक ताण निर्माण करतात. समजा एका विद्यार्थ्यांची परीक्षा जवळ आली आहे, आणि मग तो योग्य प्रकारे नियोजन करतो की कसा अभ्यास करायचा, सकाळी किती वाजता उठायचे, किती तास वाचायचे, किती तास लिखाण करायचे वगैरे वैगरे.

त्याचे विचार त्याच्या हिताचे आहे आणि त्याला प्रगती करण्यासाठी मदत करतील कारण या सगळ्यांवर तो कृती करू शकतो. पण आता त्या विद्यार्थ्यांची परीक्षा झाली आणि नंतर तो विचार करतो की त्याला किती मार्क्स भेटतील, एवढी टक्केवारी भेटेल ना मला? एवढे टक्के नाही मिळाले तर मला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार नाही. आता हे जे विचार आहेत ते सगळे फालतू आणि नकारात्मक आहेत. कारण असा विचार करून काही फायदा होणार नाही कारण परीक्षा आता संपली आणि ज्या गोष्टीवर तो काही करू शकत त्या गोष्टींचा विचार करून काही होणार नाही. मला वाटतं तुम्हाला कळाले असेलच की सकारात्मक आणि नकारात्मक विचारांमध्ये काय फरक आहे. आता हे विचार थांबवता कसे येतील किंवा त्यांची संख्या कशी कमी करता येईल यासाठी मी तुम्हाला चार सूत्रे सांगणार आहे.

हे वाचा:   साबुदाणा न भिजवता.. १० मिनिटात कुरकुरीत साबुदाणा वडा बनवा तेही घरच्या घरी.!

पहिले सूत्र लक्ष ठेवणे. लोकांच्या लक्षात पण येत नाही की त्यांच्या मनात कोणत्या प्रकारचे विचार येतात आणि जातात. त्यामुळे कधी विचारांची सांगड चालू होते आणि कधी आपण त्यात गुरफटून जातो आपल्याला पण कळत नाही. जेव्हा आपण फेसबुक बघतो तेव्हा आपल्या खास मित्रांनी आपला फोटो लाईक केलेला नसतो तेव्हा आपल्या मनात विचार चालू असतो की त्याने माझ्या फोटोला लाईक केले नाही आणि दुसऱ्या कोणाच्या तरी फोटोला लाईक केले. किंवा मग आपल्याला त्याची एखादी स्टोरी दिसते ज्यात तो मित्र थेटर मध्ये पिक्चर बघत असतो पण तुम्ही विचार करता की त्याने मला विचारले पण नाही. अशा प्रकारे तुमच्या विचारांची साखळी चालू होते आणि मग बर्याच वेळानंतर आपण भानावर येतो आणि तेव्हा आपल्याला कळते की विचारात बराच वेळ निघून गेला आहे. त्यामुळे विचारांवर आपण लक्ष ठेवायला शिकले पाहिजे.

दुसरे सूत्र स्वीकार करणे. मित्रांनो काय असते बऱ्याच वेळेला गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडतात आणि मग आपण सारखं त्या गोष्टीचा विचार करत असतो. संध्याकाळी ऑफिसला गाडीवर चाललो आहोत आणि अचानक एखादा माणूस तुम्हाला ओव्हरटेक करतो, आपण प्रचंड रागावतो आणि वेळ पडली तर त्याला शिव्या पण देतो. ऑफिसमध्ये गेल्यावर सुद्धा सारखा तोच विचार करतो आणि मग आपल्या पूर्ण दिवसावर आणि कामावर त्या घटनेचा परिणाम होतो. अशा वेळेस स्वीकार करणे हा त्याला पर्याय आहे. आपण असा विचार करायचा की समोरच्याचे जे संस्कार आहेत तो त्याप्रमाणे वागतो. त्यामुळे ज्यावेळेस आपण मनामध्ये असा स्वीकार करतो त्यावेळी लगेच आपल्याला बरे वाटते, आपण ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून देतो. एखादी घटना तुमच्या मनाविरुद्ध घडली आणि जिथे तुम्ही काही करू शकत नसाल तर लगेच त्याचा स्वीकार करा.

हे वाचा:   तुळशीच्या वाढीसाठी द्या ह्या २ गोळ्या.. 4 दिवसात तुळस होईल घनदाट.!

पुढील सूत्र आहे नियंत्रण. आपले नियंत्रण फक्त आपल्या अॅक्शन किंवा कृतीवर असते. मित्रांनो मला वाटतं हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला जाणवेल कि तुमच्या हातामध्ये फक्त तुमच्या अॅक्शन म्हणजे तुमच्या कृती आहेत, बाकी काही तुमच्या हातामध्ये नाही. दुसरा तुमच्याबद्दल काय विचार करतोय, या देशाचे भविष्य काय असेल, लोकांनी कसे वागले पाहिजे हे काहीच तुमच्या हातात नाही.

तुम्ही तुमच्या कृतीमुळे या गोष्टी बदलू शकता पण त्यामुळे जग बदलेल की नाही हे तुम्ही सांगू शकत नाही. ज्यावेळेस तुम्हाला याची जाणीव होईल त्या वेळेस तुमचे दुसऱ्यांना दोष देणे कमी होईल आणि मग तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या कृतीवर लक्ष केंद्रित कराल. चांगला अभ्यास करणे विद्यार्थ्यांच्या हातात आहे पण मार्क्स किती पडतील हे त्यांच्या हातात नाही. त्यामुळे जास्तीत जास्त तुमची कृती चांगली आणि प्रभावी कशी होईल याकडे लक्ष द्या आणि तुम्ही तुमच्या कृतीमुळे दुसऱ्यांमध्ये बदल घडवू शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमची पात्रता वाढवावी लागेल. त्यामुळे लक्षात ठेवा आपल्या हातात आपल्या कृती आहेत.

चौथ सूत्र म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन नाव ऐकून घाबरून जाऊ नका. मला मान्य आहे मेडिटेशन थोडे बोरिंग असते. पण मी सांगेल रोज 10 मिनिटे मेडिटेशन करून बघा. कसे असते जोपर्यंत आपण काही गोष्टी करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा परिणाम भेटणार नाही. तुम्ही मेडिटेशन करून बघा, तुमच्या विचारांची संख्या झपाट्याने कमी होईल. मित्रांनो मी तुम्हाला वर चार सूत्रे सांगितलीच आहेत. तर आजचा हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि ज्यांना हे ऐकण्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा लेख नक्की पोहचवा.