पतीची प्रगती उन्नती होण्यासाठी पत्नीने हे 5 काम करावे पत्नीच्या या 5 कामामुळे पतीला 100% यश मिळत.!

अध्यात्म

नमस्कार मंडळी तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. तर मंडळी आपण या लेखात स्त्रियांनी पतीची उन्नत व प्रगती होण्यासाठी कुठले कार्य केले पाहिजे यावर सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी व अन्नपूर्णाचे स्वरूप मानले जाते. पतीची प्रगती होण्यासाठी पत्नीचे कर्म सुद्धा कामी येतात. पत्नीने केलेले पूजापाठ याचे पुण्य पतीला आपसूकच मिळते. पत्नीने केलेले चांगले कर्म पतीच्या उन्नतीसाठी शुभ फलदायी ठरू शकते व या उलट पत्नीने केलेल्या चुकीचे कर्मामुळे पतीची उन्नती थांबू शकते.

स्त्री ही त्याग, सहनशीलता व ममतेची मूर्ती मानली जाते. संपूर्ण घराची जिम्मेदारी घेऊन, आपल्या मुलाबाळांचे योग्य पद्धतीने संगोपन करणारी सुद्धा स्त्रीच असते. असे काही काम असतात की ते केल्यामुळे संपूर्ण घरातील वातावरण सकारात्मक प्रेमळ व कलह रहित होऊन घरातील लोकांची प्रगती होऊ लागते, ते कर्म कोणते आहेत ते आपण पाहूयात. अशी काही कामं आहेत जी केल्यामुळे घरातील लोकांची उन्नती, प्रगती होऊ लागते. जी स्त्री सकाळी लवकर उठून आपला मुख्य दरवाजा झाडून काढते व त्यावर पाणी शिंपडत, मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढते व चौकटीची पूजा करते अशा स्त्रीच्या घरी लक्ष्मी आनंदाने प्रवेश करते. घरामधील लक्ष्मी स्थिर होते व पतीची दिवसेंदिवस प्रगती होऊ लागते, म्हणून प्रत्येक स्त्रीने सकाळी लवकर उठून हे नित्य कर्म केले पाहिजे.

दुसरे कर्म आहे, जी स्त्री रोज सकाळी व सायंकाळी तुळशीची पूजा करते व तुळशीसमोर तुपाचा दिवा लावते, अशा घरी माता लक्ष्मी भरभरून यश देतात, पण तुळशीची पूजा रविवारी मात्र वर्ज्य मानली जाते, म्हणून रविवार सोडून बाकीच्या दिवशी तुम्ही तुळशीची रोज पुजा करा व तुळशीच्या समोर तुपाचा दिवा लावा, यामुळे घरामधील लक्ष्मी स्थिर होईल, घरांमधून कधीच निघून जाणार नाही.

हे वाचा:   रोज देवपूजेत दिवा लावताना बोला हे 3 शब्द; कितीही मोठा शत्रू असुदे तुमच्यासमोर गुडघे टेकेलच.!

तिसरे कार्य आहे स्वच्छतेचे. स्वच्छतेत माता लक्ष्मीचा वास असतो. ज्या घरामध्ये घराची रोजच स्वच्छता केली जाते अशा स्त्रीवर माता लक्ष्मी प्रसन्न राहते. स्वच्छतेमध्ये उपयोगात येणारा झाडू हा माता लक्ष्मी चा सूचक मानला जातो, असा लक्ष्मी स्वरूप झाडू घरामध्ये ठेवतानाही काळजी घ्या. आपल्या झाडुवर बाहेरच्या
कोणाची नजर पडणार नाही याची काळजी घ्यावी. झाडू कधीही उभा ठेवू नये. झाडू नेहमी आडवा व आडोशाला ठेवावा व सूर्यास्ताच्या आधीच घर झाडून काढावे आणि पुसावे सुद्धा. यामुळे लक्ष्मी घरांमधून कधीही निघून जाणार नाही. त्याचबरोबर रात्री कचरा घराबाहेर कधीही फेकू नका, तो सकाळी फेकावा.

स्वयंपाक नेहमी आंघोळ करूनच बनवला पाहिजे. प्रत्येक स्त्रीने स्वयंपाक आंघोळ करुनच बनवला पाहिजे. आपण खाल्ल्या जाणाऱ्या अण्णा प्रमाणे आपले विचार बनतात. जर आपण अन्न शुद्ध खाल्लेल असेल तर आपले विचार सुद्धा शुद्ध बनतात म्हणून कधीही स्वयंपाक आंघोळ करूनच केला पाहिजे.

तिसरे कार्य आहे जी स्त्री पहिली रोटी गाईला देते तिच्या घरची प्रगती होणारच हे निश्चित. त्याचबरोबर रात्रीच्या भोजनानंतर भांडी रात्रीच स्वच्छ करावी, रात्री खरकटी भांडी तशीच ठेऊ नये. रात्री किचन स्वच्छ झाडून पुसून ठेवावे कारण रात्री लक्ष्मी आपल्या स्वच्छ किचनकडे पाहून प्रसन्न होते व या उलट जर खरकटी भांडी असतील तर लक्ष्मी आपल्यावर नाराज होते. सकाळी उठल्यानंतर स्वच्छअशा किचनला पाहून आपणास सुद्धा प्रसन्न वाटते व याउलट जर खरकट्या भांड्यावर आपली पहिली नजर पडत असेल तर आपल्या घरामध्ये दरिद्रता प्रवेश करते.

हे वाचा:   तुमच्या पायाच्या अंगठ्यापेक्षा बाजूच बोट मोठ आहे का? लाखात 1 नशीबवान स्त्री पुरुषाचा पाय असा असतो... पायाच्या बोटावरून जाणून घ्या आपलं नशीब कस आहे.!

प्रत्येक शुक्रवारी घरामध्ये वैभव लक्ष्मीची पूजा करावी. पोथी वाचणे शक्य नसेल, उपवास करणे शक्य नसेल तर वैभव लक्ष्मीची पूजा व आरती करावी व कापुराची आरती घरामध्ये सगळीकडे फिरवावी, अगदी कानाकोपऱ्यात. यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये चिरस्थायी टिकून राहतो, कारण लक्ष्मीला चंचला म्हटलं जातं, ती खूप चंचल आहे. लक्ष्मीला घरामध्ये टिकून राहावे म्हणून आपण काही प्रयत्न केले पाहिजेत. तसेच शुक्रवारी लक्ष्मी मंत्राचा जप करावा. हातामध्ये एक विलायची व एक लवंग घ्यावे व ओम श्रीम श्री हे कमलालये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा व ही विलायची व लवंग आपण पैसे ठेवतो त्या जागी ठेवा. लक्ष्मी घरामध्ये स्थिर होईल. पतीची उन्नती होऊ लागेल.

पुढचे कार्य आहे स्त्रियांनी महादेवा समवेत माता पार्वतीची सुद्धा पूजा अवश्य करावी, यामुळे अखंड सौभाग्यवती चा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो. माता गौरी ही आदिशक्ती आहे तिची पूजा केल्यामुळे जीवनात अनेक लाभ मिळू लागतात, याचा उपयोग आपल्या पतीला सुद्धा होतो, म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीला दीर्घआयुष्याची प्राप्ती व्हावी म्हणून माता गौरीची पूजा करावी. पुढचे कार्य आहे जी स्त्री अन्न वाया घालत नाही, घरामधील वडीलधाऱ्या लोकांचा मान ठेवते घरात आलेल्या आदींचा सन्मान करते, अन्न व पाणी विनाकारण वाया घालत नाही, अशा घरी लक्ष्मी निवास करते. मंडळी जर हा लेख आवडला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा.