नमस्कार, स्वागत आहे तुमचे. आज आपण या लेखात तुळशीच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी, ती हिरवीगार, घनदाट होण्यासाठी एका वस्तूचा वापर करणार आहोत. तर ती वस्तू कोणती, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच. पण आता तुळशीच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणकोणती कामे करायची? जर झाडावरती कीड पडली तर कोणते कीटकनाशक फवारायचे याची देखील माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. तर त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
आपल्या दारातील तुळस ही जेवढी वाढते, बहरते तेवढीच ती आपल्या घरामध्ये ही सुख आणि समृद्धी घेऊन येत असते त्यामुळे दारातील तुळस ही चांगली वाढावी यासाठी झाडाची थोडी काळजी देखील ही घ्यावी लागते. तुळशीच्या झाडाच्या वाढीसाठी तिला जास्त खते देण्याची आवश्यकता नसते. मात्र या झाडाला सूर्यप्रकाश आणि पाणी या दोन गोष्टी ह्या योग्य प्रमाणामध्ये ह्या मिळायला हव्या.
तरच तुळशीचे झाड हे चांगले वाढते आणि आता या वातावरणामध्ये, गारवा, थंडावा असल्यामुळे या झाडांना पुरेसे ऊन हे मिळत नाही आणि सकाळच्या वेळी जे बाष्प तयार होते ते झाडाच्या या पानावरती पडले तर त्याते बुरशी तयार होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुळशीचे झाड लावलेली जी कुंडी आहे ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभरामध्ये भरपूर असे या झाडाला ऊन मिळेल.
तुळशीच्या झाडासाठी आज आपण या कापूराचा वापर करणार आहोत. देवपूजेमध्ये जो आपण कापूर वापरतो तो हा तुळशीच्या झाडासाठी खूप उपयुक्त असा आहे. आता हिवाळ्यामध्ये तर तुळशीच्या झाडासाठी याचा वापर हा जरूर करावा कारण हिवाळ्यामध्ये तुळशीच्या झाडाची वाढ ही म्हणावी तशी चांगली होत नाही.
झाडावरती कीड, बुरशी ही जास्ती प्रमाणामध्ये आणि लवकर लागत असते त्यामुळे या कापूरचा वापर जर तुळशीच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होते आणि झाडाला कीड किंवा बुरशी देखील लागत नाही किंवा लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होते आणि याचा वापर देखील आपल्याला जास्ती प्रमाणामध्ये करायचा नाही.
तर एवढ्या दोन कापूराच्या गोळ्या ह्या एका झाडासाठी पुरेशा आहेत. तर याचा वापर कसा करायचा हे आपण पाहूयात. तुळशीच्या झाडाला देण्यापूर्वी हा जो कापूर आहे याची पावडर करून घ्यायची. आता ही जी कापूराची पावडर तयार केलेली आहे याचा वापर देखील आपण झाडाला दोन प्रकारे देऊ शकतो, एक तर ही तयार केलेली पावडर आहे ती तुम्ही मातीमध्ये मिक्स करून देऊ शकता किंवा एक लिटर पाण्यामध्ये ही पावडर व्यवस्थित मिक्स करून या पाण्याचा तुळशीच्या झाडावरती फवारा देखील हा करता येतो. फवारा केल्यामुळे जर झाडावरची जी कीड आहे ती निघून जाण्यासाठी ही मदत होत असते.
तुळशीच्या झाडाच्या कुंडीतील माती देखील अधून मधून हलवून थोडी मोकळी करावी त्यामुळे मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहतो आणि झाडाच्या या मुळांना ऑक्सिजन व्यवस्थित पोहोचला गेल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ ही चांगली होते. आपल्या झाडाची वाढ देखील त्यामुळे चांगली होत असते.
तुळशीच्या झाडाला पाणी मात्र हे योग्य प्रमाणामध्येच द्यावे कारण या झाडावर्ती ज्या काही समस्या निर्माण होतात त्या झाडाला हे जास्ती पाणी दिले गेल्यामुळे ह्या होत असतात. आपल्या हिंदू धर्मामध्ये रोजच्या देवपूजेनंतरचे जे पाणी आहे ते ह्या झाडाला दिले जाते आणि हे जे रोजचे पाणी आहे ते झाडांच्या मुळांमधे शोषण्याची तेवढी क्षमता नसल्यामुळे तुळशीच्या झाडाची जी मूळ आहेत ते सडतात आणि खराब होतात.
त्यामुळे झाडाला पाणी देताना कुंडीतील माती चेक करूनच द्यावे, जेव्हा कुंडीतील माती वरच्या बाजूची एक ते दोन इंच एवढी कोरडी होईल तेव्हाच पाणी द्यावे. हिवाळ्यामध्ये तर दोन ते तीन दिवसातून एकदा पाणी दिले तरी देखील पुरेसे होते. आता ही जी तयार केलेली पावडर आहे ती मातीमध्ये सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि एक दिवस असेच ठेवून दुसऱ्या दिवशी आपल्याला या झाडाला पाणी द्यायचे आहे.
आता ही कापूरापासून तयार केलेली ही जी पावडर आहे त्याचा तुम्ही झाडावरती स्प्रे करण्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये ह्या दोन गोळ्यांची जी पावडर आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि जे तयार केलेले पाणी आहे त्याचा तुळशीच्या झाडावरती सर्वत्र व्यवस्थित फवारा करून घ्यायचा.
महिन्यातून एकदा जरी तुम्ही याचा फवारा तुळशीच्या झाडावरती केला तरी देखील तुळशीच्या झाडावरती कीड ही लागणार नाही किंवा जरी लागली असेल तर ती निघून जाण्यासाठीही मदत होईल. तर अशापकारे घरच्या घरी तुम्ही कापूराचा वापर तुळशीच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ ही चांगली होईल. झाडावर कसल्याही प्रकारची कीड किंवा बुरशी ही लागणार नाही. तर मित्रांनो असा हा आजचा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.