येणारे घाण ढेकर, पोट फुगणे, सतत लागणाऱ्या उचक्या, जेवल्यावर अस्वस्थ वाटणे सगळे मुळापासून होईल बंद.!

आरोग्य

मित्रांनो अनेकदा आपल्या पैकी सर्वांनाच कदाचित हा अनुभव असेल की आपल्याला सलग उचक्या लागत आहेत आणि पाणी पिल्यानंतर देखील त्या थांबत नाहीत. किंवा काहीही न खाता-पिता देखील असल्याकडे कर येत आहे. अशामुळे आपले कामांमध्ये लक्ष लागत नाही अशा वेळेला काय करावे हे पटकन समजत नाही. यावर फार काही कधी कोणीही बोलतही नाही आणि सांगतही नाही.

तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत असाच एक खास घरगुती उपाय ज्यामुळे तुम्ही आता सतत येणाऱ्या उचक्या आणि ढेकरा देखील त्वरित बंद करू शकता. हे उपाय तुम्ही नक्की करून पहा अत्यंत रामबाण असे उपाय आहेत. यासाठी तुम्हाला काही औषधे घेण्याची गरज नाही आणि खूप सारे पैसे खर्च करण्याची तर अजिबातच गरज नाही. छोटे-छोटे घरगुती उपाय जे आपल्या जुन्या काळी आजीच्या बटव्यातील आहेत ते देखील आपल्याला अत्यंत कामी येतात.

यासाठी तुम्हाला दोन केळी घ्यायचे आहेत. याची साल काढून घ्या. यासोबत तुम्हाला खडा हिंग एकच ज्वारीच्या दाण्या प्रमाणे घ्यायचा आहे. इतकाच हिंग पुरेसा आहे. पावडर हिंग वापरत असाल तर थोडासा जास्त हिंग घ्या. म्हणजेच एक चिमूटभर घ्या. हे सोललेले केळ सुरीने मधोमध कापून घ्या. त्यामध्ये हिंग भुरभूरा. असे करून पाच मिनिटं हे केळ तसेच राहू द्या. हिंगाचे प्रमाण वाढवू नका अन्यथा ते खाल्ले जाणार नाही.

हे वाचा:   अमृत आहे लसूण, परंतु अशा प्रकारे खायला हवे, 99 टक्के लोक करतात चुकीच्या पद्धतीने सेवन, जाणून घ्या लसुन खाण्याची योग्य पद्धत.!

केळ्याचे बारीक काप करून तुम्ही असे केळे सेवन करा. सकाळपासून दुपारपर्यंत हे खेळ तुम्ही कधीही खाऊ शकता. परंतु असे रात्री खाऊ नये. दुसरा उपाय : ज्या लोकांना केळ खाल्याने त्रास होतो त्या लोकांसाठी दुसरा उपाय सांगत आहोत. छोटा गूळाचा तुकडा घ्या जो वजनाला जवळपास दहा ग्रॅम असेल. त्यामध्ये एक ज्वारीच्या दाण्या प्रमाणे हिंग घ्या.
दोन्ही गोष्टी बारीक करून व्यवस्थित मिक्स करून घ्याव्यात.

या दोनही गोष्टी सोबत चावून सेवन केल्याने तुम्हाला अचानकपणे येणाऱ्या सतत उचक्या किंवा ढेकरा देखील कमी होऊ लागतात. उपाय तिसरा : आपल्या घरात जीरे देखील अत्यंत सहजपणे आढळतात. असे जिरे एका पॅन मध्ये घेऊन हलके भाजून घ्यावेत. त्याची पावडर बनवा. गरमी मध्ये जिरा पावडर खूप कामी येते. ज्यांना जेवण केल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात ढेकरा येतात त्यांनी जिरा पावडर अर्धा चमचा घ्या. यामध्ये एक चमचा मध घाला.

हे वाचा:   दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टर नेहमी जीभच का बघतो.? माहिती आहे का.? ही माहिती तुम्हाला कोणी नाही सांगणार.! त्यामागे असते हे लॉजिक.!

हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून ते चाटण करा. हा उपाय केल्याने तुम्हाला ढेकरा आणि उचक्या येणे त्वरित थांबते. किंवा हे मिश्रण तुम्ही केळा सोबत देखील खाऊ शकता. केळ हे फळ तुमच्या पचनासाठी अत्यंत चांगले असते. अशाप्रकारे सांगितल्याप्रमाणे तुम्ही उपाय केल्यास तुम्ही व्हाल ढेकर आणि उचक्या यांपासून होणाऱ्या त्रासापासून मुक्त. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *