प्रत्येक महिला व पुरुष यांना सुंदर दिसायचे असते आणि म्हणूनच प्रत्येक जण आपण कसे सुंदर दिसू यासाठी वेगवेगळ्या प्रयत्न करत असतात. आपल्यापैकी अनेकजण घरी उपाय करतात. काहीजण पार्लरमध्ये जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट करत असतात. अनेकजण जाहिराती पाहतात. या जाहिरातीमध्ये सुंदर मॉडेल आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या मॉडेल कडे बघून प्रत्येकाला असे वाटते की आपण जर या मॉडेल सारखे दिसू लागलं तर किती बरे होईल ना..
परंतु अनेकदा ही इच्छा इच्छाच राहते परंतु तुमच्या मनात देखील झाल्यातीमध्ये दिसणाऱ्या मॉडेल सारखे तुम्हाला बनायचे असेल तर आजच्या लेखांमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. ही माहिती तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची ठरणार आहे की, तुम्ही काही दिवसांमध्ये जाहिरातीमधील दिसणाऱ्या मॉडेल सारखे दिसू लागाल.
आजचे लेखांमध्ये आपण जो उपाय जाणून घेणार आहोत तो उपाय प्रत्यक्ष जपान मधील अनेक महिला करत असतात आणि म्हणूनच जपानी महिलांचे सौंदर्य रहस्य या उपायामुळे उलगडणार आहे चला तर मग जाणून घेऊया आपल्याला हा उपाय कसा करायचा आहे त्याबद्दल… आपल्यापैकी अनेकांची त्वचा काळी पडलेली असते.
त्वचेवर काळे डाग, वांग, पिंपल्स आलेले असतात आणि म्हणूनच अशावेळी त्वचा दिसायला अत्यंत घाणेरडी दिसते. ही त्वचा जर आपण वेळेतच स्वच्छ केली नाही किंवा त्वचेचे समस्या यावर उपाययोजना केल्या नाही तर भविष्यात वेगवेगळ्या आजार देखील होण्याची शक्यता असते व तुमची त्वचा खराब देखील होऊ शकते आणि म्हणूनच जर आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे काळे डाग आले असतील तर यांच्यावर दुर्लक्ष करू नका.
या त्वचामुळे तुमच्या त्वचेचे सौंदर्य खराब होऊ शकते. हे सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी आपण आता काही उपाय जाणून घेणार आहोत. आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला डव साबण लागणार आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचा ब्रँडेड साबण देखील वापरू शकता परंतु आज आपण हा उपाय करण्यासाठी वापरणार आहोत डव साबण. साबण घेतल्यानंतर आपल्याला किसणीच्या मदतीने हा साबण किसून घ्यायचा आहे.
जेणेकरून तीन ते चार चमचा साबण चा कीस तयार होऊ शकेल इतका साबणाचा तुकडा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला संत्री लागणार आहे. संत्री किंवा मोसंबी तुम्ही दोघांपैकी कोणतेही युज करू शकता. संत्री ची साल आपल्याला आता किसणीच्या मदतीने किसून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता आपल्याला एका वाटीमध्ये किसलेल्या साबण तीन चमचा आणि किसलेली संत्री ची साल हे दोन्ही पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे आहेत.
आता या दोन्ही पदार्थांमध्ये संत्री चा रस मिक्स करायचा आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून एक ते दीड तास तसेच ठेवायचे आहे जेणेकरून हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव होतील आणि एक आपल्याला क्रीम तयार होईल. ही क्रीम तयार झाल्यानंतर आपल्याला अजून एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे मक्याचे पीठ.
मक्याच्या पिठाचे अनेक फायदे आपल्या सर्वांना माहिती आहेत. मक्याच्या पिठामध्ये तुमची त्वचा नैसर्गिकरीत्या गोरी करण्याची शक्ती असते आणि म्हणूनच आपण येथे मक्याचे पीठ वापरणार आहोत. एक ते दोन चमचा मक्याचे पीठ आपल्याला वापरायचा आहेत आणि हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे. आता आपल्याला हळद लागणार आहे.
हळद ही तुमच्या चेहऱ्यावरील अनेक जीवजंतू नष्ट करते त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर कोणत्याही प्रकारच्या फोड्या निर्माण झाल्या असेल किंवा जखम झाली असेल तर ही जखम भरून काढण्याची शक्ती देखील हळद मध्ये असते. एक चमचा हळद टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण त्वचेवर लावायचे आहे.
त्वचेवर पेस्ट लावल्यानंतर अर्धा तास तसेच ठेवायचे आहे जेणेकरून या पदार्थांमध्ये असलेले सारे पदार्थ तुमच्या शरीरामध्ये शोषून घेतले जातील आणि त्यानंतर आपल्याला हलका मसाज करायचा आहे. मसाज केल्यानंतर आपल्याला आपल्या चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन टाकायचा आहे, असे केल्याने तुमच्या त्वचेमध्ये झालेला बदल तुम्हाला दिसून येईल. तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर कोणतेही प्रकारचे काळे डाग, पिंपल्स असतील तर ते निघून जातील.
तसेच शरीरावरील मृत पेशी देखील लवकरच नष्ट होतील म्हणूनच घरच्या घरी सहजरीत्या नैसर्गिक पद्धतीने चेहरा उजळण्याचा प्रयत्न करा व तुम्ही देखील जपान मधील लोक ज्या पद्धतीने सुंदर दिसतात त्याच पद्धतीने सुंदर दिसाल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.