उन्हाळ्याच्या सुट्टीत या ठिकाणी एकदा नक्की भेट द्या.

रानीखेत (उत्तराखंड)

हे ठिकाण शांतताप्रिय म्हणून प्रसिद्ध आहे. नवीन आणि साहसी दृश्ये पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी इथे खूप ठिकाणे आहेत.

सुंदर हिल स्टेशन 

राणीखेतला सुंदर हिल स्टेशन असे देखील म्हटले जाते आणि हे चित्रपटांच्या शूटिंगसाठी खूपच प्रसिद्ध आहे. इथे पॅराग्लाईडींग साठीवेगळाच अनुभव मिळतो. 

कूर्ग (कर्नाटक)

हे शहर चहाच्या मळ्यांसाठी खूपच प्रसिद्ध आहे.  इथल्या निसर्गात तुम्ही भटकंती करू शकता.

माऊंट अबू (राजस्थान)

राजस्थानमधील हे प्रसिद्ध ठिकाण उन्हाळी पिकनिक साठी खूप प्रसिद्ध आहे.

स्वस्त ठिकाणे

उन्हाळ्यात इथे गर्मीचा त्रास होत नाही आणि हे इतर ठिकाणांपेक्षाही खूप स्वस्त आहे.

शिलॉंग (मेघालय)

या ठिकाणास स्कॉटलॅंड ऑफ द ईस्ट असे देखील म्हटले जाते. इथे शांत आणि दूरवर पसरलेला तलाव पाहण्यासारखा आहे.

रोमांचक ऍक्टिव्हिटी करा

शिलॉंग मध्ये तुम्ही बऱ्याच ऍक्टिव्हिटी करू शकता. इथे असणारी पाइनची वृक्षे पाहण्यासाठी दरवर्षी जगभरातील पर्यटक येतात.

कलीपोंग (बंगाल)

दार्जिलिंग मधील हे एकमेव प्रचलित ठिकाण आहे, इथे जगभरातील लाखो पर्यटक भेट देतात.

सूर्योदय व सूर्यास्त पाहण्यासारखे

इथं हिरवी शाल पांघरलेल्या डोगरातून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याचा अनुभव खूप सुखद असतो.