सततचे वाहणारे नाक खूप त्रास देत असेल तर करा हे सोप्पे उपाय..

हल्ली वातावरण बिघडलेले आहे. अचानक पाऊस पडतो तर अचानक ऊन पडते. या बदललेल्या वातावरणाचा परिणाम मानवी शरीरावर देखील होत आहे.

आपल्यापैकी अनेक लोकांना सकाळी उठल्या उठल्या खूप मोठ्या प्रमाणात शिंका येण्याचा त्रास होतो. खूप प्रमाणात नाक गळते.

तर आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय देऊ त्याने तुमची हि समस्या कायमची निघून जाईल.

यासाठी तुम्हाला लागणार आहेत मनुके. यालाच अनेकजण बेदाणे असे देखील म्हणतात. अडीचशे ग्राम बेदाणे या उपायासाठी अनेक दिवस चालतील.

तर सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी तुम्ही अशा मनुकांचे सेवन करावे परंतु लक्षात घ्या मनुके सेवन केल्यानंतर तुम्हीएक तास कोणत्याही प्रकारचे पाणी पिऊ नका.

असे तुम्ही सलग दहा दिवस करून बघा. तुम्हाला फरक जाणवला तर हा उपाय तुम्ही सलग एक महिना सुरू ठेवू शकता.

मनुक्यांसोबत तुम्ही शुद्ध गायीचे साजूक तूप देखील घेऊ शकता,  तसेच धुळीची एलर्जी असेल तर तूप आणि मोहरीच्या तेलाचे मिश्रणाचे २-३ थेंब नाकात टाका.