यानंतर फरशी पुसण्याची गरजच पडणार नाही… महिलांनी हे नक्की कराच… बॉटल ला पाडा दोन छिद्र.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, आजच्या या लेखात आपण एकदम आगळ्यावेगळ्या आणि मस्त अशा टिप्स आणि ट्रिक्स पाहणार आहोत. या टीप्स आणि ट्रिक्स बद्दल जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा. तर वेगवेगळ्या प्लास्टिकच्या बॉटल आपल्या घरी नक्कीच असतात, आपण याचा काही ना काही उपयोग करतो. आपला पहिला जो प्लास्टिक बॉटलचा उपयोग आहे त्यासाठी हा वरचा भाग आणि खालचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता आपण यापासून एक जार कंटेनर बनवणार आहोत. यामध्ये वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला ठेवता येतील. हॉस्टेल लाईफ मध्ये, किरायाच्या घरामध्ये तुम्हाला भरपूर मदत होईल किंवा रांगोळी किंवा इतर काही वस्तू ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता.

यानंतर बघा अजून एक प्लास्टिक बॉटल मी घेतलेली आहे आणि त्याचा वरचा भाग असा मी कट केलेला आहे. ही थोडी मोठी बॉटल आहे जी आपल्याला कट करून घ्यायची आहे. आपल्या घरातल जे सिंक असतं ते ब्लॉक झालं की एक तर प्लंबरला बोलून याला स्वच्छ करायचं म्हणलं तर भरपूर पैसे जातात, वेळ जातो त्यासोबत याला स्वच्छ केलं नाही, तर यामधून घानेरडा वास येतो आणि आपलं दररोजच काम थांबत. तर घरच्या घरी तुम्ही या बॉटलच्या मदतीने अशापकारे तुमचं ब्लॉक झालेल सिंक सहज तुम्ही ओपन करू शकता.

यानंतर आपण जे प्लास्टिक बॉटलचा उपयोग करणार आहोत तो तर अगदी प्रत्येक महिलेला खूपच किचनमध्ये कामी येणार आहे. तर आता बघा एक प्लास्टिक बॉटल आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचा आपण असा वरचा भाग फक्त कट करून घ्यायचा आहे. अगदी तुम्ही कोणत्याही बॉटल वापरू शकता. या पाण्याच्या नाही तर इतर कोणत्या बॉटल असतील कोल्ड ड्रिंकच्या त्या देखील वापरल्या तरी चालतील. तस तर आपल्या भरपूर बरण्या कंटेनर असतात पण बऱ्याच वेळा कंटेनर कमी पडतात. तर अशा वेळेस आपण कॅरी बॅगमध्ये असं सामान ठेवतो किंवा तुम्ही हॉस्टेल लाईफ मध्ये बॅचलर असाल किंवा तुम्ही भाड्याच्या घरामध्ये असाल, जास्त सामान घ्यायचं नसेल किंवा प्रवासात देखील तुम्हाला ही ट्रिक काम येईल.

तर आता बघा एखादी वस्तू आपण जर कॅरी बॅगमध्ये ठेवलेली असेल तर गाठ मारून याला आपण बंद करून ठेवतो जे की गाठ सोडायला बराच वेळ जातो आणि व्यवस्थित ते एखाद्या वेळेस बंद देखील होत नाही. काही किडा मुंगी जाण्याची देखील भीती असते. तर अशामुळे आपण इथे जर प्लास्टिक बॉटलचा असा उपयोग केला तर बघू शकता अगदी कंटेनर सारखं आपण या प्लास्टिक बॉटलला वापरू शकतो. अगदी आपल्या जुन्या प्लास्टिकच्या बॉटलचा उपयोग करून यामध्ये कोणतीही गोष्ट तुम्ही सहज ठेवू शकता, बाहेर काढू शकता. कुठेही ठेवलं तरी दिसायला चांगलं दिसेल आणि वापरायलाही सोप.

हे वाचा:   पावसाळ्यात कपडे वाळवण झालं सोपं, बघा कढईची कमाल.. महिलांनी हे काम नक्की करावं.!

यानंतर आपला जो प्लास्टिक बॉटलचा उपयोग आहे त्यासाठी एक प्लास्टिक बॉटल आपल्याला घ्यायची आहे. झाकण त्याच असावं आणि त्यावरती आपण एखाद्या टोकदार वस्तूने अशाप्रकारे छिद्र करणार आहोत. टोकदार वस्तूला गरम करून घ्या जेणेकरून झाकणावरती व्यवस्थित बारीक बारीक छान छिद्र पडतात. तुम्हाला पाहिजे तेवढे छोटे मोठे छिद्र तुम्ही इथे यावरती पाडू शकता.

आता आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपण विकत घेतो आणि त्यामुळे आपली काम सुरळीत होतात. पण घरातीलच जर काही जुन्या वस्तू वापरल्या तर नक्कीच यापासून आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करू शकतो. जस की तुम्ही आता बघू शकता मी एक स्प्रे बॉटल तयार केलेली आहे जुन्या प्लास्टिकच्या बॉटलचा उपयोग करून, जी की तुमच्या प्लांट्सला पाणी घालण्यासाठी वापरू शकता.

इतर कोणत्याही स्प्रे बॉटल सारखा तुम्ही याचा उपयोग करू शकता. भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला याचा सहज वापर करता येईल आणि हो यानंतर आपल्या जो प्लास्टिक बॉटलचा उपयोग आहे तो खूपच भन्नाट आणि किचनमध्ये सर्वात महत्त्वाचा ठरेल तर यासाठी आपल्याला या बॉटलचे काही झाकण घ्यायचे आहे चार झाकण इथे तुम्हाला लागतील आणि बऱ्याच वेळा काय होतं कढईत आपण काहीतरी ठेवतो, आणि काही हलवत असताना इकडे तिकडे आपली गॅसची शेगडी हलायला लागते ज्यामुळे काही अंगावर गरम पडण्याची भीती असते.

त्याच सोबत इकडे तिकडे सरकल्यामुळे कामही व्यवस्थित होत नाहीत. तर अशा वेळेस तुम्ही इथे वापरू शकता ही प्लास्टिकच्या बॉटलची झाकणं. ज्यामुळे आपली जी गॅसची शेगडी आहे ती इकडे तिकडे सरकणार नाही स्टेबल राहील. त्याच सोबत इथे जे पाय आहे त्याचे घान होतात चिकटपणा येतो ते देखील या झाकणामुळे होणार नाही. झाकण खराब झाल्यास फेकून दुसर वापरू शकता.

हे वाचा:   गव्हाच्या पिठात टाका ही एक वस्तू, तासाभराची काम होतील एकदम चुटकीसरशी.!

यानंतर बघा प्लास्टिक बॉटलचा मी हा वरचा भाग कट करून घेतलेला आहे. यापेक्षा तुम्ही मोठा किंवा छोट्या बॉटलचा देखील उपयोग करू शकता. यानंतर आपल्याला इथे लागणार आहे प्लास्टिकची एक लाकडी दांडी. तुमच्याकडे जर अशी प्लास्टिकची लाकडी दांडी नसेल तर तुम्ही पाईप जरी घेतला तरी चालेल किंवा वायपरच्या दांड्या असतात त्या जरी वापरल्या तरी चालतील. त्यानंतर आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे. जुना कपडा असा मधोमध या दांडी मध्ये आपल्याला लावायचा आहे. कपड्याचा देखील सेंटर शोधून अशा प्रकारे दांडीच्यावरती ठेवा. आणि हे जे प्लास्टिक बॉटलचा आपण भाग कट केलेला आहे तो अशापकारे यामध्ये आपल्याला व्यवस्थित दाबून बसवायचा आहे.

छोट्या किंवा मोठ्या प्लास्टिक बॉटलचा हा भाग वायपरच्या दांडीमध्ये अगदी व्यवस्थित फिट होतो आणि बघू शकता हे आपल एक टूल तयार झालेल आहे. जे की आपल्या घरातील दररोजच आपला अवघड किचकट काम सोपं करणार आहे. तर आता बघा पावसाळ्यामध्ये इकडे तिकडे ओलं होत राहत घान पाय येत राहतात. सारखं सारखं फरशी पुसायची म्हणलं तर एकतर आपलं काम वाढतं आणि बऱ्याच जणांना कसं वाकून फरशी पुसायला जमत नाही.

वयोमानाने म्हणा किंवा काही प्रेग्नन्सी असेल कंबरदुखीचा त्रास असेल, गुडघे दुखत असतील तर अशा वेळेस त्यांना अगदी उभ राहून फरशी पुसता येईल किंवा फरशीवरील इकडे तिकडे झालेली घान स्वच्छ करता येईल. दररोज फरशी पुसण्यासाठी देखील तुम्ही याचा उपयोग करू शकता. बाजारामध्ये जे परशी पुसण्यासाठी टूल मिळतात त्यापेक्षा हे कितीतरी चांगलं काम करतं. यामध्ये कपडा काढून आपण परत स्वच्छ करून यावरती लावू शकतो. तर मित्रांनो या होत्या काही सोप्या आणि उपयोगी अश्या टीप्स आणि ट्रिक्स ज्याचा वापर करून तुम्ही रोजची कामं अगदी सहज करू शकतात. जर लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका.