जग अशा अनेक आश्चर्यकारक प्राण्यांनी भरलेले आहे ज्यांच्याबद्दल कदाचित आपल्याला माहितीही नसेल पण ते अत्यंत प्रा’ण’घा’त’क ठरू शकतात. कारण काही असेही प्राणी असतात जे आकाराने लहान असतात परंतु याचा दंश हा खूप भयंकर असतो. आकाराने खूप लहान असूनही, हे कीटक कधीकधी जीवघेणे ठरू शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही किड्याबद्दल सांगणार आहोत.
बुलेट मुंगी: ही मुंगीची एक अद्वितीय प्रजाती आहे. या मुंगीचे नाव देखील अतिशय रोचक आहे, त्याचे नाव बुलेट मुंगी आहे जरी ती मुंगी असली तरी ही बुलेट मुंगी जगातील सर्वात वेदनादायक कीटकांपैकी एक आहे. या बुलेट मुंग्या मध्य आणि दक्षिण अमेरिकेच्या जंगलात आढळतात. आपल्याला प्रश्न पडेल की याला बुलेट मुंग्या असे नाव का दिले गेले आणि त्याचे खरे कारण काय आहे?
तर मित्रांनो याला बुलेट मुंग्या म्हणतात. कारण त्यांचे चावा बुलेटसारखा वेदनादायी असू शकतो. शास्त्रज्ञांनी या मुंगीवरही प्रयोग केले ज्यात त्यांनी स्वतःला या मुंग्यांपासून दंश करून घेतले आणि नंतर त्यांचा अनुभव सांगितला. ही मुंगी फारच वेदनादायक असल्याचे बोलले जाते. म्हणून या मुंगी ला बुलेट मुंगी म्हणतात.
अशाच प्रकारची आणखी एक कीड आहे ज्याला हॉर्नेट म्हणून ओळखले जाते. या किडीच्या दंश मध्ये वि’ष असते ज्यात न्यूरोटॉक्सिन असते. हॉर्नेट स्टिंगमुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, मधमाश्या पाळणारा कोनराड बेरुबे म्हणाला की त्याला नुकताच व्हँकुव्हर बेटावर या हॉर्नेट हल्ल्याचा सामना करावा लागला. त्याने सांगितले की हे कीटक फारच खतरनाक आहेत.
आता आम्ही ज्या किड्या विषयी सांगणार आहोत त्या किड्याचे नाव आहे, कि’सींग बग. अनेक लोकांना हा प्रश्न पडला असेल की हे कसले नाव आहे. परंतु मित्रांनो हा किडा साधारण किडा नाही हा किडा जिथे पण दंश करतो तिथे एक वेगळ्याच प्रकारचे मार्क सोडून जात असतो. या कीड्याच्या दंशामुळे शरीरामध्ये खूपच घातक क्रिया घडल्या जातात. यामुळे सर्दी खोकला ताप अशा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत असतो.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.