देवी महालक्ष्मी आपल्या घरी येताना देते हे संकेत!!जर असे संकेत आपल्यालाही मिळत असतील तर जागरूक व्हा..! याचा अर्थ तुम्हाला होणार आहे मोठी धन प्राप्ति…!

अध्यात्म

धनसंपत्तीची देवता असलेली माता महालक्ष्मी ज्या जातकांना वर प्रसन्न होते त्यावर धनाची बरसात होते. तसेच सुख संपत्ती व संपन्नता वाढते. आपला आर्थिक स्तर सुधारण्यासाठी व धनाचा संचय नियमित होण्यासाठी व घरांमध्ये सुख-समृद्धी नांदते यासाठी सर्व लोक महालक्ष्मीची नियमित उपासना करत असतात. कारण महालक्ष्मी माता खूपच कृपाळू आणि दयाळू आहेत.

त्यांचा आशीर्वाद ज्याला मिळेल त्या लोकांना कधीही आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही. ज्या घरात माता महालक्ष्मीचा वरदहस्त व आशीर्वादरुपी कृपाप्रसाद मिळत असतो त्या घरांमध्ये कधीही कोणतीही अडचण निर्माण होत नाही, तसेच त्या घरांमध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. सदैव सुख -शांती ,समृद्धी ने परिपूर्ण त्या घरांमध्ये लक्ष्मीमाता वास करत असते.

ज्या संकेतांद्वारे माता महालक्ष्मी आपल्या आगमणाची सूचना जातकांना देत असते ते संकेत योग्य वेळी समजून घेतले तर माता महालक्ष्मीला प्रसन्न करता येते व त्या व्यक्तीच्या कुटुंबावर पिढ्यान् पिढ्या माता महालक्ष्मी वरदहस्त देत असते. मात्र ज्या लोकांच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार असते. त्यावेळी माता महालक्ष्मी तिच्या आगमनाचे संकेत त्या व्यक्तींना देत असते.

हे वाचा:   अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी कधी पाऊलही ठेवत नाही; असे लोक नेहमी राहतात भिकारी.!

हे संकेत जर त्या व्यक्तीला वेळीच समजले तर माता लक्ष्मीचे चांगल्याप्रकारे स्वागत होते व अशा घरांमध्ये माता लक्ष्मी अनंत काळ टिकून राहते. आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला माता महालक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होण्याच्या संकेतांबद्दल माहिती देणार आहोत.

घराच्या जवळपास घुबड दिसणे- माता महालक्ष्मीचे वाहन ‘घुबड’ अाहे. जर एखाद्या व्यक्तीच्या जवळपास पुन्हा-पुन्हा घुबड दिसत आहे किंवा आपल्या घराच्या जवळपास आपल्याला कायम घुबडाचे दर्शन होत आहे, तर समजून घ्या की लवकरच महालक्ष्मीची आपल्या घरावर कृपा होणार आहे व ‍आपल्या घरी माता लक्ष्मीचे आगमण होणार आहे.

अशावेळी आपल्याला सत्कार्य करायला हवे, ज्यामुळे माता महालक्ष्मी प्रसन्नतापूर्वक आपल्या घरांमध्ये आगमण करेल. आपल्या आजूबाजूला हिरवळ दिसणे- महालक्ष्मी मातेला हिरवा रंग अतिशय प्रिय आहे. तसेच माता लक्ष्मीला झाडे, झुडपे व गवत असे हिरवळ प्रिय असते. त्यामुळे जर आपल्याला आपल्या आजूबाजूला अचानक गवत वाढताना दिसत असेल किंवा हिरवळ सगळीकडे दृष्टीस पडत असेल तर हे महालक्ष्मी आपल्या घरात येण्याचे संकेत असतात.

हे वाचा:   असा अंगठा असणारे लोक असतात खूपच चतुर; कधीच कोणत्याही गोष्टीत मागे पडत नाही.!

अशावेळी या संकेतांचा अर्थ समजून कधीही चुकीचे काम करू नका की ज्यामुळे लक्ष्मी माता येण्याअगोदरच आपल्यावर अप्रसन्न होऊन पाठ फिरवून जाऊ नये. तर हे होते काही संकेत जे महालक्ष्मीदेवीचे आपल्या घरी आगमण होण्यापुर्वी महालक्ष्मी माता आपल्याला देत असतात. जर आपल्याला ही असेच संकेत होत असतील, तर आपण जागृत होऊन या संकेतांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे.

आपल्या वर्तनामध्ये काही चुकीचे होत नाही आहे याची काळजी घेतली पाहिजे त्यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल व आपल्या घरात चिरंतन काळ वास करेल!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *