सर्दी झाल्यानंतर पटकन घ्या, दवाखान्यात जाण्याअगोदर हे एक काम नक्की करून बघा, रात्रीतून सर्दी खोकला बरा झालेला दिसेल…!

आरोग्य

सध्या को रो ना वायरस देशभरामध्ये धुमाकूळ घालत आहे. अतिशय भयंकर हा आजार वेगाने पसरत चालला आहे. अनेकदा याच्या रूग्णांना सर्दी खोकला अशा प्रकारचा त्रास देखील जाणवू लागत असतो. अशावेळी आपलं डॉक्टरांकडे जाणे खूप गरजेचे आहे. खूपच भयंकर सर्दी ताप खोकला असेल तर डॉक्टरांकडे जाणे योग्य ठरेल कारण अंगावर दुखणे काढल्यास आणखी दुखणे वाढत असते.

परंतु नॉर्मल सर्दी खोकला असेल तर अशावेळी काही सोपे घरगुती उपाय केले जाऊ शकतात. हे उपाय केल्याने सर्दी खोकला यावर नक्कीच चांगल्या प्रकारे आराम मिळेल. हे उपाय तुम्ही अगदी घरगुती साधनांद्वारे करू शकता. या उपायामुळे सर्दी व खोकला या दोन्ही समस्या बऱ्या होतील. याबरोबरच घशा संबंधीच्या देखील समस्या असतील तर त्या देखील नाहीशा होतील.

हे वाचा:   ज्या लोकांच्या अंगणात या वनस्पती त्या लोकांना दवाखान्याची जास्त गरज भासत नाही, डॉक्टरही हैराण आहेत.!

ज्या लोकांना नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून सर्दी-खोकला व थोडीशी ताप यांसारख्या समस्या उद्भवत असतात अशा लोकांनी रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी दुधात थोडीशी हळद टाकून प्यायला हवे. म्हणजेच हळदीचे दूध सेवन करायला हवे. अशाप्रकारे हळदीचे दुधाचे सेवन केल्यामुळे सर्दी खोकला याचा त्रास नष्ट होत असतो व हे दूध आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.

जर तुम्हाला सर्दी खोकला याचा त्रास जाणवत असेल यामुळे तुम्ही खूपच भयंकर असे त्रासलेला असाल तर, अशावेळी लसणाचा हा एक छोटासा उपाय तुम्ही घरगुती पद्धतीने करू शकता. सर्वप्रथम थोडासा लसुन घेऊन तो तव्यावरती चांगल्या प्रकारे भाजून घ्यावा व याचे सेवन करावे. असे केल्यामुळे सर्दी-खोकला रात्रीतून गायब झालेला तुम्हाला दिसेल. या उपायामुळे Immunity सिस्टिम देखील मजबूत झालेली तुम्हाला दिसेल.

हे वाचा:   हे फुल पृथ्वीवरील अमृतच आहे, फक्त अशाप्रकारे करावा लागेल याचा उपाय.!

सर्दी खूपच सतावत असेल नेहमी नाकातून पाणी येत असेल तर अशावेळी रात्री झोपण्यापूर्वी दोन ते तीन काळीमिरी तोंडात टाकून चावावी. यामुळे सर्दी मुळे खोकला झाला असेल तर तो बरा होत असतो. तसेच छातीमध्ये असलेला कफ देखील यामुळे नाहीसा होत असतो. या सोबत तुम्ही तुळशीचे दोन पाने देखील खाऊ शकता यामुळेदेखील सर्दी नक्की राहील.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *