तसे तर आपल्याला आरोग्य संबंधीच्या अनेक समस्या उद्भवलेल्या दिसत असतात परंतु जर कधी ताप येणे ही समस्या निर्माण झाली तर संपूर्ण शरीर हे थकून जात असते. याचा प्रभाव केवळ आपल्या शरीरावरच नाही तर मनावर देखील होत असतो. ज्यामुळे आपले वजन देखील भरपूर कमी होऊ लागते व दुसरे देखील आजार होण्याची शक्यता असते.
अशातच जर तुम्हाला खूपच जास्त प्रमाणात तापेचा त्रास होऊ लागला तर अशावेळी काही घरगुती उपाय करून बघायला हवेत. हे काही घरगुती उपाय जर तुम्ही करून बघितले तर यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्य मध्ये बदल झालेला दिसेल. हळूहळू ताप कमी होईल व पुन्हा शरीर आरोग्यदायी होत जाईल. चला तर मग पाहूया कोणते आहे हे उपाय.
पेय पदार्थाचे सेवन करावे: शरीरामध्ये ताप खूप वाढू लागली, शरीराचे तापमान हे जास्त वाढू लागले तर अशा वेळी शरीरातून घाम येऊ शकतो. यामुळे आपल्या शरीरामध्ये डीहायड्रेशन होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अशावेळी तुम्ही स्वतःची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. शरीराला शक्य तितके हायड्रेट ठेवावे.
प्रत्येकाने दररोज नऊ ते दहा ग्लास पाणी पिणे खूप गरजेचे असते. अशा वेळी शरीरामध्ये पाण्याची कमतरता कधीही भासू देऊ नये. यासाठी तुम्ही आरोग्यदायी ज्यूस, नारळाचे पाणी, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे सूप देखील पिऊ शकता. लसुन हे आयुर्वेदातील एक अतिशय उपयुक्त असे हे औषध मानले गेले आहे.
लसणामध्ये अँटी व्हायरस व अँटी फंगल गुणधर्म असतात. यामुळे तपे मुळे होणारे संक्रमण नष्ट होत असतो. अनेक बॅक्टरिया मुळे आपल्याला ताप येण्याची शक्यता असते. अशा वेळी लसणाच्या सेवनाने या सर्व समस्या नष्ट होत असतात. ताप आल्यावर लसुन चे सेवन देखील अतिशय उपयुक्त मानले गेले आहे.
अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्यावर तुळशीच्या पानांचा रस हा अतिशय उपयुक्त मानला जातो. पण सकाळच्या वेळी जो चहा पितो त्यामध्ये एक ते दोन पाने तुळशीचे टाकावे. ज्यामुळे शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होत असते. तसे शरीरात कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन असेल तर ते देखील नष्ट होत असते.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.