आवळ्याच्या साह्याने घरीच बनवा तेल, डोक्याला लावल्याने केसांना मिळत असतात इतके अद्भूत फायदे.!

आरोग्य

केस गळती होणे, अकाळी केस पांढरे होणे, केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात कोंडा निर्माण होणे. यांसारख्या समस्या ह्या जवळपास अनेक लोकांना उद्भवलेल्या दिसत असतात. अशावेळी आपण यावर वेगवेगळ्या उपाययोजना करून बघत असतो. केस पांढरे होणे ही समस्या असल्यावर तर आपण डॉक्टरांकडे देखील जात असतो. तसेच अनेक लोक यासाठी बाजारामध्ये उपलब्ध असलेले केमिकलयुक्त पदार्थ केसांना लागत असतात.

हा काळपट असलेला रंग केसांना लावल्यास केस काळे होतात परंतु अगदी काही दिवसांकरिता त्यानंतर पुन्हा केस पांढरे होऊ लागतात. तसेच या केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केल्यामुळे केसांची बरीचशी हानी देखील होत असते. केसांसाठी आवळा तेल अतिशय उपयुक्त मानले जाते. आवळ्याचे सेवन करणे देखील केसांसाठी खूपच चांगले मानले गेले आहे.

केसांना आवळा तेल लावण्यासाठी आपण अनेकदा बाजारात जात असतो. परंतु त्याची आता काहीही गरज राहिलेली नाही. यासाठी तुम्ही घरगुती पद्धतीने बनवलेले आवळ्याचे तेल देखील वापरू शकता. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला घरगुती पद्धतीने कशा प्रकारे आवळ्याचे तेल बनवायला हवे व यामुळे केसांना कशा प्रकारे फायदा होतो हे सविस्तरपणे सांगणार आहोत.

हे वाचा:   चेहर्‍यावरचा मळ झटपट निघेल, चेहरा होईल गोरापान, एकही फोड शिल्लक राहणार नाही, हे काही उपाय ठरेल फायद्याचे.!

आवळा हे एक प्रकारची वनस्पती आहे. यामध्ये विटामिन सी, कॅल्शियम, फॉस्फरस, आयरन, कॅरोटीन आणि विटामिन बी असते तसेच यामध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट सारखे भरपूर तत्व असतात. आवळा ही एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचे आपल्या केसांसाठी फायदे सांगितले जातात. तर या वनस्पती द्वारे आपण घरच्या घरी आवळा तेल बनवण्यासाठी आपल्याला काही आवळ्याची आवश्यकता भासेल.

सर्वप्रथम हे सर्व आवळे पाण्यामध्ये स्वच्छ धुऊन काढावेत. त्यानंतर या आवळ्या मध्ये असलेल्या बिया बाहेर काढून टाकाव्यात. हे आवळे त्यानंतर मिक्‍सरच्या साह्याने बारीक करून घ्यावे लक्षात ठेवा यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करताना पाणी टाकू नये. म्हणजे एका प्रकारे सांगायचे झाले तर या ठिकाणी आपल्याला आवळ्याचा ज्यूस बनवायचा आहे.

हे वाचा:   ही लहानशी चूक जीवावर बेतू शकते.! दुर्लक्ष कराल तर होईल खूप मोठे नुकसान.! किडनी कायमची होईल निकामी.!

त्यानंतर एका फ्राईंग पॅन मध्ये हा ज्यूस टाकावा व त्यामध्ये खोबरेल तेल टाकून याला चांगल्या प्रकारे उकळू द्यावे. हे चांगल्याप्रकारे उकळल्या नंतर याला काहीवेळा कधीचा थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. थंड झाल्यानंतर एखाद्या गाळणी च्या साह्याने हे गाळून घ्यावे. तुमच्यासाठी घरगुती पद्धतीने बनवलेले आवळ्याचे तेल तयार आहे. हे केसांना लावावे यामुळे केसांसंबंधीच्या सर्व समस्या दूर होतात.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *