आजकाल विविध आजारांशी लढण्यासाठी आपल्याला आपली इम्युनिटी मजबूत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यालाच आपण रोगप्रतिकारक्षमता असे देखील म्हणत असतो. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता मजबूत असते असा व्यक्ती कुठल्याही आजाराशी लढाई करू शकतो. आज-काल विविध प्रकारचे महाभयंकर असे रोग निर्माण होत आहेत अशा रोगांशी लढण्यासाठी देखील इम्युनिटी मजबूत असण्याची गरज आहे.
एवढेच नाही तर जरी ऋतू बदलला किंवा पाण्यामध्ये बदल आला तरी लोकांची इम्युनिटी मजबूत नसते अशा लोकांना लगेच दुखणे येऊ लागते. असे लोक लगेच आजारी पडत असतात. म्हणजे सांगायचे झाले तर ज्या लोकांची रोगप्रतिकारक्षमता मजबूत नसते त्या लोकांना विविध प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत असतात. त्यामुळे आपण आपली इम्युनिटी मजबूत ठेवणे खूपच गरजेचे आहे.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक अत्यंत सोपा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत झालेली दिसेल. कोणत्याही प्रकारचे आजार तुम्हाला होणार नाही. कुठल्याही प्रकारचा व्हा’यरस तुम्हाला शिवणार देखील नाही. तुम्हाला फक्त हा एक सोपा असा उपाय करायचा आहे. चला तर मग पाहूया कोणता आहे हा उपाय.
तुम्हाला हा उपाय करण्यासाठी दोन ते तीन चमचे बडीशेप लागणार आहे. सर्वप्रथम एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे बडीशेप काढून घ्यावी. याच्या सेवनामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होत असते, आपली डायजेशन सिस्टीम देखील यामुळे मजबूत होत असते. आपल्याला या उपायासाठी आणखी एक पदार्थ लागेल तो म्हणजे दालचिनी आपल्याला थोडीशी दालचिनी घ्यायची आहे.
दालचिनी मध्ये देखील अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. आणखी एक पदार्थ लागेल तो म्हणजे लवंग. लवंग यामध्ये देखील अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात. आपल्याला यासाठी पाच ते सहा लवंग घ्यायची आहेत. त्यानंतर आणखी एक पदार्थ लागेल तो म्हणजे विलायची आपल्याला चार ते पाच विलायची ची आवश्यकता भासेल.
हे सर्व पदार्थ एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आहेत व यामध्ये आपल्याला अजून काही पदार्थ टाकायचे आहेत. यामध्ये अर्धा जायफळ टाकावा, पंधरा ते वीस दाणे काळीमिरी टाकावी. यामध्ये एक चमचा सुंठ पावडर देखील टाकावी. या सर्व पदार्थांना एका खलबत्त्यामध्ये टाकून याला चांगल्या प्रकारे कुटून घ्यावे. याची बारीक पूड बनवावी.
आता याचे सेवन कसे करावे? तर एका पातेल्यामध्ये दोन कप पाणी टाकावे. पाणी चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यावे. यामध्ये बनवलेली ही पावडर टाकावी साधारणता एक चमचा, थोडीशी चहा पावडर टाकावी व आपल्याला हवी तेवढी साखर टाकावी. त्यानंतर यामध्ये एक कप दूध टाकावे. बनवलेला हा चहा गरम गरम प्यावा. असे केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच वाढेल.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.