मित्रांनो, या पृथ्वीवर परमात्म्याने अनेक औषधी वनस्पतींचे निर्माण केले आहे. सगळ्याच वनस्पती आपल्या आकार आणि गुणांनी बिलकूल वेगवेगळे असतात. आज आम्ही तुम्हाला एक अशा अदभूत वनस्पती सोबत परिचय करून देणार आहोत, जी आपल्या घराची शोभा वाढवते. मी पाहिला असेल बरेच लोक आपल्या घराची शोभा वाढवण्यासाठी नागफणी लावतात. याला prickly pear असेही म्हणतात. निवडुंगाच्या जातीतला एक प्रकार होय. याला खूप काटे असतात.
नागफणी चा उपयोग औषधातही केला जातो हे आपल्याला माहित नसेल. पूर्वीच्या काळी नागफणीच्या काट्यानेच कान टोचले जाई. यांच्या काट्यांमध्ये अँटीसेपटिक गुणधर्म असतात. यामुळे कानाला त्रास होत नाही. नागफणी चे रोप पाच ते सात फूट उंच आणि सरळ वाढते. ज्याच्या अनेक फांद्या असतात. त्यावर सर्वत्र काटेच काटे असतात. याचे पान हाताचा पंजा प्रमाणेच असतात. तसेच ते मांसल आणि काटेदार असतात.
जास्त करून ही रोपे कोरडी जमीन कमी असलेल्या जागी असलेल्या आपल्याला दिसून येतात. नागफणीच्या चवी बद्दल बोलायचं झाल्यास चवीला कडू आणि पचल्यावर मधूर असतात. नागफणी ही उष्ण/गरम प्रकृतीची वनस्पती आहे. पित्तनाशक ही आहे. रक्त शुद्ध करते. सोबतच दुखणं आणि जळणे यावर आराम देते. वनस्पतीचे फुल ही अत्यंत उपयुक्त आहे.
तुम्हाला खूप जास्त खोकला येत असेल तर याच्या फुलांचा प्रयोग तुम्ही नक्की केला पाहिजे. डांग्या खोकला झाला असता याच्या फुलांना हलके सर भाजून खाल्ल्याने आराम मिळतो. श्वास फुलणे किंवा खोकला येणे अशा समस्यांनी तुम्ही ग्रस्त असाल तर नागफणीच्या फुलांचे पाकळ्या एक ते दोन ग्रॅम सेवन केल्याने खोकला श्वास फुलने या समस्या ठीक होतात.
जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल, फक्त कमतरतेमुळे शरीराचा रंग पिवळा दिसत असेल, कमजोरी आली असेल तर नागफणीच्या पिकलेल्या फळांचा प्रयोग केल्याने सर्व समस्यांचे निवारण होते. ज्यांना चर्मरोग, डाग, खाज, खुजली नायटा यांची समस्या आहे यात नागफणी खूप जास्त लाभदायक आहे. नागफनी मध्ये एन्टीसेप्टीक गुण असतात. जखम भरून येण्यासाठी सुद्धा या वनस्पतीची मदत होते.
नागफनीच्या पानांचा रस काढून जखमेवर लावल्याने जखम लवकर भरून निघते. सोबतच त्वचेवर लावल्याने वर दिलेल्या त्वचे संबंधित सर्व विकारांचे चुटकीसरशी निवारण होते. डोळ्यांची जळजळ होत असता या वनस्पतीचे मुळं वाटून डोळ्याच्या चारही दिशेने लावल्यास आराम मिळतो.(डोळ्याच्या आत याचा प्रयोग करू नये.)
पोट साफ करण्याचा अद्भुत गुण या वनस्पतीत आहे. याच्या फळाचे 1-2ग्रॅम चूर्ण सेवन केल्याने पोटाच्या तक्रारी दूर होतात. माहिती आवडल्यास मित्रांसोबत शेयर करा आणि सर्व स्वस्थ रहा.. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.