गायीचे दूध की म्हशीचे दूध, कोणते दूध पिणे असते योग्य, या प्राण्याचे दूध शरीरासाठी ठरू शकते घातक.!

आरोग्य

मित्रांनो, दूध मनुष्याच्या जीवनात महत्त्वपूर्ण आहार मानलं जाते. जन्मल्या जन्मल्या सगळ्यात आधी जे आपल्या शरीरात भोजनाच्या रूपात जाते ते म्हणजे दूध! दूध एक प्राण्यापासून बनलेले उत्पादन आहे. आपल्याला जिवंत प्राण्यापासून मिळते. जिवंत प्राण्यांपासून मिळणाऱ्या प्रत्येक गोष्टीत हार्मोन्स, अमायनो ऍसिड, एंझायम्स चे प्रमाण जास्त असते. त्यामुळे यांना योग्य वस्तू सोबत योग्य वेळी खाणं अत्यंत महत्त्वाचे असते.

जेवणात फरमेंटेड वस्तू आणि पशुपासून मिळणारे उत्पादन ची रासायनिक रियाकशन करण्याची क्षमता खूप जास्त असते. दूध स्वतः च एक संपूर्ण आहार आहे. आणि दुधात खूप अशी पोषक तत्व आहेत जी केवळ दुधामुळे माणसाला मिळतात. जे लोकं रोज दूध पीत नाहीत त्यांना चाळीशी नंतर खूप प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. वाढत्या वयाच्या लोकांना दूध पिलेच पाहिजे.

दुधाचा शरीरावर योग्य प्रकारे फायदा होण्यासाठी दूध पिण्याचे नियम माहित पाहिजेत. खूप लोकांना दूध पिऊन सुद्धा शरीरावर पूर्ण फरक पडत नाही. बऱ्याच जणांना दूध योग्य प्रकारे पचतच नाही. अशा खूप गोष्टी आहेत ज्यांचे सेवन दूध पिण्याच्या आधी किंवा नंतर केलं गेलं असता होणाऱ्या रासायनिक रिॲक्शन शरीराला खूप हानिकारक असते. असे कित्येक आजार आहेत त्याचं कारण दूध चुकीच्या वेळी चुकीच्या वस्तुंसोबत सेवन केले जाते.

पोट, पचन, लघवी, त्वचा यांचे सगळ्यात जास्त रोग दूध चुकीच्या पद्धतीने सेवन केल्याने होते. जसे दूध पिणे शरीराला गरजेचे आहे तसेच हे नियम तुम्हाला माहित असणे अत्यंत जरुरी आहे. योग्य पद्धतीने सेवन केलेले दूध व्यक्तीला दीर्घायुषी आणि ताकतवर बनवते. आज बघणार आहोत दुधाचा जास्त फायदा होण्यासाठी कोणत्या वेळी आणि कसे दुध पिले पाहिजे?

हे वाचा:   फक्त दात घासायलाच नाही तर कोलगेटचा असाही वापर केला जाऊ शकतो.! अनेकांना नाही माहिती, मुलींनी नक्की वाचावे.!

आणि कोणत्या वस्तू चे सेवन दुधा सोबत केले नाही पाहिजे? वेगवेगळ्या आजारात दुधाला औषध रूपात कसं वापरतात? दूध पचत नसेल तर त्यासाठी काय करावे? जेवण केल्यानंतर दूध पिऊ नये. दूध स्वतःच संपूर्ण आहार आहे. म्हणून जेवणानंतर लगेच दूध पिणे म्हणजे परत जेवण करण्यासारखे आहे. दूध पचायला खूप वेळ लागतो. जेवल्यानंतर दूध पिल्याने शरीर जड होते.

पोट खूप भरते आणि अन्न पचन प्रकिया मंदावते. जेवण आणि दूध पिणे याच्या दरम्यान कमीत कमी 2 तास अंतर ठेवा. दूध पिल्यानंतर किंवा आधी आंबट फळ किंवा नमकिन याचं सेवन कधीच करू नका. याचं आपआपसात मेळ नसतो. जर असं केल तर पोटात रासायनिक रियाकशन होऊन पोट बिघडू शकते. गॅस, ऍसिडिटी, अन्न अपचन, पोट फुगणे, पोट दुखी असल्या समस्या उद्भवतात.

कांदा आणि वांगे. दुधातील केमिकल कंपाऊंड कांदा आणि वांग्याच्या विरुद्ध असतात. तुम्ही कांदा आणि वांग्याचे सेवन केले असेल तर कमीत कमी दोन तासानेच दुधाचे सेवन करावे. जर असं केल नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे त्वचेचे रोग उद्भवतात. असं मानलं जाते मासे खाल्यानंतर दूध पिले तर त्वचेवर पांढरे डाग, कोड येणे असे आजार होतात.

असं शास्त्रज्ञानी प्रूफ तर केल नाही पण मासे किंवा मांसाहार केल्यावर करण्याआधी दुधाचे सेवन करणे चुकीचा निर्णय आहे. दोन्ही पचायला जड असून दोघात प्रोटीन्स खूप असते. पचनासंबंधी अनेक रोग होतात. दुधात दही मिसळले असता केमिकल रियाकशन होऊन दुध पण दह्यात बदलते. जर तुम्ही दूध दही एकत्र सेवन केले तर ही प्रक्रिया पोटात सुरु होईल. ज्यामुळे पचनात गडबड होते.

हे वाचा:   माशाचे डोके खाल्ल्याने शरीरात नेमके काय झाले.? माश्यांचे डोके शरीरात गेल्यास शरीरात होतात असे काही बदल.!

आयुर्वेदानुसार दूध पिण्याची योग्य वेळ रात्रीची आहे. दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो ऍसिड असते. जे डोकं आणि शरीर शांत करून चांगली झोप लागण्यात मदत करते. ते लोक रात्री दूध पितात त्यांचं सकाळी पोट नीट साफ होते. सकाळी दूध पिल्याने दुधात असलेले सर्व पोषक तत्व आपल्या शरीराला मिळत नाहीत. रात्रीचे जेवण कमी घ्या आणि दोन तासांनी झोपताना दूध प्या.

तुमचे वजन सामान्य किंवा जास्त असेल तर तुम्ही गाईचे दूध प्या. वजन वाढवायचे असल्यास म्हशीचे दूध प्या. परंतु गाईचे दुध म्हशीच्या दुधापेक्षा कितीतरी पटीने जास्त गुणकारी असते. याचा परिणाम आपल्या मेंदू, त्वचा, हाडं, केसं यांच्यावर तेजीने दिसतो. म्हशीच्या दुधाने कफ वाढतो. तुम्हाला जर गीर गायीचे A2 दूध मिळाले तर ते अमृत च! दूध कधीच गार पिऊ नये.

असं केल तर ते पचन मंदावते. पोटात गॅस होतो. कोमट किंवा सामान्य तापमान असलेलं दूधच प्यावे. दूध गोड करण्यासाठी मध, मिश्री (खडीसाखर ), खांड याचा वापर करा. साखरेपासून गोड केलेलं दूध अजिबात लाभदायक नसते. साखर दुधातील सर्व पोषक तत्व नष्ट करते. फक्त लहान बाळानेच नाही तर सगळ्या वयोगटातील व्यक्तींनी वर सांगितल्याप्रमाणे दुधाचे अवश्य सेवन केले पाहिजे.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *