जन्मत: आपले केसं काळी असतात ती वयोमानाने पांढरी होऊन केसात डोकवू लागतात. हा प्रवास आपण सगळेच अनुभवतो. पण आज आम्ही तुम्हाला परतीचा प्रवासाबद्दल म्हणजे पांढरे ते काळे केसं याबद्दल सांगणार आहोत. अनुवांशिकता यामुळे काही जणांचे केसं जन्मत: किंवा अगदी कमी वयात पिकू लागतात. केसं सफेद होण्याची असंख्य कारण आहेत.
आपल्या बाबतीतलं मूळ कारण शोधून त्याच्या मुळाशी उपाय केला पाहिजे. परंतु आधीच पांढरे झालेले केसांचा परतीचा प्रवास कसा करायचा याचा उपाय तुम्हाला आज आम्ही शेयर करू. आजकाल कमी वयात डोक्यात पांढरे केसं चमकत असलेली दिसतात. ही एक गंभीर बाब आहे.
आपल्या दैनंदिन आहारात, जीवनशैलीत, व्यायाम आणि खाणे-पिणे, झोपणे यांसारख्या सवयी व पद्धतीत काही बदल केल्याने हे दीर्घकाळासाठी फरक सहज शक्य आहेत. परंतु आधीच पांढऱ्या झालेल्या केसांच करायच काय? नवीननवीन बऱ्याच लोकांना पांढरे केसं उपटण्याची सवय असते. असं चुकुनसुद्धा मुळीच करू नये. यामुळे सफेद केसं मुळापासून अजून जास्त प्रमाण वाढतात.
यासाठी पुढीलप्रमाणे खात्रीशीर उपाय तुम्ही नक्की ट्राय करा. आजवर आम्ही तुम्हाला केसांच्या अनेक तक्रारीवर पुष्कळ घरगुती उपाय सुचवले आहेत. तुम्ही ते करून ही बघितले असतील. त्याचा तुम्हाला फायदा ही झाला असेल. यासोबतच मित्रांनो केसांची निगा कशी राखायची याबद्दल देखील आम्ही तुम्हास वेळोवेळी टिप्स देतच असतो.
केसं गळणे, रुक्ष होणे, चाई पडणे, कोंडा होणे, फाटे फुटणे, निस्तेज होणे असे अनेक समस्या असतात. त्यामागची अनेक कारण ही आम्ही तुम्हाला यापूर्वी देखील सांगितली आहेत. परंतु आज आपण प्रामुख्याने फक्त पांढरे केसं नैसर्गिक पद्धतीने काळे कसे करायचे ते बघणार आहोत. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा लालसर टोमॅटो. हा टोमॅटो किसणीने किसून घ्यावा.
हा टोमॅटो रस गाळणीने गाळून घ्यावा. साधारण हा एक वाटी असावा. यामध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑइल घालावे. एक चमचा नेस कॉफी पावडर यात मिसळून मिश्रण चमच्याने नीट एकजीव करा. तुमचे केसं ज्या प्रमाणात लांब असतील त्या प्रमाणे या उपायातील घटकांचे प्रमाण वाढवा. हे मिश्रण कापसाच्या मदतीने केसांच्या मुळाशी आणि पांढऱ्या केसांवर लावा. एक तास असेच राहू द्या.
त्यानंतर साध्या कोमटपाण्याने केसं स्वच्छ धुवा. अधिक चांगल्या फरकासाठी तुम्ही हा प्रयोग आठवड्यातून 1-2 वेळेस करावा. हा प्रयोग सतत केल्याने नैसर्गिक प्रकारे तुमचे केसं काळी दिसतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.