नमस्कार मंडळी, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सुकामेवा माहित आहेत. सर्व ड्रायफ्रूट चा राजा म्हणजे अक्रोड देखील सर्वांना परिचित असेलच. लिंबाएवढा आकाराचे गोलाकार, वरून टणक आणि आतून मेंदू सारखे दिसणारा ड्रायफ्रूट म्हणजे अक्रोड. मेंदू सारख्या दिसण्या मुळेच की काय याला ब्रेन फूड असेही म्हटले जाते. आजवर आपणही अक्रोड चा उपयोग चॉकलेट, कुकीज, लाडू, मिल्क शेक इत्यादीं पदार्थांमध्ये केला असेल.
नुकत्याच एका नवीन संशोधनानुसार अक्रोड खाण्याने ताणतणाव देखील कमी होत असल्याचे सिद्ध झाले आहे. चिंताग्रस्त जीवनशैली, ताण-तणाव तसेच हृदयविकार, मधुमेह आणि लठ्ठपणावरही अक्रोड अत्यंत लाभदायक आहे. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन इ, अल्फा लिनोलेनिक अॅसिड, पॉलिफेनॉल्स असे उपयुक्त घटक असतात जे आपला ताण कमी करण्यासाठी आपली मदत करतात.
हाडं मजबूत करण्यासोबतच नियमित अक्रोडच्या सेवनाने दातांचे ही आरोग्य राखले जाते. अक्रोड मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करून पचनक्रिया सुधारण्यास अक्रोड मदत करतात. ज्यामुळे आपले पोट साफ राहून वजन कमी होण्यास मदत होते. यासाठी दररोज दोन ते तीन अक्रोडचे सेवन तुम्ही नियमित करा.
फक्त एवढेच नाही तर अक्रोड मुळे तुमची त्वचा आणि केस यांच्यात कमालीची सुधारणा दिसून येते, कारण अक्रोड मध्ये प्रोटीन्स आणि विटामिन ई भरपूर प्रमाणात असते. गर्भवती महिलांसाठी अक्रोड चे सेवन सगळ्यात फायदेशीर ठरते. नियमित अक्रोडच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर रोजच्या आहारात अक्रोडचा समावेश अवश्य करावा.
या शिवाय अक्रोड मुळे लिव्हर, पिंपल्स, थायरॉइड, सांधेदुखी यांसारख्या समस्यातून मुक्ती मिळते. बदामा प्रमाणेच रात्री अक्रोड पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ल्याने याचे गुण दुपटीने वाढतात. विभिन्न प्रकारची जीवनसत्वे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, omega-3 इत्यादींचा खजाना म्हणजे अक्रोड! रिकाम्या पोटी भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने अनेक आजारांपासून तुम्ही राहाल दूर.
तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असल्यास अक्रोड खा च! कारण अक्रोड मध्ये मेलाटोनिन नावाचा घटक असतो ज्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते. तीन भिजवलेले अक्रोड चे सेवन तुम्ही एक ग्लास दुधासोबत केल्याने अनेक अधिक फायदे होतील. नियमित भिजवलेले अक्रोड चे सेवन केल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुधारते तसेच यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
पुरुषांतील शु’क्राणू देखील अक्रोड ने वाढतात. अक्रोड केवळ मेंदू सारखे दिसतच नाहीत तर यामुळे आपल्या मेंदूला कमालीचा फायदा होतो. स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते. रोगप्रतिकारक क्षमता वाढते. अनेक सौंदर्यप्रसाधनांमध्ये देखील अक्रोडची टरखलचा वापर केला जातो. तब्येतीने कृश असलेल्या व्यक्तींनी देखील आहारात दररोज अक्रोड सेवन केले पाहिजे.
अशा या बहुगुणी अक्रोड बद्दल माहिती वाचून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत झाला असाल..तेव्हा आजच तुमच्या आहारामध्ये दररोज अक्रोड चा समावेश करा आणि ही फायदेशीर माहिती आपल्या मित्रांसोबत शेअर करा..!
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.