केसगळती होण्याचे नेमके कारण जाणून घ्या.! ह्या कारणामुळे दररोज गळतात केस.! स्त्रियांनी नक्की वाचा.!

आरोग्य

पहिल्यांदा हे जाणून घेऊ यात की दिवसभरातून किती केस गळलेले नॉर्मल असते तर दिवसभरात शंभर केस गळणे हे पूर्णपणे शास्त्रीयदृष्ट्या नॉर्मल आहे. आपल्याला साधारण स्त्री व पुरुष या दोघांमध्ये केस गळती दिसून येते पण पुरुषांचे केस छोटे असतात व स्त्रियांचे मोठे असतात त्यामुळे एक सारखे केस गळले तरीपण स्त्रियांचे जास्त केस दिसून येतात कारण ते मोठे असतात त्यामुळे केस गळणे ही स्त्रियांमध्ये जास्त भीतीदायक वातावरण ठरू शकते.

स्त्री व पुरुषांमध्ये केस गळतीचे कारणे वेगवेगळी असू शकतात कारण पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉन नावाचे हार्मोन केस गळती ला कारणीभूत असतात तर स्त्रियांमध्ये हे टेस्टोस्टेरोन हार्मोन्स नसतात किंवा खूप कमी असतात त्यामुळे त्यांची कारणे आणि उपाय वेगवेगळे असतात. स्त्रियांमध्ये केस गळण्याची कारणे- १. स्त्रिया जिथून मध्ये भांग पाडतात, त्या भागातून केस विरळ विरळ होत जातात.

२. Alopecia areata-म्हणजेच केसांमध्ये चाई पडणे. यामध्ये केस गळून त्या जागी पॅचेस दिसतात. या पॅचेस वर पुन्हा केस उगवणे शक्य आहे पण हे पॅचेस काही वेळेला alopecia totalis / alopecia univarsalis मध्ये बदल घेतात म्हणजे डोक्यावर चे पूर्ण केस गळून जातात. हे होण्याचे कारण म्हणजे शरीरातले विविध आजार असू शकतात जसे की थायरॉईड.

३. Chronic telogen effluvium- हा एक अतिशय महत्त्वाचा कारण आहे. आपल्याला जेव्हा कोणताही आजार होतो मग तो कोणताही असू देत फिजिकल किंवा मेंटल त्या आजाराच्या तीन महिन्यानंतर आपल्याला खूप केस गळती जाणवू लागते, असे का होते ते आधी समजून घेऊ (हे समजून घेण्याआधी आपण आपल्या केसांची सायकल समजून घेऊयात, केस हे अचानक सगळे एकदम वाढत नसतात ते तीन स्टेजमध्ये वाढत असतात आणि प्रत्येक केसाची स्टेज ही वेगळी असते.

हे वाचा:   वर्षानवर्षं साचलेला घाशातला कफ चटकित बाहेर पडेल, खोकल्यावर करा रामबाण उपाय.!

*anagen-active growth phase.(2-6 years) *catagen-transition phase(1-2 weeks) *telogen -resting phase(5-6 weeks). या 3फेज झाला की पुन्हा एकदा केसांच्या मुळातून नवीन केस येतात म्हणजेच anagen phase चालू होते.)
म्हणजे जो केस टीलोजन फेजमध्ये आला आहे तो केस गळणार म्हणजे गळणार आहे. साधारण असे डिलिव्हरी नंतर बघायला मिळते, डि’लीवरी च्या तीन महिन्यानंतर स्त्रियांमध्ये अतिशय केस गळती दिसून येते.

४. Nutritional deficiencies- आपल्या शरीरामध्ये लोह विटामिन डी कॅल्शियम यांच्या कमतरतेमुळे हेअर फॉल होऊ शकतो. जसे कि मी वर सांगितले डिलीवरी नंतर केस गळती खूप जाणवते त्याचे कारण हेच आहे. डिलिव्हरी नंतर व्यवस्थित आहार घेतला की शक्यतो केस कमी गळतात. काहीवेळा असे पाहण्यात येते की पिरेड मध्ये जास्त रक्त प्रवाह झाल्यामुळे खूप न्यूट्रिशन loss होतो. त्यामुळे हेअर फॉल दिसून येतो.

५. हॉर्मोनाल इंबलान्स- PCOD सारख्या आजारांमध्ये स्त्रियांचे वजन अचानक वाढू लागते, पिरेड रेगुलर येत नाहीत हा सगळा हार्मोनल इंबॅलन्सचा इफेक्ट केसांवर होतो व केस गळू लागतात. त्यासाठी आपण हेल्दी लाइफस्टाइल जगली पाहिजे, व्यवस्थित आहार घेतला पाहिजे,व्यायाम केला पाहिजे.

६. केमिकल युक्त प्रोडक्ट चा वापर करणे- आजकाल बरेच जण केसांच्या खूप काही ट्रीटमेंट करून घेतात किंवा केसांना वेगवेगळ्या प्रकारचे शाम्पू ,कंडिशनर वापरले जातात. हे एक मोठे कारण बनू शकते. ७.stress वाढल्यामुळे- कसल्याही प्रकारचे टेन्शन आपल्याला केस गळती देऊ शकते व त्यामध्ये केस गळण्याची टेन्शन जर असेल तर जे केस गळतात त्यात आणखीन वाढ होऊ शकते त्यामुळे कसल्याही प्रकारचे टेंशन नका.

हे वाचा:   वर्षानुवर्ष चेहऱ्यावर असलेला मळ झटपट निघून जाईल, हा अत्यंत सोपा उपाय करेल जादू.!

घेऊ असा म्हणणं खरं तर शोभणार नाही पण कुठे तरी आपण ते कमी करण्यासाठी प्रयत्न नक्की केले पाहिजे त्यासाठी मेडिटेशन म्हणजे ध्यान केले पाहिजे, आपल्या स्वतःचा आनंद कशात आहे ते शोधून तेच काम केले पाहिजेत. ८. Trichotillomania- हा एक प्रकारचा आजार असून त्यामध्ये पेशंट स्वतःचेच केस ओढतात हे केस कालांतराने विरळ विरळ होत जातात व टक्कल पडण्याची शक्यता असते.

९. काही लोक केस खूप जोरात घट्ट बांधतात, केसांचा घट्ट अंबाडा बांधतात किंवा टाईट बो ने बांधतात अशा वेळेस केसांच्या मुलांवर ताण येऊन केस गळतात व हळूहळू केस विरळ दिसायला लागतात. रोजचे 100 केस गळणे जरी नॉर्मल असले तरी पण आपण आपल्या केसांच्या गळतीचे नक्की कारण काय आहे हे शोधून घेऊन त्यावर उपाय व डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय गरजेचे आहे.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *