या वनस्पतीला चमत्कारच म्हणावे लागेल.! या काटेदार वनस्पतीने अनेक लोकांचे हे प्रॉब्लेम केले आहेत दूर.! हे रोग कायमचे जातील.!

आरोग्य

आपण बघतो की आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे झाडे झुडपे बघत असतो.! जगभरात अनेक असे झाडे-झुडपे आहेत ज्यांची फळ, फुलं, पाने,मूळ आणि अन्य भाग तब्येतीसाठी लाभकारी असतो. अशीच खुबीने संपन्न असं एक सेमल चे झाड आहे. सेमल ला एक आयुर्वेदिक वनस्पती म्हणून गणले जाते. याच्या औषधी गुणधर्मांमुळे या वनस्पतीत शरीरातील अनेक समस्या कमी करण्याची क्षमता असते.

औषधी वनस्पतींच्या माहिती चा प्रवास पुढे नेत आज आपण सेमल या वनस्पतीचे फायदे, उपयोग आणि काही नुकसान बद्दल घेऊयात. सेमल ही एक मालवेसी परिवारा मधील वनस्पती आहे. त्याचे शास्त्रीय नाव Bombax Ceiba आहे. या झाडाची उंची जवळजवळ तीस मीटरपर्यंत असते. सेमल ची पान सहा ते सात समूहात असतात. याच्या फुलातच फळे लागतात. जी सुरुवातीला हिरव्या रंगाची आणि कालांतराने भुऱ्या काळ्या रंगाची होतात.

सेमलच्या या सगळ्या भागांचा उपयोग औषधी रूपात केला जातो. सेमल ही वनस्पती औषधी या गुणांचा भंडार आहे. यामध्ये फेनोलिक कंपाऊंड, त्वचे ला एजींग पासून वाचवणारी अँटी एजिंग क्षमता, शरीर थंड ठेवण्यासाठी, अँटी मायक्रोबियल, अँटी कॅन्सर, अँटी एच आय व्ही आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. याशिवाय महिलांमध्ये होणारी श्वेतपदरराची समस्या, रक्त साफ करण्यासाठी सुद्धा सेमल ची वनस्पती फायदेशीर ठरते.

हे वाचा:   सतत चहा पिणारे नक्की वाचा.! चहा प्रेमी साठी खूपच महत्वाची बातमी.! अति चहा च्या सेवनाने काय होत असते.?

एका रिसर्च नुसार जुन्या काळी सेमलच्या पानांचा वापर ब्लड प्युरिफिकेशन साठी केला जाई. रक्ता संबंधी कुठलीही समस्या असल्यास सेमल चे फळ त्यात अत्यंत फायदेशीर ठरते. ब्रेस्ट मिल्क, महिलांच्या मासिक तक्रारी यामध्येसुद्धा ही वनस्पती गुणकारी ठरते. सेमल चे चूर्ण दूध किंवा पाण्यासोबत सेवन करता येते. याची पावडर मधासोबत सुद्धा घेऊ शकता.

सेमलच्या ताज्या पानांचा रस गाळून पाण्यासोबत पिऊ शकता.या झाडाच्या सालांची पेस्ट बनवून त्वचे संबंधित समस्यांवर लावू शकता. सेमल च्या मुळांची पावडर, काळीमिरी आणि सुंठ पावडर मिक्स करून चुर्ण बनवू शकता. याच्या पानांचा, मुळांचा किंवा सालीचा काढा बनवू शकता. सेमलचे चूर्ण रात्री झोपताना दूध किंवा पाण्यासोबत घ्यावे.

सेमलच्या पानांचा रस सकाळी प्यावा. सेमल चा काढा सर्दी खोकला पडसे झाले असता कधीही घेऊ शकता. टीप : सेमल चा उपयोगाने काही लोकांना पोलन ऍलर्जी( झाडांपासून होणारी ) असू शकते. गर्भवती महिलांनी सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर कोणी सेमल सोबत मधुमेहासाठी औषध घेत असेल तर रक्तातील साखरेची समस्या होऊ शकते.

हे वाचा:   युवकांमध्ये हार्ट अटॅक चे प्रमाण म्हणून वाढले जात आहे, हे आहे यामागील किळसवाणे सत्य.!

यामध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म असतात ज्यामुळे रक्तातील साखर कमी होऊ शकते. सेमल च्या पानांमध्ये आणि मुळांमध्ये नायट्रेट असते, सततच्या वापराने एखाद्या व्यक्तीवर टॉक्सिक प्रभाव टाकू शकतात.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.