अनेक आजार यापासून दूरच राहतात.! अनेक रोगावर गुण आलेली वनस्पती कसा वापर करावा, हे नक्की जाणून घ्या.!

आरोग्य

निवडुंग हे सहजरीत्या आपल्याला पाहायला मिळते. आपल्यापैकी अनेक जण निवडुंगाचा वापर घराच्या शोभेसाठी देखील करत असतात. घराच्या शोभेसाठी आपण अनेकदा निवडुंग वापरतो किंवा घरी आणतो. आपल्यापैकी अनेक जणांना हे माहित नसेल कि निवडुंग आपल्या शरीरासाठी तसेच आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. निवडुंग आहे औषधी गुणधर्मांचे भांडार आहे.

आयुर्वेदामध्ये देखील निवडुंगाचा वापर केला जातो. याला इंग्लिशमध्ये कॅक्टस असेही म्हणतात. ही एक काटेरी वनस्पती आहे. त्याच बरोबर पूर्वीच्या काळी आपल्या कानामध्ये होल पाडण्यासाठी देखील निवडुंगाच्या काट्यांचा वापर केला जात असे. यामुळे कानाला कोणतेही इन्फेक्शन होत नसे. चला तर मग जाणून घेत निवडुंगा आपल्या शरीरासाठी कश्या प्रकारे उपयोगी ठरते त्याबद्दल.

निवडूंग चवीला अगदी कडू असते. आपण अनेकदा पाहिले असेल की, ज्या औषधी वनस्पती आपल्यासाठी उपयोगी असतात त्या कडू असतात. त्यामुळे निवडूंग हे देखील कडू असते. निवडुंग पचायला अगदीच हलके असते. निवडुंग शरीरासाठी गरम असते. निवडुंगाचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील कफ नाहीसा होतो. र’क्ताचे शुद्धीकरण, र’क्तवाढीसाठी देखील निवडुंगाच्या पानांचा वापर केला जातो.

हे वाचा:   खाणारे दोन भाकरी जास्त खातील, जर तुम्ही चिकन बनवताना ही चूक टाळली तर, अनेक लोक तर वासानेच वेडे होतील.!

त्यानंतर जर आपल्याला अतिशय जास्त प्रमाणात खोकला असेल सुका खोकला किंवा ओला खोकला कोणत्याही प्रकारचा खोकला आपल्याला असेल तो खोकला देखील दूर होतो. निवडुंग हे आपल्यासाठी खूपच फायदेशीर आहे. आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी आपल्याला निवडुंगाची फुले थोडीशी गरम करून खायची आहेत. ही फुले खाल्ल्याने आपल्याला असणारा सुका किंवा ओला खोकला एका वापरा मध्येच कमी झालेला दिसून येईल.

त्याचबरोबर तुम्हाला द’म्याचा त्रास असेल तर थोडेसे चालल्यावर देखील तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तरी देखील तुम्ही या फुलांचा वापर करू शकता. किंवा जर तुमच्या शरीरामध्ये र’क्ताची कमी असेल आणि त्यामुळे तुमचं शरीर पिवळे पडले असेल आणि तुमच्या अंगामध्ये अशक्तपणा आला असेल तरी देखील तुम्ही याच्या पिकलेल्या फुलांचा वापर करू शकता. ज्यांना डाग, खाज किंवा त्वचेचे रोग असतील ते देखील निवडुंगाचा सालीचा वापर करू शकतात.

त्याचबरोबर आपल्या अंगावर कोणतीही जखम झाली असेल तर या पानांची बारीक पेस्ट करून लावल्याने ही जखम भरण्यास मदत होते. त्याचबरोबर तुमच्या डोळ्यामध्ये जळजळ असेल, डोळ्याचा बाजूला खाज येत असेल तर तुम्ही ही पेस्ट डोळ्याच्या आजू बाजूला लावू शकता. ही पेस्ट त्वचेवर लावताना जखमेवर लावताना किंवा डोळ्याच्या बाजूला लावताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे.

हे वाचा:   रात्री उशिरा झोपणारे जास्त हुशार असतात की लवकर झोपणारे.? कोणाचा मेंदू हा सर्वात फास्ट असतो आज नक्की जाणून घ्या.!

ही पेस्ट लावल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटेच ठेवायची आहे. त्याहून अधिक वेळ ठेवू नये. त्याचबरोबर याचा वापर तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता. यामुळे तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. हे लावल्यामुळे तुमची खाज, जखम, कफ, खोकला हे सर्व आजार गायब होतील. जर तुम्हाला आजूबाजूला निवडूनही वनस्पती उपलब्ध झाली तर या वनस्पतीचा अवश्य लाभ घ्या आणि आपल्या शरीरातील अनेक समस्या मुळापासून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करा.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *