फक्त एकदा वांग बटाट्याची अशी भाजी करून तर बघा, बोटे चाटत खाल.!

ट्रेंडिंग

नमस्कार, तीच तीच वांग्याची बटाट्याची भाजी खाऊन कंटाळले असाल तर आज आपण मस्त चमचमीत अशी वांग बटाट्याची भाजी पाहणार आहोत. मला गॅरेटी आहे की ही भाजी तुम्हाला नक्की आवडणार. चला रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी मिडीयम् साईजचे दोन बटाटे मी इथे घेतले, त्यांची साल मी काढून टाकली आणि ते काळे पडू नये म्हणून मग मी ते पाण्यात ठेवलेत. आता हे बटाटे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत.

तर हे बटाटे कट करताना मी आधी दोन भाग करून घेतले आणि यानंतर उभे काप आपल्याला त्याला द्यायचे आहेत. आता जर बटाटे लहान असतील तर हे काप असेच ठेवायचे, इथे बटाटे मोठे आहेत त्यामुळे मी त्याचे आणखीन दोन काप करून घेतले. इथे बटाटे आपल्याला खूप लहान असे कट करून नाही घ्यायचे, थोडेसे बटाटे मोठेच असले की त्यांचा स्वाद किंवा त्यांच जे भाजीच टेक्सचर आहे ते अगदी मस्त असं दिसत.

आता अगदी मिडीयम साईजचे पाच वांगी घ्यायची आहेत आता ह्या वांग्याची ही देठ पूर्ण न काढता आपल्याला काय करायचे की जे पुढच फक्त टोक आहे, ते फक्त कट करून घ्यायच आहे, कारण हे जे देठ आहेत, यामध्ये सुद्धा खूप छान स्वाद असतो. त्यानंतर मागचा जो शेंडा आहे तो सुद्धा पूर्ण कट न करता थोडासा भाग आपल्याला ठेवायचाच आहे.

आता आपण पाहूयात् की वांगी कशाप्रकारे चिरून घ्यायची. तर सगळ्या वांग्यांची नको असणारी देठ मी काढून घेतलेली आहेत. आता वांगी कट करून घेऊयात. कट करताना हे बघा दोन भाग केले आणि जो एक भाग आहेत त्याचे आपण तीन काप करून घेऊयात. वांगी खुप मोठी असतील तर आणखीन दोन दोन तुकडे तुम्ही करू शकता.

तर हे वांगे बटाटे दोन्हीही कट केल्यानंतर पाण्यामध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे वांगी अजिबात काळी पडणार नाहीत. इकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम झाली की आपण याच्यामध्ये घालूयात एक चमचा तेल आणि तेल छान गरम झाल् झालं की आपण जी वांगी आणि बटाटी कट करून पाण्यामध्ये ठेवली होती ते पाणी सगळं निथळून घ्यायचे आणि वांगी आणि बटाटी या तेलामध्ये सोडायचे आहेत. गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची, मिडीयम फ्लेमवरती सतत् हलवत आपल्याला वांगे आणि बटाटे व्यवस्थित असे भाजून घ्यायचेत.

यांच्यावरती छान असे गोल्डन कलरचे मार्क्स येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायच आहे. आता जेव्हा तुम्ही अशाप्रकारे भाजून घेता तेव्हा भाजीचा जो स्वाद आहे तो अगदी दुपटीने वाढतो. त्यामुळे ही स्टेप जरूर फॉलो करा. हे भाजून घेण्यासाठी आपल्याला खूपे असा वेळ द्यावा लागत नाही. एक दोन ते तीन मिनिटात अगदी व्यवस्थित असे भाजले जातात.

हे वाचा:   या सोप्या पद्धतीने करा गावरान ठेचा.. चव अशी की पुन्हा पुन्हा मागाल.!

आता हे सगळे एका वेगळ्या बाऊल मध्ये काढून घ्या. आता याच कढईमध्ये पुन्हा एकदा आपण एक चमचा भरून तेल घालूयात आणि तेल व्यवस्थित गरम झालं की आपण याच्यामध्ये एक चमचा भरून जिर घालणार आहोत. जिर छान फुलू द्यायचं. जिर छान फुलल्यानंतर इथे मी आल लसूण आणि एक हिरवी मिरची ठेचून घेतली. तुम्ही आलं लसणाची पेस्ट देखील इथे वापरू शकता. आता आलू लसूण आणि ही जी मिरची आपण याच्यामध्ये ठेवून घातली आहे ती काही सेकंदांसाठी परतून घेऊयात.

आता यानंतर कढीपत्त्याची सात ते आठ पान घालूयात आणि ती देखील काही सेकंदासाठी परतून घेऊयात. आता यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूयात तर इथे दोन मिडीयम साईजचे कांदे अगदी छान बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आता हे कांदे आपण परतून घेणार आहोते. फक्त कांदा एखाद्या मिनिटांसाठी मी परतून घेतला आणि आता यानंतर एक चमचा भरून मी इथ काश्मिरी लाल मिरची घातली आहे, याने काय होईल की आपल्या भाजीला अगदी मस्त असा कलर येणार आहे आणि आता आपण तेलामध्ये हा मसाला आणि कांदा व्यवस्थित असा परतून घेऊयात.

यानंतर मिडीयम साईजचा टोमॅटो इथे मी बारीक चिरून घेतला आहे. या ऐवजी तुम्ही टोमॅटोची प्युरी देखील वापरू शकता. आता हा टोमॅटो सुद्धा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो लवकर शिजावा यूासाठी अगदी पाव चमचा मी इथे मीठ घातलेल आहे, म्हणजे काय होईल अगदी कमी वेळेमध्ये आपला टोमॅटो व्यवस्थित असा शिजला जाईल.

आता यानंतर आपण याच्यामध्ये इतर मसाले देखील घालूयात. तर सगळ्यात आधी आपण इथे घालणार आहोत, पाव चमचा हळद, एक चमचा धना पावडर, आता यानंतर घालूया दोन चमचे कांदा लसूण मसाला, याऐवजी तुमचा घरगुती मसाला, काळा मसाला इथे तुम्ही वापरू शकता. आता फक्त अर्ध्या मिनिटीसाठी हे मसाले मिक्स करून घेऊयात, परतून घेऊयात. तर हे बघा अगदी अर्धा मिनिटांसाठी मी हे मसाले परतून घेतलेत आता मसाले करपणार नाहीत म्हणून मग याच्यामध्ये अगदी एक दोन चमचे मी पाणी घातलेल आहे, म्हणजे मग काय होईल मसाले देखील अगदी व्यवस्थित फुलतील आणि ते बिलकुलही करपणार नाहीत.

हे वाचा:   तुमच्या टॉयलेट मध्ये किंवा बाथरूम मध्ये चमचाभर ही एक गोष्ट टाका.! हात सुद्धा लावायची गरज नाही एक बादली पाण्यात एकदम चकाचक होऊन जाईल.!

तर हे बघा दोन-तीन मिनिट परतल्यानंतर छान असं तेल साईडला सुटलय. पुन्हा एकदा व्यवस्थित अस मिक्स करून घेऊयात आणि आता जी वांगी आणि बटाटे आपण शॅलो फ्राय करून साईडला ठेवली होती ती सगळी याच्यामध्ये घालूयात.

आता हे सगळं मिक्स करून घेऊयात आणि फक्त एक अर्धा मिनिटांसाठी वांगी बटाटे या मसाल्यासोबत आपण परतून घेऊयात. आता यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि आता हे मीठ देखील या भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात. पुन्हा एकदा एक अर्धा मिनिटासाठी मी परतून घेतलं. आता यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालूयात. तर पाणी घालताना कोमट पाणी घालायचे आहे, थंड पाणी अजिबात याच्यामध्ये वापरायच नाही.

तर इथे मी दीड वाटी पाणी घालत आहे. हे मिक्स करून घेऊयात, यानंतर याच्यावरती झाकण ठेवूयात् आणि एक पाच ते दहा मिनिटांसाठी आपण हे शिजवून घेऊयात. त्यानंतर बघा खूप मस्त अशी भाजी दिसते, कलर देखील मस्त दिसतोय. आता एकदा हे मिक्स करून घेऊयात, व्यवस्थित अस मिक्स करून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये अगदी एक चमचा भुरून् भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालूयात. आणि हा शेंगदाण्याचा कुट देखील मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. लो फ्लेम वरती पुन्हा एकदा आपल्याला हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचय तर असा शेंगदाण्याचा कूट घातल्याने भाजीची चव अगदी दुपटीने वाढते त्यामुळे मी सजेस्ट करेल की जरूर एक चमचा भरून फक्त भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घाला आणि आता हे शिजवून घ्यायची गरज नाही.

आपण जर आधीच कूट घातला असत तर भाजीचा कलर हा थोडासा फिक्का झाला असता, त्यामुळे आपण नंतर हा शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. तर बटाटे देखील व्यवस्थित शिजलेले आहेत आणि वांगी देखील अगदी मऊसूत अशी शिजलेली आहेत. गॅसची फ्लेम बंद करूयात आणि सर्व्ह करूयात्. तर हे बघा मस्त चमचमीत अशी वांगे बटाट्याची भाजी तयार झाली. कुठलही वाटण नाही किंवा काहीही नाही, अगदी साध्या सोप्या स्टेप मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्या तुम्ही जर व्यवस्थित फॉलो केल्या तर अगदी मस्त चमचमीत चटपटीत अशी ही भाजी बनते. चपाती सोबत भाकरी सोबत किंवा तुम्ही भातासोबत ही भाजी खाऊ शकता. मित्रांनो आम्हाला आशा आहे की ही आजची रेसिपी तुम्हाला आवडली असणार. आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.