फक्त एका कागदाच्या तुकड्याने करा स्लायडिंग खिडकी साफ; खिडकी होईल चुटकीसरशी साफ.!

ट्रेंडिंग

नमस्कार, स्वागत आहे तुमच. आपल्या घरामधे असलेले विंडो किंवा डोर ट्रॅक म्हणजे दरवाजे खिडक्यांचे हे जे ट्रॅक असता ज्यामध्ये भरपूर प्रमाणात धूळ यामध्ये तयार होत असते आणि त्यामुळे हे विंडों ट्रॅक आपल्याला सारखे सारखे स्वच्छही करावे लागतात. परंतु हे विंडो ट्रॅक स्वच्छ करणं आपल्याला किचकट वाटते कारण अगदी बारीक जागेमध्ये ही जी धूळ जमा झाली आहे ती स्वच्छ करायला आपल्याला बराच वेळ लागतो. त्यामुळे आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत की हेच खिडकी किंवा दरवाजांचे ट्रॅक अगदी कमी वेळेत कमी मेहनतीत सहज स्वच्छ कसे करायचे ते.

यासाठी आपल्याला आपल्या घरात उपलब्ध असणारा एखादा हेअर डाय किंवा मेहंदी लावतानाचा जो ब्रश असतो तो जर जुना झाला असेल तर हा जुना ब्रश किंवा आपल्याकडे जर पेंटिंग साठी वापरण्यात घेणारे असे छोटे ब्रश किंवा आपण हेअर पॅक किंवा फेस पैक वगैरे लावण्यासाठी जे ब्रश वापरतो असा एखादा जुना ब्रश आपल्याला हवा आहे. तर हा ब्रश आपल्याला घ्यायचा आहे आणि यामध्ये जी काही धूळ आहे जमा झालेली आहे ती आपल्याला अशी एकसारखी गोळा करून या ट्रॅकच्या अगदी मधोमध गोळा करून घ्यायची आहे.

आता ही जर धूळ अगदी चिकट असेल, सहज निघत नसेल तर याच ब्रशची जी बॅक साईड आहे त्याच्या टोकदार भागाने थोडीशी ती मोकळी करायची आहे आणि त्यानंतर मोकळी झालेली ही धूळ आपण याच ब्रशने अशी मध्यभागी गोळा करत आणायची आहे. आता ही जी धूळ आहे, अगदी बारीक कण याच्यामध्ये असतात आता हे असे गोळा करत असताना मास्क नक्की घाला. तुम्हाला जर धुळीचा त्रास होत असेल तर मास्क किंवा हॅण्ड ग्लोज इथे तुम्ही वापरू शकता.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या मोठ्या या विंडो ट्रॅक स्वच्छ करण्यासाठी आपल्याला अजिबात कुठेही वैक्यूम क्लीनरचा वापर करायचा नाही. कुठल्याही क्लीनरचा वापर न करता आज आपण या विंडोना स्वच्छ करणार आहोत. तर अशापकारे ही सगळी धूळ तर आपण अगदी ट्रॅकच्या मधोमध गोळा केलेली आहे आणि यानंतर आपल्याला लागणार आहे एखाद्या जुन्या वहींच असं पान किंवा न्यूजपेपरचा छोटासा तुकडा आपल्याला कट करायचा आहे आणि त्याच्या मदतीने हे विंडो ट्रॅक आपण स्वच्छ करणार आहोत.

हे वाचा:   वाकडे झालेले नाक या सोप्या व्यायामाने अगदी २ महिन्यात सरळ होऊ शकते.! अशी मसाज केली तर होईल नक्कीच खूप फायदा.!

तर ते कसे? तर पहा हा जो काही कचरा आपण या ट्रॅकमध्ये गोळा केला होता मध्यभागी, तिथे हे जे वहीच पान आहे ते आपल्याला फोल्ड करून ठेवायचं आहे आणि यानंतर याच ब्रशच्या मदतीने हा जो काही कचरा आपण गोळा केला होता तो या पानाच्या तुकडयावरती आपल्याला असा गोळा करायचा आहे. शक्य असल्यास इथे तुम्ही वहीच पान च्या म्हणजे ते बऱ्यापैकी थोडस जाडसर असतं, त्यामधे सहज कचरा हा गोळा होतो. त्यामुळे इथे वहीच पान या ट्रॅकच्या मभोगम आपल्याला अडकून ठेवायच आहे, त्यामध्ये या ब्रशच्या मदतीने आपल्याला कचरा भरून घ्यायचा आहे. थोडंसं लांब पान घ्या म्हणजे एका वेळेस दोन ते तीन ट्रॅक मध्ये ते सहज फिट होत एकाच वेळेस तिन्ही ट्रॅक मथला कचरा आपल्याला गोळा करणं सोपं जात.

तर या पेपरच्या तुकडयाच्या मदतीने हा कचरा गोळा करणं खूप सोपं झालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विंडो ट्रॅक मध्ये जो काही कचरा जमा झाला होता तो अजिबात ओला करू नका. बरेच जण यावरती एखादा स्प्रे वगैरे करतात आणि त्यानंतर ही विंडो ट्रैक स्वच्छ करतात, परंतु आपल्याला तसं करायचं नाही, अगदी कोरडा जो कचरा असतो तो स्वच्छ करणं जरा पटकन सोपे जात. त्यामुळे हा कचरा आपण कोरडाच ठेवा.

आणि आता सगळ्यात शेवटी एक कपडा आपल्याला असा ओला करून घ्यायचा आहे आणि कुठल्याही ब्रश चा मागचा जो टोकदार भाग असतो त्याच्या मदतीने या ट्रॅकमध्ये जी काही साचलेली बारीक सारीक धूळ अगदी बारीक कन जे शिल्लक राहिलेले असतील ते आपल्याला या ओलसर कपड्याने पुसून घ्यायचे आहेत आणि आता हे विंडो ट्रॅक तुम्ही पाहताय अगदी छान स्वच्छ ही झालेले आहेत. अशाच प्रकारे विंडोची ट्रॅक स्वच्छ करण्याची आणखीन एक तितकीच सीपी ट्रिक सुद्धा आपण इथे पाहणार आहोत.

त्यासाठी सुद्धा कुठलाही व्हॅक्यूम क्लीनर आपल्याला लागणार नाही. आपण बराच वेळ पाहतो की मार्केटमध्ये किंवा ऑनलाइन असे विंडो ट्रॅक क्लीनिंग टूल्स मिळतात तर त्यापैकीच एक टूल अमेजन वरून ऑर्डर केला होता आणि हा कसा काम करतोय ते आपण पाहणार आहोत. तर इथे तुम्ही पाहला हे ट्रैक्स क्लीन करण्यासाठी आपल्याला हे दोन टूल्स मिळतात. ज्यामध्ये सगळ्यात आधी या टूल्सला एक स्पॉन्ज लावलेला आहे त्याचबरोबर या विंडों ट्रॅक मथला कचरा गोळा करण्यासाठी आणि तो भरून काढण्यासाठी असा एक मिनी ब्रश आणि एक मिनी डस्ट पॅन सुद्धा आपल्याला मिळतो.

हे वाचा:   तुमच्याकडे फ्रिज असेल तर नक्की वाचा.! फ्रिज संबंधीच्या या समस्या कोणालाही येत असतात.! प्रत्येकाने माहिती असू द्यावे.!

आता या टूल्स मध्ये सगळ्यात आधी आपल्याला हा मिनी ब्रश आणि मिनी डस्ट पॅन मिळालेला आहे. त्याच्या मदतीने या ट्रॅकमध्ये जी काही धूळ आहे,ती आपल्याला गोळा करायची आहे आणि ती भरून घेण्यासाठी या ब्रश सोबतच मिळालेला हा मिनी डस्ट पॅन वापरूनच हा कचरा गोळा सुद्धा करून घ्यायचा आहे.

आता है ट्रॅक्स सगळा कचरा काढल्यामुळे छान स्वच्छ ही झालेले आहेत. आता या ट्रॅकमध्ये जी काही न दिसणारी अशी धूळ आहे जी थोडीशी चिकट आहे ती स्वच्छ करण्यासाठी या टूल सोबतच आपल्याला हा जो स्पॉन्ज मिळालाय तो आपल्याला थोडासा ओलसर करायचा आहे आणि याच स्पॉन्जच्या मदतीने आता हे जे ट्रैक आहेत ते आपल्याला असे पुसून घ्यायचेत. या टूल्सला दोन वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉन्ज लावल्यामुळे या ट्रॅकच्या मधोमध ते असे अगदी छान व्यवस्थित बसतात आणि एकाच वेळेस हे ट्रॅक सुद्धा पटकन स्वच्छ केले जातात.

सगळ्यात महत्त्वाच म्हणजे मार्केटमध्ये किंवा जर तुम्ही ऑनलाईन हा टूल परचेस करायला गेला तर अगदी ₹200 च्या आत भरपूर व्हरायटीमध्ये हे टूल्स आपल्याला मिळतात. आणखीन एक टिप म्हणजे हा जो स्पॉन्ज आपल्याला इथे मिळालेला आहे त्याच्या मदतीने तुम्ही आपल्या विंडो किंवा दरवाजाचे हे जे ग्रिल्स अरातात, जे अगदी काचेला अटॅच असल्यामुळे आपल्याला दोन्हीही साईड ने ते काही स्वच्छ करता येत नाही, तर या स्पॉन्जच्या मदतीने हे जे ग्रिल्स आहेत ते सुद्धा तुम्ही अगदी सहज स्वच्छ करू शकता.

तर आजच्या या लेखातील विंडो ट्रॅक स्वच्छ करण्यासाठी ज्या दोन्ही ट्रिक्स आम्ही तुम्हाला त्यापैकी कुठली ट्रिक तुम्हाला अगदी सोपी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा लेख तुमच्या मित्र परिवारासोबत सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा.