रेशनच्या तांदळाच्या पिठाचा 10 मिनिटात बनवा कुरकुरीत पेपर डोसा व चटणी.!

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अगदी 10-12 मिनिटात तांदळाच्या पिठापासून अगदी कुरकुरीत पेपर डोसा कसा बनवायचा, डोसा बनवताना काय काय काळजी घ्यायची आणि त्याचबरोबर छानशी चटणी बघणार आहोत. एकदम झटपट रेसिपी आहे, शेवटपर्यंत हा लेख नक्की वाचा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया.

डोसा बनवण्यासाठी जे बॅटर आहे ते अगदी पाच मिनिटात मिक्सरमध्ये बनवणार आहोत, ते कसं बनवायचं ते बघुया. त्यासाठी इथे आपण एक मिक्सरच भांड घेतलय आणि त्यामध्ये अर्धा कप मी इथे तांदुळाचे पीठ घेतलय. तांदुळाच पीठ म्हणजे नॉर्मली जे आपण भाकरीसाठी पीठ करतो अगदी तेच पीठ आहे. रेशनिंगचा तांदूळ वापरून हे पीठ मी तयार केलेल आहे.

म्हणजे रेशनिंगचा तांदूळ आणून त्याला स्वच्छ निवडून घेतलाय, धुऊन घेतलाय आणि सुकवून त्याला असं हे जाडसर पीठ आपण दळून आणलेल आहे. रेडीमेड पीठ सुद्धा वापरू शकता किंवा घरामध्ये जेही पीठ तुमच्या अवेलेबल असेल ते पीठ वापरून हा डोसा तुम्ही तयार करू शकता. अर्धा कप तांदळाच पीठ असेल तर त्याला पाव कप इथे आपण रवा घेतलाय. रवा जाड किंवा बारीक कोणत्याही क्वालिटीचा तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे आपण 1/4 कप रवा घेतलाय. रव्यामुळे डोशाला छान कुरकुरीतपणा येतो आणि छान क्रिस्पी होतो. आता सारख्याच कपने इथे आपण 1/4 कप दही घेतलय. त्याचबरोबर अगदी पाव चमचा आपण इथे साखर घेतली.

साखर घातल्यामुळे डोशाला छान क्रिस्पीपणा येतो आणि छान रंग सुद्धा येतो. जसा बाजारात डोशामध्ये साखर घालून बॅटर तयार केलं जातं. थोडस मीठ घातलय आणि सारख्याच कपने इथे आपण 1/2 कप साधं पाणी घातलय, असं याच प्रमाण आहे. जमेल तितकी बारीक पेस्ट आपण याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता अशी ही दोन मिनिट आपण हे चांगलं फिरवून घेतलय म्हणजे सगळी जिन्नस चांगली एकजीव होतात आणि रवा सुद्धा यामध्ये छान बारीक होतो. आता हे एका बाऊलमध्ये काढून घ्या.

हे वाचा:   एकाच साडीच्या वेगवेगळ्या घडी घालण्याच्या पद्धती एकदा नक्की पहा.!

आता हे सगळे पीठ आपल्याला चांगले एकजीव करायच आहे. याची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता थोडीशी पातळ दिसते. रवा वापरल्यामुळे थोडा वेळ आपण हे ठेवणार आहोत म्हणजे पीठ चांगल अजून थोडसं घट्ट होईल. या कन्सिस्टन्सीवर आपण बॅटर चांगलं मिक्स करून घेतलय. आता याला झाकण लावणार आहोत आणि पाच मिनिटासाठी आपण याला असं सोडून देणार आहोत म्हणजे रवा चांगला फुलला जाईल.

तोपर्यंत डोशा बरोबर खाल्ली जाणारी चटणी बघणार आहोत. त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण दोन चमचे सुका नारळ किसून घेऊ शकता किंवा ओला नारळ सुद्धा दोन चमचे घेऊ शकता. त्याचबरोबर इथे आपण दोन चमचे भाजलेली डाळ घेतली आहे, नॉर्मली चिवड्यांमध्ये वापरतो ती चटणीमध्ये आपण वापरणार आहोत. भाजलेले शेंगदाणे सुद्धा वापरू शकता. एक लसणाची पाकळी घेतली आणि एक छोटासा आल्याचा किवा एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय. एक हिरवी मिरची घेतली हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता.

आता त्याचबरोबर थोडीशी देठानसहित आपण इथे कोथिंबीर घेतली आहे. रंग छान येतो आणि देठानसहित कोथिंबीर घातल्यामुळे चटणीला स्वाद अगदी छान येतो. चवीपुरते मीठ यामध्ये आपण घालणार आहोत म्हणजे यामध्ये चांगल एकजीव होईल. थोडस पाणी घालणार आहोत. जितकी चटणी तुम्हाला पातळ लागत असेल त्यानुसार पाणी घाला आणि जमेल तितकी बारीक पेस्ट मध्ये ही चटणी तुम्हाला दळून घ्यायची आहे. ही चटणी एका वाटीमध्ये काढून घेतली आहे. हव असेल तर तुम्ही ही चटणी अशीच खाऊ शकता किंवा तुम्ही याला छान तड़का देऊन सुद्धा ही चटणी खाऊ शकता. ही चटणी आपली तयार झाली आहे आणि चटणी बनवेपर्यंत पीठ सुद्धा इथे छान फर्मेंट झालेल आहे.

हे वाचा:   गॅसवर कोलगेट टाकताच कमाल झाली, हात जोडून विनंती गृहिणी असाल तर नक्की वाचा.!

या बॅटर पॉसून तुम्ही इडली किंवा अप्पे सुद्धा तयार करू शकता. आज आपण डोसे तयार करणार आहोत. डोसा बनवण्यासाठी इथे आपण डोशाचा तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि खूप जास्त डोशाचा तवा आपल्याला गरम करून घ्यायचा नाही. डोसा बनवताना अगदी नॉर्मली आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे. असं थोड्स पाणी यावर शिंपडून घ्यायच आणि एखाद्या कापडाने आपल्याला पुसून घ्यायचय, एक थेंबही यामध्ये आपल्याला तेल वापरायचं नाही. डोशाचा तवा घेताना एकतर तो जाड चांगला बघून घ्या आणि चांगल्या क्वालिटीचा घ्या म्हणजे त्यावर डोसे अगदी छान तयार होतात आणि बॅटर अस चांगले एकत्र एकजीव करून् आपल्याला यामध्ये घालायचय.

एक दोन पळी बॅटर आपण तव्यावर घातलं आहे आणि बॅटर अगदी परफेक्ट असल्यामुळे असं हे आपल्याला एकसारखं गोल गोल अस फिरवत हा डोसा आपल्याला पातळ करायचा आहे. एकाच डायरेक्शन मध्ये घालायच म्हणजे याला छान आकार् सुद्धा येतो आणि भाजल्यानंतर एकदम मस्त असा डोसा आपला दिसायला लागतो. डोसा घातल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम टू हाय करायची. तुमच्या गरजेनुसार आणि एक दोन ते तीन मिनिट बिलकुल याला हात लावायचा नाही. जसा जसा हा भाजला जाईल याला छान बबल्स येतात आणि असा हा क्रिस्पी किंवा असा हा ब्राऊन डोसा तयार होतो.

असा हा डोसा अगदी हलका फुलका खूप कुरकुरीत झालेला आहे. सारख्याच पिठापासून तुम्ही आप्पे बनवू शकता, उत्तप्पम बनवू शकता किंवा इडली सुद्धा तयार करू शकता. अशी ही चटणी आणि डोसा आपला तयार झालेला आहे. अतिशय कुरकुरीत झालाय तुम्ही इथे बघू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली मित्र मैत्रिणी, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शैअर करा.