मित्रांनो आपल्या आजूबाजूला असे बरेच त्रासदायक लोक असतात, जे आपल्याजवळचे लोकच असतात पण त्रासदायक असतात, निगेटिव असतात आणि ते नेहमी आपल्या मनाच शिकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. तर ही त्रासदायक माणसं असतात त्यांना हँडल करणं साध्या-सरळ माणसाला थोडं कठीणच जात असतं आणि आपल्याला बऱ्याचदा इच्छा नसतानाही त्यांच्या मनाप्रमाणे वागावे लागते, त्यांचा त्रास सहन करावा लागतो. अशा लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपला त्रास कमी होऊ शकतो. मग अशा लोकांबरोबर आपण कसं वागू शकतो? अशा लोकांना कशाप्रकारे डिलीट करायच?
आत्तापर्यंत आपण त्यांना टाळू शकलो नाही, यांच्यासमोर कधी ना कधी आपल्याला जावं लागतं म्हणून यांना टाळण्या पेक्षा यांना फेस करायला शिकले पाहिजे. त्यांना सामोरे जायला शिकले पाहिजे. तो व्यक्ती तुमच्यासमोर येईल, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतो, जी व्यक्ती तुम्हीला इरिटेड करते, ती व्यक्ती जशी तुमच्या समोर आली, ती तुम्हाला काहीतरी बोलणार आहे तर ती बोलायच्या आधी तुम्ही तुमच्या मनाची तयारी करून ठेवा. ती व्यक्ती, त्याच्या बोलण्याचा मला त्रास होणार असं काहीतरी बोलणार आहे, त्यामुळे मला त्रास होईल हे लक्षात घ्या.
त्यानंतर तो व्यक्ती तुमच्याशी बोलून गेल्यावर स्वतःला जे थोड्यावेळापूर्वी समजावलं होतं ना ते लक्षात आणायचं आहे. स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करा आणि तो व्यक्ती जे काही बोलला ते विसरण्याचा प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो व्यक्ती स्वतः काही सांगू दे, काही विचारू देत आपण मात्र त्याच्या सोबत साधच कम्युनिकेशन ठेवायचं. बरोबर आहे, अच्छा असं झालं का, नाही असं काही नाही, बर बर ठीक आहे, अशाप्रकारे अशा व्यक्तींशी बोलायचं. जर ते आपल्याला एखाद्या गोष्टीवरून फोर्स करत असतील आणि आपण जितकं नाही म्हणतो ना ते तितकं जास्त आपल्याला जास्त फोर्स करत जातात. त्यापेक्षा ते जे सांगतात त्याला हो म्हणून मोकळं व्हायचं. जेणेकरून ते लवकर तिथून निघून जातात आणि त्यांना असही कळतं की अरे माझ्या बोलण्याचा तर समोरच्याला काही फरकच पडत नाहीये आणि म्हणून ते तुम्हाला काही बोलणं सोडून देतात.
अजून एक गोष्ट म्हणजे तो जे काही सांगतोय त्यामधे आपण जास्त इंटरेस्ट दाखवायचा नाही. असं केलं ते आपोआपच तो व्यक्ती शांत होऊन जातो. अशा व्यक्तीशी स्वतःहून स्वताची कोणतीही गोष्ट शेअर करू नका. आज आपल्या खूप जवळ आहे असं दाखवून तो आपलं ऐकून घेईल आणि वेळ आल्यावर मात्र शंभर टक्के त्याचा गैरवापर करेल. आपल्या गोष्टी असतात ना त्या अशा लोकांना नाही सांगायच्या, अशा लोकांवर कधीच विश्वास नाही ठेवायचा. जेवढे होईल तेवढं ते आपलं वाईट चिंतत असतात, आपल्याला कमी दाखविण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा लोकांसमोर आपल्या जवळच्या माणसाबद्दल तर चुकूनही काही सांगू नका, कारण आपलीच माणसं आपल्या विरोधात जातात. एखाद्या व्यक्तीशी आपलं पटत नसेल तर त्याबद्दल काही बोलू नका.
अजून एक गोष्ट अशा लोकांची कधीही नजर झुकवून बोलू नका. तुम्ही तुमच्या घरातील असतील, बाहेरचे असतील तरीही त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोला. त्यांच्याकडे बघून आपण त्यांच्याकडे बघितले नाही तर बऱ्याचदा त्यांचा गैरसमज होतो की आपण त्यांना घाबरतो. हे त्यांना कुठे माहिती असतें की खरं तर आपल्याला त्यांच्याकडे बघायची इच्छाच नसते. अजून काही माणसं कशी असतात माहिती आहे का, ती आपल्याला दुःख आहे कळल्यावर खुश होतात. अशा टॉक्सिक लोकांसमोर आपण खूश आहोत सगळं काही ठीक आहे असं दाखवायचं नाही. कारण आपण दुःखी आहोत हे त्यांना सांगितलं तर त्यांना दुःख होणार नाही उलट त्यांना खूप जास्त आनंद होईल.
ज्या प्रकारे लोकांशी आपले दुःख शेअर करायचं नाही त्याचप्रमाणे या लोकांशी आपला आनंद सुद्धा शेअर करायचा नाही. आपण जर गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय तर ते ही गोष्ट मिळवण्याआधी त्यांना सांगायचं नाही कारण ते आपल्यावर हसणारच, की तू असं करतोय तुझ्याने नाही होणार, ते आपल्याला डीमोटिवेट करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा लोकांमुळे आपण खरंच डीमोटिवेट होऊन जातो. ते आपल्या सोबत आपल्या समोरच गोड बोलतात, तोंडावर गोड बोलतात आणि मग मात्र ती आपला तिरस्कार करत असतात. म्हणून जर तुम्ही त्यांना कधी आनंदाची गोष्ट सांगितली तर ते तुमच्या तोंडावर तुमचं अभिनंदन करतात आणि कस या आनंदावर विरजण लावायचं याची तयारी करायला सुरुवात केयाय.
या माणसांचं कस असत माहिती आहे का ही माणसं स्वतःची खोटी इमेज घेऊन फिरतात. ते समोरच्याला जस दाखवतात तसे ते अजिबात नसतात आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लोकांकडून कधी आर्थिक मदत देऊ नये अशा लोकांकडून कधीच आपण उसने पैसे किंवा काही मदत नाही मागितली पाहिजे. जर तुम्हाला खुश राहायचं ना तर अशा लोकांपासून तुम्हाला जितक दूर राहता येईल तितक दूर राहा. तर मित्रांनो आम्हाला आशा आहे की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर लेख आवडला असेल तर आम्हाला नक्की सांगा आणि इतरांसोबत शेअर करायला विसरू नका.