मित्रांनो आज आपण मस्त आंबट गोड तिखट झटपट भरलेलं कारलं किंवा भरलेल्या कारल्याचा रस्सा कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत. तर ही भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण तीन मध्यम आकाराचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 250 ग्रॅम किंवा पाव किलो प्रमाणात आपण इथे ताजी हिरवी कारली घेतलेली आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तासासाठी आपल्याला हे कारले भिजत ठेवायचे आहे. लहान मोठी मध्यम आकाराची तुम्हाला जशी ही कारली मिळतील त्या पद्धतीने तुम्ही तिथे ते वापरू शकता.
आता आपल्याला सिंपली कारल्याला मधून कट करून घ्यायच आहे. थोडसं मध्यम आकाराच असल्यामुळे एकाच दोन करून घेतलेल आहे. तुमचे अगदी छोटे कारले असतील तर तुम्ही नाही केल तरीसुद्धा चालू शकेल. आता काय आपल्याला कारल्याचा मधला भाग काढून टाकायचा आहे. भरल्या कारल्यासाठी या पद्धतीनेच कारले चिरून घ्या. कारण यामधे आपण मसाला किंवा स्टफ्फिंग भरतो ना ते बाहेर येत नाही आत्ताच राहतं आणि तुमच्या घरच्या भाजीला चव अगदी छान येते.
आता दुसरीकडे कढईमध्ये दोन तांबे भरून आपल्याला मोठ्या आचेवर पाणी उकळत ठेवायचे आहे. पाण्याला हलकीशी उकळी आली की त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलेल आहे आणि अर्धा चमचा हळद घेणार आहोत. दोन्ही जिन्नस छान एकजीव करून घेणार आहोत. मोठ्या आचेवर मस्त खदखदून उकळी आली की यात आता आपण कारली टाकणार आहोत. हळद मिठामध्ये असं हे थोडंसं उकळून घेतलं की यातला कडूपणा कमी होतो. तर मोठ्या आचेवर बरोबर एक पाच मिनिट आपल्याला छान उकळायचे आहे. हे उकळताना अजिबात त्यावर झाकण ठेवायचे नाही, त्याने तुमची कारले कडू होऊ शकतात. आता हे आपण काढून घेतलेल आहे.
हळद मिठाच्या पाण्यात कडू अर्क असल्यामुळे हे पाणी अजिबात आपल्याला भाजीमध्ये वापरायचं नाही, ते आपल्याला फेकून द्यायच आहे. आता हे कारले थोडे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून दिलेले आहे. ती थंड होईपर्यंत मस्त स्टफ्फींग मसाला किंवा भरल्या कारल्याचा मसाला कसा बनवायचा ते बघणार आहोत. त्यासाठी मी मेजरींग कप घेतलेला आहे नसेल तर आपण घरातल्या वाटीने, अर्धी वाटी किंवा 50 ग्रॅम प्रमाणात किसलेलं सुकं खोबरं घेतलेल आहे, पन्नास ग्रॅम भाजलेल्या दाण्याचे कूट घेतलेल आहे, दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेल आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आठ ते दहा कडीपत्त्याची पानं घेतली आहेत, फोडणी मध्ये कडीपत्ता घातला तर वेगळा काढला जातो म्हणून वाटणात वापरायचा नाही, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, आवश्यकतेनुसार आपण इथे रोजच्या वापरातल तिखट घेतलेल आहे, तुम्ही कोणतही तिखट वापरू शकता, अगदी पाव चमचा हळद घेणार आहोत आणि अर्धा चमचा स्पेशल गोडा मसाला घेतलेला आहे.
तुमच्याकडे जर गोडा मसाला नसेल तर कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही अर्धा चमचा मसाला पावडर वापरू शकता, चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ पण यामध्ये मी घेतलेल आहे. सगळे जिन्नस अजिबात पाण्याचा उपयोग न करता मिक्सर मधे चालू बंद चालू बंद करत हलकीशी याची आपण भरड किंवा मोठा मोठा मसाला छान फिरवून घेतलेला आहे. अगदी बारीक करायचा नाही. या भाज्यांचा मसाला असा थोडा मोठा असला की भाजीची चव अगदी छान येते.
आता आवश्यकतेनुसार थोडा थोडा अंगठ्याच्या मदतीने मसाला दाबत आपल्याला कारल्या मध्ये भरून घ्यायचा आहे। असा हा मसाला भरून घेतला की अजिबात मसाला भाजी मधून वेगळा होत नाही. या पद्धतीने उरलेले सगळे कारली आपण छान भरून घेणार आहोत. आपण कढई गरम करून घेतलेली आहे, त्यामध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेल आहे, ते तुम्ही आवश्यकतेनुसार कमी-अधिक करू शकता.
तेल हलकसं गरम झालं की यामध्ये चिमूटभर हिंग घालणार आहोत, त्यामध्ये थोडास हिंग घातलं की पचायला हलक जात, हिंग छान फुलल की उरलेला सगळा मसाला आपण यामध्ये घातलेला आहे. आता मंद आचेवर हा मसाला आपण काही सेकंद छान परतून घेतलेला आहे. यावर आपण भरलेली कारली घालणार आहोत आणि याच मसाल्यामध्ये साधारणत पाच मिनिट आपण ही कारली मस्त परतून घेणार आहे. भरली भाजी कोणतीही असो सुखी भाजी असो, मसाल्यांमध्ये थोडीशी भाजी परतून घेतली की त्याच्या आत पर्यंत मसाले चांगले मुरले जातात आणि त्याने तुमची भाजी अजिबात पांचट होत नाही, मस्त छान तयार होते.
आता तुम्हाला जर ही भाजी सुकी करायची असेल तर अजिबात यामध्ये पाणी घालू नका, डायरेक्ट वाफेवर वाफवून घेतली तरी सुद्धा चालू शकेल. थोडासा रस्सा करायचा असेल तर समोरच्या भांड्यामध्ये मगाशी वाटण करून घेतलेल होत ना त्यामध्ये आपण ग्लासभर पाणी घेतलेल आहे आणि यामध्ये आपण एक चार ते पाच चिंचेचा कोळ घालायचा आहे. चिंच सिंपली रात्रभर भिजत ठेवलेली होते आणि हाताने दाबून दाबून त्याचा कोळ काढून घेतला. आता चिंच घातली तर गुळ सुद्धा घातला पाहिजे. आवश्यकतेनुसार थोडा गुळ घातलेला आहे.
चिंच गूळ तुम्ही नक्की घाला भाजी कडू होत नाही. मस्त आंबट गोड तिखट चटपटी चवीची तुमची भाजी तयार होते. आता याला छान खदखदून मोठ्या आचेवर उकळी आलेली आहे. आता तुम्हाला रस्सा जितका पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी ठेवायचं आहे. भाजी शिजायला कसा फार जास्त वेळ लागत नाही, कारण सुरुवातीलाच हळद मिठाचा वापर करून भाजी मस्त वाफवून घेतल्या मुळे एक पाच मिनिटात मध्यम आचेवर भाजी शिजवून तयार होते.
ही भाजी गरम गरम बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर, पोळ्या बरोबर एकदम मस्त लागते. तर नक्की करून पहा. मस्त चमचमीत रसरशीत आंबट गोड तिखट झटपट चावीची तुमची ही कारल्याची भाजी तयार झालेली आहे. हा लेख आवडला असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तसेच हा लेख तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा.