तुम्ही सध्या बघतच आहात की आजार हळूहळू वाढले जात आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती पर्यंत सर्वांना विविध प्रकारचे आजार होत असतात. अशातच काही असेदेखील आजार असतात ज्याचा असर हा आपल्या जीवनावर अधिक होत असतो. असाच एक आजार आहे तो म्हणजे ब्लड शुगर चा.
या आजारामध्ये व्यक्तीच्या रक्तामधील साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त होत असते याचा अत्यंत वाईट परिणाम हा मानवी शरीरावर दिसून येत असतो. अगोदर हा आजार वयोवृद्ध व्यक्तींना होत होता परंतु आजकाल चुकीच्या खानपाणामुळे तसेच विविध कारणांमुळे हा आजार अगदी तरुण मुलांना देखील दिसून येऊ लागला आहे.
हा आजार होण्याचे विविध कारणे सांगितले जातात. अति जास्त प्रमाणात धू’म्रपान केल्यामुळे देखील हा आजार संभवण्याची शक्यता असते. हा आजार अनुवंशिक स्वरूपाचा देखील आहे. यावर विविध उपचार देखील उपलब्ध आहेत. परंतु घरगुती काही उपाय केले तरी देखील हा आजार बरा केला जाऊ शकतो.
आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक सोपा असा घरगुती उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुमची शुगर जवळपास नियंत्रणात येईलच. चला तर मग पाहूया कोणता आहे हा उपाय. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे बेलाचे पाने. बेलाच्या पानांचे धार्मिकदृष्ट्या जितके महत्त्व आहे तितकेच आरोग्याच्या दृष्टीने बेलपत्र उपयुक्त मानले जाते.
यामध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे शुगरसाठी अतिशय चांगले मानले जाते. यामुळे शुगर लेवल देखील नियंत्रणात येऊ शकते. याचा फक्त योग्यरीत्या उपयोग करता यायला हवा. सर्वप्रथम बेलाचे पाच ते सहा पाने घेऊन त्याला चांगल्या प्रकारे धुवून काढायचे आहे. याला चांगल्या प्रकारे कुटून काढून यातून रस काढायचा आहे. हा रस एका वाटीमध्ये काढून घ्यावा.
त्यानंतर या उपायासाठी आपल्याला आणखी एका वस्तूची आवश्यकता भासेल ही वस्तू आहे काळीमिरी. आपल्याला या उपायासाठी काळीमिरी ची पावडर बनवून घ्यायची आहे. काळी मिरी ची बनवलेली पावडर एक चमचा घेऊन ही पावडर या रसामध्ये टाकावी. याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. याचे सेवन पाण्याद्वारे करावे. ज्या महिला गर्भधारणेत आहे अशा महिलांनी हा उपाय करू नये.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.