तरुणांसाठी आनंदाची बातमी.! तरुणपणी सफेद केस होण्याचे कारण सापडले.! असा करावा त्यावर उपाय.!

आरोग्य

आज काल आपल्या डोक्यावर असणारे केस आज काल आपली ओळख बनले आहेत. जर तुमच्या डोक्यावर घनदाट, काळेभोर व मजबूत केस असतील तर तुमचे व्यक्तीमत्व चार-चौघात उठून दिसते. तुम्ही सुंदर व देखणे दिसताच मात्र तुमच्या बोलण्यात देखील मोठा आत्मविश्वास जाणवू लागतो. मात्र डोक्यावर केस नसतील अथवा वेळेपूर्वीच ते सफेद अथवा पातळ झाले असतील तर मात्र आपले आस पासचे लोक आपली थट्टा मस्करी व निंदा करण्यास कधी ही मागे सरत नाहीत.

केस आपल्या शरीराचा एक अविभाजित भाग आहे. केस हा काही नॅनोमीटर एवढा असतो. मानवी अथवा प्राण्यांच्या शरीरावर केस हे त्यांना प्रकृतीने बहाल केलेले एक वरदान आहे. याच केसांमुळे सजीवांचे अति उष्णता व थंडी या दोन्ही व्याधींपासून संरक्षण होते. आज काल मानवाची डोक्यावरचे केस हे सुशोभिकरणासाठी जास्त वापरली जावू लागली आहेत. अनेक प्रकारच्या स्टाइल्स, चुकीचे खाण-पान व प्रदूषणामुळे केस लवकरच खराब होतात व सफेद होवू लागतात.

ही समस्या आता सामान्य झाली आहे आणि अनेक लोकांना त्रास देत आहे. बाजारात अनेक प्रकारची केसांना काळे करण्याची उत्पादने मिळतात मात्र यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल रसायने मिक्स केलेली असतात. याने तुमच्या केसांची मूळे कमजोर होवू शकतात. सोबतच तुम्हाला प्रत्येक महिन्याला हा रंग आपल्या केसांना लावावाच लागतो. तुमची केस सफेद होण्याची प्रक्रिया जलद होवू लागते.

हे वाचा:   केस काळे करण्याचा खर्च मिटला.! एकदा हे एक छोटेसे काम केले तर वर्षभर बघायचे काम नाही.! डोक्यावर एकही सफेद केस उरणार नाही.!

घाबरु नका आता आम्ही तुमच्यासाठी असा एक रामबाण उपाय आणला आहे जो तुमचे केस काळे करेल व याचे कोणते ही वाईट परिणाम तुमच्या केसांवर दिसून येणार नाहीत. होय घरातील काही सामग्री वापरुनच हा उपाय करायचा आहे त्यामुळे हा उपाय जास्त खर्चीक देखील नाही आहे. चला तर जाणून घेऊया हा उपाय. आज आम्ही तुम्हाला जो उपाय सांगणार आहोत तो फक्त तुमचे केस काळे करत नाही.

तर तुमच्या पातळ केसांना वाढ देतो डोक्याच्या त्वचेला रीपेर करण्यास मदत करतो. किती ही जुनाट कोंडा तुमच्या केसांमध्ये असो काही दिवसांमध्येच तो समूळ नष्ट होतो. म्हणून खर्या स्वरूपात हा एक रामबाण उपाय बोलण्यास काही हरकत नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम तुम्हाला आवश्यकता आहे आठ ते दहा तुळशीच्या पानांची. तुळसीला आयुर्वेदात व धार्मिक कार्यातही मोठे स्थान दिले गेले आहे.

तुळसी ही एक औषधी वनस्पती आहे. यामुळे सर्दी-खोकला त्वरित बरा होतो. श्वसनाचे विकार देखील बरे करण्यासाठी तुळसी लाभदायक आहे. दुसरा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे आवळा पावडर. आवळा हा जीवनसत्व क या घटकाने मुबलक प्रमाणात भरलेला असतो. या जीवनसत्व क ची आपल्या केसांना फार जास्त आवश्यकता असते म्हणूनच दोन चमचे आवळ्याची पावडर देखील आपल्याला या उपायासाठी घ्यायची आहे. तीसरा घटक म्हणजे लिंबाचा रस.

हे वाचा:   कधीही मूळव्याध च्या जागेवर खाज सुटू लागली की हा टब चा उपाय करायचा.! अनेक लोक मिनिटात खाज, सूज, ठणक बरे करण्यासाठी हे वापरतात.!

लिंबू हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे. याच्या सेवनाने तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. केसांमध्ये लिंबाचा रस लावल्यास कोंडा दूर होतो. म्हणूनच दोन ते तीन चमचे लिंबाचा रसाचा देखील समावेश आपल्याला करायचा आहे. आता या सर्व घटकांना एकत्रित करुन यांचे योग्य मिश्रण करुन घ्या. नंतर हे मिश्रण रात्री तुमच्या केसांच्या मूळांना नीट लावून घ्या. एक तास असेल सोडून द्या एक तासाने यावर दही लावा.

दह्या मध्ये प्रोबायोटीक असतात हे तुमच्या केसांना योग्य पोषण देईल व घनदाट व काळेभोर बनवेल. या नंतर कांद्याचा रस बनवून एका तासाने तुमच्या केसांवर लावा. कांदा केसांना मुलायम बनवतो व कोंडा केसांपासून दूर करण्यास मदत करतो म्हणून कांद्याचा रस देखील लावा. सकाळी थंड पाण्याने केस चांगले धुवून टाका. हा उपाय महिन्यातून एकदाच करायचा आहे. आम्ही सांगितलेला हा नैसर्गिक उपाय केल्यास तुमचे केस काळे तर होतीलच मात्र घनदाट व मुलायम देखील होतील.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.