मित्रांनो अक्कलदाढ दुखणे ही अनेकांना अचानक जाणवणारी समस्या आहे. साधारणपणे जबड्यामध्ये चार दाढा असतात. अक्कलदाढ ही शेवटची दाढ असते. त्यामुळे ती बऱ्याच उशिरा येते. मात्र मोठ झाल्यावर जबडा मध्ये हिरड्यांमध्ये ही दाढी येण्यासाठी पुरेशी जागा नसते. सहाजिकच ही दाढ अपुऱ्या हिरड्यांमध्ये वाढू लागते.
त्यामुळे तिला वाढण्यासाठी व्यवस्थित जागा मिळत नाही. अक्कलदाढ येताना प्रचंड वेदना होतात. बऱ्याचदा या वेदना काही काळाने आपोआप कमी होतात. अक्कलदाढ येण्याचे वय हे प्रत्येकाचे वेगवेगळे असते. कधीकधी अक्कलदाढ चुकीच्या पद्धतीने आल्यामुळे इतर दात व बाकी दाढी वर वाईट परिणाम होतो.
जर अक्कल दाढ जबडा अथवा हिरड्या फाडून वाढू लागली की ती काढून टाकणे हाच एक पर्याय शिल्लक राहतो. या वेदना मध्ये खाणे पिणे देखील बंद होते. काही घरगुती उपाय करून तुम्ही अक्कलदाढ दुखणे सुसह्य करू शकता. अक्कल दाढ म्हणजे काय अक्कल दाढ कशी येते याविषयी आपण माहिती घेतली.
आता या दुखण्यावर जाणून घ्या अक्कल दाढ दुखीवर उपाय कसे करावेत? 1.आईस पॅक ने शिकवा : अक्कल दाढ वाढू लागल्यावर त्यामध्ये प्रचंड वेदना होतात. या वेदना सहन करण्यासाठी काही घरगुती उपाय तुमच्याच फायद्याचे ठरतात. बर्फ हा दुखणे थांबणे यावर एक चांगला पर्याय आहे. दुखर्या भागावर बर्फ लावल्याने त्या भागावरील दाह कमी होतो. यासाठी आईस पॅक ने पंधरा मिनिटे शेकवा.
2. मिठाच पाणी : मिठाच्या पाण्यामुळे नैसर्गिक पद्धतीने काही जीवजंतू नष्ट होतात. एका संशोधनामध्ये दिसून आले आहे की, मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्या असता तोंडातील दुर्गंधी आणि जंतू कमी होतात. कधीकधी अक्कलदाढ येताना हिरड्या दुखावल्या जातात. ज्यामुळे त्या भागामध्ये जीवजंतू निर्माण होण्याची शक्यता असते. आणि दात अजूनच दुखू लागतात.
अश्या वेळी मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्यास अक्कलदाढ येण्याच्या दुखण्यापासून आपली सुटका होते. त्यासाठी दिवसभरात दोन ते तीन वेळेस मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. 3.कांद्याचा रस : कांद्यामध्ये अँटी बॅक्टेरियल आणि anti-inflammatory गुणधर्म असतात. त्यामुळे सहाजिकच अक्कल दाढ दुखी नक्की कमी होते.
त्यासाठी कांदा कापून त्याचा रस बनवा आणि हा रस कापसाच्या मदतीने दाढेवर लावा. कांदा कापून दाढी वर ठेवून चावून खाल्ल्यास त्याचा रस देखील दाढी वर जातो. त्यामुळे तुमची दाढ दुखी कमी होते. 4. लवंग तेल : लवंग तेल देखील दाढदुखीवर अत्यंत फायदेशीर आहे.अक्कल दाढीवर कापसाच्या मदतीने लवंगाचे तेल लावा. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. दाढ दुखत असलेल्या जागी तुम्ही लवंग देखील ठेवू शकता.
5. हळद : हळद हे प्रत्येक स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होते. यामुळे अक्कलदाढ सुरू झाल्यास तुम्ही तरी त्यावर हळद लावू शकता. 6.आलं आणि लसणाची पेस्ट : आले लसणामुळे तुमचे हानिकारक जीवजंतू पासून संरक्षण होते कारण यामध्ये असतात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल गुणधर्म..! दुखर्या भागावर किंवा हिरडी वर आल आणि लसणाच्या पेस्ट ने हलक्या हाताने मसाज करा.
वरील जे जे उपाय शक्य असतील तेथे तुम्ही दात दुखीवर हिरडी दुखी वर किंवा अक्कल दाढ दुखीवर करू शकता. हे सर्व घरगुती उपाय आहेत. आशा आहे दिलेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आपल्यापैकी सर्वांनाच कधी ना कधी दाढ दुखी ला सामोरे जावेच लागते. ही माहिती तुमच्या संग्रही असणे फायदेशीर आहे.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.