मित्रांनो सुंदर दिसणे हा आपल्या सगळ्यांचाच हक्क आहे. आणि आज-काल सुंदर दिसण्यासाठी जो तो धडपडत असतो. परंतु मित्रांनो तुम्ही सुंदर आहातच. पण तुम्ही अनेकदा मोठ्या माणसांना बोलताना ऐकलं असेल की, ती/तो लहानपणी किती गोरी होती आता किती काळी झाली! बऱ्याचदा अनेक लोकांना असा अनुभव येतो. म्हणजे लहानपणी असलेली मूळ गोरी त्वचा ही मोठे झाल्यानंतर राहतच नाही.
त्वचा नुसती गोरीच असून चालत नाही तर त्यावर असलेले डाग, पुरळ,फुटकुळ्या या तुमच्या सौंदर्यामध्ये बाधा आणतात. सर्वप्रथम जाणून घेऊयात मूळ साफ आणि सुंदर, गोरी असणारी त्वचा आपण मोठे झाल्यावर का म्हणून बदलते? खरंतर या पाठीमागे अनेक कारणं आहेत पण प्रामुख्याने उलट-सुलट पदार्थ खाणे, शरीरामध्ये अनेक पोषक तत्वांचा अभाव, नियमित पोट साफ नसणे.
तसेच केमिकल रहित अनेक प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांचा बेसुमार वापर, धूळ धूर उन्हात जास्त फिरल्याने देखील त्याच्या काळवंडते, प्रदूषण, अनुवांशिकता तसेच शरीरामध्ये बिघडणारे हार्मोन्सचे संतुलन.. असे अनेक घटक याला जबाबदार असतात. त्यासाठी केवळ बाह्य उपचार करून चालत नाही. काही उपाय सवयी या नियमित अंतर्गत देखील कराव्या लागतात.
आम्ही तुम्हाला काही सवय देखील सांगणार आहेत ज्या तुम्हाला बदलायच्या आहेत. जेणेकरून तुमच्या त्वचेची तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊ शकाल. आपल्या त्वचेचा पोत ओळखून उन्हामध्ये फिरताना चांगलं कॉलिटी चे नैसर्गिक अथवा हर्बल सन स्क्रीन लोशन लावावे. चेहरा स्कार्फ ने व्यवस्थित झाकावा. कोणत्याही प्रकारचे सौंदर्यप्रसाधनं निवडताना ती नैसर्गिक गोष्टींनी बनलेली असावीत प्रामुख्याने तुमच्या त्वचेला सूट होणारी असावेत ह्या बाबी लक्षात घ्या.
कारण एकच प्रकारचे क्रीम सर्व प्रकारच्या त्वचेला चालेलच असे नाही. चेहरा धुताना नेहमी जास्त वेळा फक्त पाण्याचा वापर करावा. दिवसातून एकदाच फेस वॉश ने चेहरा धुवा. दैनंदिन जीवनामध्ये पिण्याच्या पाण्याचे प्रमाण मुबलक असावे. आहारा मध्ये फळ, हिरव्या पालेभाज्या तसेच सॅलडचा भरपूर सहभाग असावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर नियमित नैसर्गिक पद्धतीने पोट साफ होत असेल तर तुम्ही खूप नशीबवान आहात.
नसल्यास त्यावर आधी सर्वप्रथम उपचार करा. कारण सर्व प्रकारच्या समस्यांचे मूळ हे पोट साफ नसणे हेच होय. सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. चालणे धावणे याप्रमाणेच नियमित योगा केल्याने केवळ तुमचे शरीरच नव्हे तर त्वचा देखील चमकु लागते. नियमित केलेल्या प्राणायामामुळे तुम्हाला वाढते वय लपवता येऊ शकते.
सगळ्यात महत्वाची खास टीप म्हणजे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठल्याने त्वचा राहते तरुण आणि डाग फुटकुळ्या विरहित.. तर या होत्या काही बाबी ज्या तुम्हाला नियमित सवयी अंगवळणी पाडून द्यायच्या आहेत. ज्यामुळे भविष्यात तुम्हाला मिळेल अपेक्षित अशी सुंदर त्वचा. तेही अगदी फार काही विशेष प्रयत्न न करता.
परंतु वर्तमानातील काळवंडलेल्या डाग पडलेल्या त्वचेचे काय? त्यासाठी आम्ही तुम्हाला सुचवत आहोत एक अजब-गजब चमत्कारी घरगुती उपाय. जो तो मी अवश्य करून बघा यामुळे तुम्हाला शंभर टक्के परिणाम मिळेल. या उपायासाठी आपल्याला लागणार आहे इन्स्टंट कॉफी पावडर. एक चमचा कॉफी पावडर एका वाटीमध्ये घ्या. यात एक चमचा स्टार्च घाला. हे मिश्रण चमच्याने एकजीव करून घ्या.
यामध्ये एक चमचा ऑलीव्ह ऑईल घाला. यामुळे तुमची त्वचा राहील मऊ कंडिशनिंग.. त्यानंतर आता एक चमचा बदामाच्या तेलाचा नंबर. पुन्हा एकदा चमच्याने हे मिश्रण कालवून घ्या. छानशी घट्ट पेस्ट तयार होईल. मिश्रण थोडेसे पातळ करण्यासाठी एक चमचा गरम पाणी घालून मिक्स करा. हे मिश्रण चेहर्यावर लावा तसेच शरीराच्या कोणत्याही त्वचेवर लावू शकता. सुमारे दहा मिनिटं हे ठेऊन चेहरा साध्या पाण्याने धुऊन टाका.
यानंतर कापसाच्या मदतीने गुलाब पाणी चेहऱ्यावर लावा. या उपायामुळे तुमच्या त्वचेमध्ये साठलेली घाण तसेच मृत त्वचा देखील निघून जाईल. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या त्वचेची निगा राखा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.